Monday, March 16, 2020

Voters think when choosing a candidate....?


उमेदवार निवडताना मतदारांनी कसा विचार करावा ?


Ø  गेली कित्येक वर्षे काही ठरावीक मंडळी राजकारणात आहेत. राजकारण हाच त्यांचा व्यवसाय  बनलेला आहे. तेव्हा नवीन रक्ताच्या म्हणजे २५ ते ४५ या वयोगटातील उमेदवारांना निवडावे.
Ø  राष्ट्रीय व सामाजिक प्रश्नांचा ज्यांचा अभ्यास आहे व आपापल्या मतदारसंघात ज्याचे काम आहेअशा उमेदवारांचा प्रथम विचार करावा.
Ø  ज्यांच्याकडे राजकीयसामाजिक शुध्दता आहेत्यांना निवडावे. ज्या उमेदवारांमध्ये प्रश्न सोडवण्याची क्षमता आहे. असांना अग्रक्रम द्यावा. जे विकले जाणार नाहीत व तशी लेखी हमी देतीलत्यांना निवडावे.
Ø  कालबध्द कार्यक्रम राबविला नाही तर आगाऊ राजीनामा देण्यास तयारी असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य द्यावे.
Ø  मतदान करताना कोणाला मत द्यावेया प्रश्नाइतकेच कोणाला देऊ नये , याच्याही कसोट्या निश्चित करण्यास महत्त्व आहे. एकवेळ फार श्रेष्ठ नसलेला उमेदवार निवडला गेला तर फारसे बिघडणार नाहीपण समाजविघातक पध्दतीने राजकारण करणाऱ्या व   संशयास्पद चारित्र्याच्या व्यक्तींना धान्यातल्या खड्यासारखे बाजूला काढणे फार महत्वाचे आहे. म्हणून कोणाला निवडू नये, या संदर्भातल्या काही कसोट्या सुचवित आहे.

Ø  अनेकदा निवडून आलेल्यांना खुशाल पाडा. राजकारणात नवी पिढी येऊ द्या.
Ø  ज्याच्या संपत्तीची मोजदाद करता येणार नाहीअशा भ्रष्ट माजी आमदारमंत्रीसाखर कारखानदार , समाजाला पिळून धनाढया झालेल्यांनाशिक्षण सम्राटांना पराभूत करा.
Ø  ज्यांना सामाजिक - राजकीय चारित्र्य नाही अशांना मते देऊ नयेत.
Ø  पैशांपेक्षा व्यक्ती महत्त्वाची मानावी व उत्तम व्यक्तींना निवडावे.
Ø  राजकारण हेच ज्याचे चरितार्थाचे साधन आहे , त्यांना निवडून देऊ नये.
Ø  संपत्तीची आकडेवारी देण्यास तयार नसलेल्या उमेदवारांस आपणही मते देण्यास नकार द्यावा.
Ø  कालबध्द कार्यक्रमांच्या अटींवर आगाऊ राजीनामा देण्यास तयार नसलेल्या उमेदवारांस पराभूत करावे.

Ø  निवडून आल्यावर नीतिमुल्ये ठोकरून सत्तेसाठी सत्ताधारी पक्षाला जाऊन मिळणाऱ्या उमेदवाराला जरूर पाडावेदारू मटका जुगार यांवर अवलंबून जीवन जगणान्यांना अवश्य पराभूत करावे .

Ø  कार्यकर्त्यांनी ५ वर्षे नेत्याच्या मागे राहून ज्या नेत्याने ऐनवेळी टोपी बदलली , त्या नेत्याला अथवा त्याच्या उमेदवाराला जरूर पाडा.

                                               :- भास्करराव म्हस्के





No comments:

Post a Comment