Saturday, March 14, 2020

About Sick Industries...........?


आजारी उद्योगांपुढील प्रश्न




                माणूस आजारी असला किंवा असहाय्य असला की लोक नुसतेच त्याच्याकडे सहानुभूतीने पाहतात. सक्रिय सहाय्य कोणी करत नाही. तीच परिस्थिती या आजारी कारखान्याची होते. माणस आजारी असला तर तु कशावरून आजारी आहे असे विचारले तर तो किमान सर्टिफिकेट आणू शकेल. तर आजारी कारखान्यांना आजारपणाचे निदान करावयाचे असेल तर त्यासाठी आजारपणाचा शिक्कामोर्तब करणारी संस्थाच नाही. स्वत:च त्याने सांगावे. अमुक अडचण आहे तमुक अडचण आहे. पण आजारपणाचे निदान करणारा कोणीच नसतो.

             असा असाहाय्य कारखानदार प्रथम जातो तो बँकेच्या दारात. बँकेकडून त्याला फार वाईट वागणूक मिळते. त्याच्या अडचणी समजावून घेतल्या जात  नाहीत. त्याने केलेल्या चुकांचा त्याला पश्चाताप होत असला तरी त्याला पुन्हा एकवार उभे रहाण्याची संधी प्राप्त होत नाही. याउलट त्याच्यावर कायदेशीर केस वगैरे करून बँका एम. एस. एफ. सी. विक्रीकर अधिकारी त्याला अधिक अडचणीत आणू पाहतात नव्हे आणतातच . 

           बरे एकदा बँक पूर्वग्रहदूषित झाली असेल तर दुसऱ्या बँकेकडे जायचे म्हटले की सर्व कर्ज पूर्ण भरणे हे कोणासही शक्य होत नाही व शेवटी सदा आजारी कारखान्यास त्याच बँकेत सापत्न वागणूक मिळते.

          अडचणीतील उद्योगात मदत मागावयाची असेल तर कोणाकडे जावे हा संभ्रम निर्माण होतो. कोणाकडे मदतीचा हात पसरावा हे समजत नाही. सरकारकडे अशा उद्योगांसाठी काहीच पर्यायी योजना नाही. बँका वित्तमहामंडळे आर्थिक मदत करणाऱ्या संस्था या तर त्यांच्याकडे पाठ फिरवून बसलेल्या असतात. काय केले म्हणजे तो यातून बाहेर येईल हे समजत नाही. त्याचा कोणीच वाली नसतो.
-    भास्करराव म्हस्के

No comments:

Post a Comment