चेंबर नंबर 602
विषय . राज्यासाठी उत्पन्नाचा नवा मार्ग
महोदय,
आपले अंदाजपत्रक वाचले अपुरे उत्पन्नामुळे व केंद्राच्या असहकार यामुळे आपणास मोकळ्या हाताने खर्च करून महाराष्ट्राचा विकास जलद गतीने करणे अवघड जाणे शक्य आहे म्हणून मी आपणास काही उपाय सुचवत आहे ज्यायोगे सरकारकडे भरपूर निधी जमा होईल व सरकारी कामे वर्षानुवर्षे पडून राहिली आहेत ती कामे गती घेतील.
उपाय क्रमांक 1.
महाराष्ट्र मध्ये धर्मादाय आयुक्तांकडे अनेक मोठमोठ्या संस्थांच्या बहुमोल जागा या ना त्या कारणाने वादात पडलेल्या आहेत व धर्मादाय आयुक्तांच्या गलथान कारभारामुळे त्या बहुमूल्य जागा कुजत पडलेल्या आहेत. बीटीपी एक मध्ये योग्य तो बदल करून अशा जागा ठराविक वेळेत वापरात न आल्यास सरकार जमा करण्यात येतील असा कायदा केल्यास फार मोठा निधी सरकारकडे जमा होऊ शकेल उदाहरण द्यायचे झाले तर पुण्यातील डेक्कन जिमखाना हे देता येईल. कारण त्यांच्या अत्यंत बहुमोल जागा गेली पंचावन्न वर्ष सडत पडलेली आहे व त्याकडे चॅरिटी कमिशनर कार्यालयाचे अक्षम्य दुर्लक्ष झालेले आहे. व सदर प्रॉपर्टीमध्ये डेक्कन जिमखाना पोलीस स्टेशन, सेंट्रल बँक ऑफ इंडिया डेक्कन जिमखाना पोलीस ऑफिस या शंभर वर्ष जुन्या संस्था तसेच गरवारे प्रशाला , हिंगणे संस्था यांच्या या शंभर वर्ष जुन्या संस्था व जिम खाण्याचा 100 वर्ष जुना बॅडमिंटन हॉल येथे सध्या मंगल कार्यालय सुरु करून उपद्व्यापी मंडळी भाड्याची लूटमार करीत आहेत. तेव्हा अशा संस्था आपणास मुंबई पुणे येथे अनेक सापडतील. तसेच कित्येक खासगी धर्मादाय संस्थेकडे वाद सामोपचाराने मिटवून त्यातूनही मोठे उत्पन्न सुरू करता येईल.
उपाय क्रमांक 2.
अपूर्ण पाटबंधारे योजना या लाभधारक शेतकरी कंत्राटदार सरकार व गुंतवणूकदार यांचा संयुक्त करार करून खाजगी तत्त्वावर डेव्हलप करणे शक्य आहे. सध्याच्या औद्योगिक मंदीला अशा योजना आकर्षक पद्धतीने मॉडेल म्हणून तयार करून देण्याचे काम मी कोणतीही फी न आकारता करून देईन. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर सरकारी गुंतवणूक वाचेल.
उपाय क्रमांक 3.
फास्ट फॉरेस्ट डेव्हलपमेंट, लावा , वाढवा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर फलदायी व फळबागा, गुरांचे खाद्य व जंगलांची वाढ तसेच विद्युत निर्मिती, गावपातळीवरील पिण्याचे पाणी, शेतीला पाणी, अजी 0% बाष्पीभवन, 0% पाझर, 100% पुनर्भरण अशी नाविन्यपूर्ण टेकडी धरणे बांधून लाखो एकर जमीन जंगलाखाली आणून झपाट्याने जंगलतोड करता येणे शक्य आहे व त्यासाठी सर्व यंत्रणा ही स्वयंचलित असेल व 100% यशस्वी होणारी असेल. ग्लोबल वॉर्निंग रोखण्यासाठी सदर योजना अत्यंत आवश्यक आहे. याचाही विचार व्हावा. व UNO मध्ये जंगल वाढीसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी पडून आहे त्याचाही आपल्याला वापर करता येईल.
तूर्तास एवढे पुरे. आणखीही माझ्याकडे उत्पन्न वाढीचे काही वास्तव उपाय आहेत त्यावर पुढील पत्रात मी आणखी सूचना करीन त्या जरूर विचारात घ्याव्यात.
आपला नम्र,
भास्करराव म्हस्के

No comments:
Post a Comment