Monday, March 16, 2020

The politics of statues...........#


पुतळ्यांच्या राजकारणावर उत्तर काय ?


  सरदार पटेल पुतळाः २५०० कोटी रुपये , शिवाजी महाराज - समृद्रातील अमेरिकेच्या स्वातंत्र्य देवते पेक्षाही उंच पुतळाः ७००० कोटी रुपयेबाळासाहेब ठाकरे स्मारक पुतळा , डॉ. आंबेडकर स्मारक अशी पुतळा उभारणीची चढाओढ करण्यापेक्षा जनतेला आता मूलभूत सुविधा व तात्काळ प्रशासकीय सुधारणा हव्या आहेत. 


पुतळ्यापेक्षा थोर व्यक्तींची शिकवण लोकांपर्यंत पोहोचवा. जातीय दंगलीचे मूळही बऱ्याच पुतळ्यांच्या विटंबनेतून निर्माण होते आणि ती विटंबना त्यांच्याच अनुयायांनी महत्त्व वाढविण्यासाठी केलेली असते. ही समाजकंटकांची खेळी असते व त्यामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडतेजातीय धर्मीय तणाव विकोपाला जातातही वस्तुस्थिती आहे.

 पुतळा उभारणीसाठी शांत व रम्य ठिकाणी स्वतंत्र पुतळा उद्यान उभारावे म्हणजे वाहतुकीस अडचण येणार नाही व सर्व मान्यवर व्यक्तींचे पुतळे व त्यांचे कार्य एकाच ठिकाणी पहावयास मिळेल , अशी व्यवस्था केली तर हिडीस प्रकार होणार नाहीत "
                                   

                                    :- भास्कराव म्हस्के
















No comments:

Post a Comment