Showing posts with label jobs. Show all posts
Showing posts with label jobs. Show all posts

Saturday, February 29, 2020

How will inflation stop? (भाववाढ कशी थांबेल ?)


How will inflation stop?
भाववाढ कशी थांबेल ?


          आजकाल कोणतीही वस्तू घेण्यास बाजारात जा किंवा सेवा घेण्यास कोणत्याही कार्यालयात जा तसेच हॉस्पिटलमध्ये , वकिलाकडे , कॉन्ट्रैक्टरकडे , मग तो गवंडी असो , प्लंबर असो , पेंटर असो किंवा इलेक्ट्रीशियन असो , सर्वांचे उत्तर एकच परवडत नाही. अव्वाच्यासव्वा पैसे घेणारे भाजीवाले , फळवाले , किराणा भुसारवाले , मटण - अंडी - मासे विकणारे सर्व सांगतात , परवडत नाही . एवढी भाववाढ होऊनही सर्व विक्रेते व दुकानदार व्यापारी व सेवा उद्योगवाले दोघेही म्हणतात , परवडत नाही . मग पैसा जातो कोठे ?


     कोणताही नोकर ठेवा कितीही पगार द्या , प्रत्येक जण म्हणतो , परवडत नाही. पुन्हा पगारवाढीसाठी काही कारणे दाखवून अर्ज केला जातो . लगेच पगारवाढ ही लागते . नाहीतर तो म्हणतो , चाललो मी , ही घ्या तुमची किती . आयटी उद्योगामुळे सर्वांचेच पगार वाढले. राज्य व केंद्र सरकारी नोकरांची भरपूर पगारवाढ झाली . या शिवाय भ्रष्टाचारामुळे मिळतो तो पेसा वेगळाच . तरीही म्हणतात पगार परवडत नाही . शिक्षणासाठी एवढ्या भरमसाट देणग्या देऊनही शिक्षण सम्राट विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा पुरवत नाहीत. तेही म्हणतात , परवडत नाही ,  घरबांधणी भाव तर गगनाला भिडलेले आहेत , तरीही बिल्डर म्हणतात , परवडत नाही . याचे कारण शोधले तर असे लक्षात येईल की प्रत्येकाच्या अपेक्षा भरमसाट वाढलेल्या आहेत . अपेक्षेपेक्षा पैसा जास्त मिळावा असे प्रत्येकालाच वाटते कारण प्रत्येकाचे राहणीमान उंचावलेले आहे.


    याबाबत सखोल परीक्षण केले असता असे लक्षात येईल की , वस्तू भरपूर उपलब्ध आहेत , भावही वाढलेले आहेत . तरीही गिऱ्हाईक आहे व मालाचा तुटवडा पडतो . याचाच अर्थ बाजारामध्ये भरपुर भ्रष्टाचाराचा काळा  पैसा आला आहे व तो रीतसर चलनातून बाहेर काढला तरच भाववाढ खाली येईल , अन्यथा भरपूर माल बाजारात उपलब्ध झाला तरच किंमती खाली येतील आणि याच कारणामुळे भारतीय अर्थव्यवस्था धोक्यात आल्याचा आभास निर्माण झाला आहे व तो कालांतराने आपोआप ठिकाणावरती येईल व भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा एकदा मजबूत पायावरती उभी राहील .


-भास्करराव म्हस्के






Wednesday, February 26, 2020

Measures to reduce the delay in judgment?

  Measures to reduce the delay in judgment?

न्यायदानातला विलंब कमी करण्यासाठी उपाय काय ?




Ø ज्याप्रमाणे सरकारने नोटरीची नेमणूक केली त्याच धर्तीवर वकिलांच्या सिनिऑरिटीप्रमाणे त्यांना न्यायदानाचे अधिकार प्रदान करावेत व प्रलंबित खटले निकाली काढावेत .
Ø  जसे ५ - १० वर्षे पॅक्टीस केलेल्या वकिलांना सिनिअर डिव्हीजन स्मॉल कॉज कोर्टाचे अधिकार द्यावेत.


Ø   १० - २० वर्षे पॅक्टीस केलेल्या वकिलांना सिनिअर डिव्हिजनचे काम द्यावे . २५ - ३० वर्षे पॅक्टीस केलेल्या वकिलांना डिव्हिजनल जज यांचे काम द्यावे.
 Ø   ३० वर्षांपुढील पॅक्टीस केलेल्यांना हायकोर्ट बेंचचे काम द्यावे.



Ø  अर्थात अशा नेमणुका करताना काही निकष आणि काही आचारसंहिता ठरवावी लागेल .

Ø  निकष ठरवितांना दरवर्षी त्या वकिलाने चालविलेल्या व निकाली काढलेल्या खटल्यांच संख्या लक्षात घेतली जावी .



Ø  सदर नवनियुक्त ॲडव्होकेट व जजेसची नेमणूक दोन्ही बाजूंच्या संमतीने व्हावी .

Ø  जज्जाचे काम करणाऱ्या वकिलांच्या दाव्याच्या कामी त्यांचे संबंधित असिस्टंट वकील यांना भाग घेण्यास मनाई करावी .




Ø  त्याच धर्तीवर पुष्कळ केसेस तांत्रिक बाबीवर अवलंबून असतात. जसे,  इंजिनिअरिंग बेस , मेडिकल बेस , बँका , जमीनजुमला , प्रॉपर्टी , सरकारी कामासंबंधी , अशा वेळी तज्ज्ञ इंजिनिअर , डॉक्टर्स , आय.ए.एस . आधिकारी , फौजदारीमध्ये आय . पी . एस . अधिकारी इ . अनुभवी मंडळींना असे जज्ज नेमण्यास हरकत नाही .






                                          




Ø  याच्याच जोडीला १९४० चा लवाद कायद्याचे सोपे सुटसुटीत विस्तारीकरण केले तरीही केसेस झटपट होतील . लोकन्यायालये , कौटुंबिक न्यायालये , सहकार न्यायालये , ग्रामन्यायालये , औद्योगिक न्यायालये एवढ्या विभागण्या होऊनही कार्यक्षमतेने कामाचा निपटारा होत नाही , हे सर्वश्रुत आहे .


                                            - भास्करराव म्हस्के