Sunday, March 1, 2020

YES BANK SCAM


येस बँक घोटाळा


         लोकसत्तामधील अग्रलेख वाचला. येस बँक बुडाली नाही. जाणून बुजून बुडवली आहे कारण कपूर यांनी स्वतःची गुंतवणूक बँकेचे समभाग अत्युच्य पातळीवर असताना विकून टाकले. व फार मोठी रक्कम आपल्या पदरात पाडून घेतली. ही वस्तुस्थिती आहे. 

       त्यामुळे येस बँकेच्या इतर भागधारकांना संचालक मंडळ घेत असलेले निर्णय माहिती असून देखील त्यास कागदोपत्री खोटी प्रसिद्धी देऊन वेळ मारून नेण्याचे काम करत होते. रोज कोणत्या ना कोणत्या बँकेचे घोटाळे वृत्तपत्रातून पहावयास मिळत आहे. सरकारी बँकेची बुडीत येण्याची रक्कम ही सोळा लाख कोटी रुपये इतकी आहे. व त्या बुडीत रकमेस कोणतेही विमा संरक्षण नाही त्यामुळे यापुढे ठेवीदारांना बँकेकडे ठेव ठेवताना संपूर्ण रकमेचा विमा करणे आवश्यक आहे. व त्याचे हफ्ते हे बँकेनेच भरले पाहिजेत. 

      बँकेतील सर्व ठेवी या सामान्य माणसांपासून अति श्रीमंत माणसांपर्यंत सर्वांच्याच आहेत. त्यामुळे रिझर्व्हबँक बँकांच्या बाबतीत निर्णय घेत असताना ठेवीदारांची समंती घेणे आवश्यक आहे. म्हणून तशी नोटीस ठेवीदारांना आगाऊ देणे आवश्यक आहे. व ही धोक्याची घंटा  बँकेची गाडी घसरण्यापूर्वी देण्याची आवश्यकता होती. एल आय सी, स्टेटबँक आणि रिझर्व्हबँकेतील राखीव निधी हा सर्व पैसा जनतेचा आहे. रिझर्व्हबँक, एलआयसी, स्टेटबँक हे कास्टोडीयन आहेत. व बँकांच्या नियमावलीप्रमाणे वागणे बंधनकारक आहे. आज येस बँकेच्या बातीत झाले तेच उद्या दुसऱ्या बँकांच्या बाबतीत झाले तर?


         नुकत्याच पुण्याच्या शिवाजीराव भोसले बँक यांचे दिवाळे निघाले आहे. तसेच रोज नव्या नव्या बँका निघतात व नव्या नव्या आकर्षक अटीवर व्याज देण्याचे जाहीर करताना त्यावरही बंधन आणणे आवशयक आहे.
     
                         -    भास्करराव म्हस्के

No comments:

Post a Comment