Wednesday, March 25, 2020

Expectations of the common man



सामान्य माणसाच्या अपेक्षाभंगाची कारणे
• राजकारणातील सर्वसामान्य कार्यकर्ताही अल्पावधीत श्रीमंत होतो , हे लक्षात येताच समाजातील गुंड प्रवृत्तीच्या लोकांत राजकारणाबद्दल आकर्षण निर्माण झाले .
• राजकारणामुळे पैशासोबतच मिळणारी प्रतिष्ठा , मान सन्मान  , सत्ता सुखसोईमुळे १९५२ पासूनच्या निवडणुकीत जी घराणी उतरली , त्यांची पकड राजकारणावर दिवसेंदिवस पक्की होत गेली. साखर कारखाने , शिक्षण संस्था , बैंकांसह पत संस्था  , जिल्हापरिषद , पंचायत समित्या , ग्रामपंचायत सगळीकडे त्यांनी ही पकड पद केली व इतरांना प्रवेश जवळजवळ अशक्य झाले. अनंत काळ सत्ता भोगल्यामुळे सुबलेला परिवार राहिला नाही.त्यामुळे निवडणुकीत कितीही खर्च करण्याची ताकद त्याच्याकडे आहे. राजकिय भ्रष्टाचाराला अंतच राहिला नाही . त्यातून शासकीय यंत्रणाही भ्रष्ट झाली .
सर्वसामान्य सच्चा कार्यकर्ता एवढा खर्च करू शकत नसल्यामुळे राजकारणाबाहेर राहिला. ही होती घराणेशाहीची मुहूर्तमेढ.
• अगदी दुर्बल विरोधी पक्ष व सरकारला धारेवर घरण्या सक्षम विरोधीपक्ष नेत्याची उणीव व त्याच्यात असलेला अभ्यासाचा व आक्रमक वक्तृत्वाचा अभाव त्यामुळे सत्ताधारांनी स्वैराचार केला.
• या सर्व गोष्टींत बुध्दिवंत , विचारवंत आमूलाग्र बदल घडवून आणू शकत होते , पण तेही या प्रक्रियेपासून जाणूनबुजून दर राहिले. कार्यक्षम सरकारी निवृत्त अधिकारी वर्ग निवृत्तीनंतर विचार प्रकट करताना प्रशासकीय उणिवांची माहिती देतात. तेच त्यांनी प्रशासनात असताना परखडपणे मांडले तर ! पश्चात बुध्दी काय कामाची ? नंतर वृत्तपत्रातून लांबलचक लिहन परिवर्तन कसे घडणार ?  
• केंद्रामध्ये मराठी खासदारांचा दर्जा हा मौनी खासदारांसारखा असतो. इतर राज्यातील खासदार राज्याच्या प्रश्नावर एक होऊन सकारवर तुटून पडतात. महाराष्ट्रातील खासदारांनी सतत ५ वर्षे एकत्रित प्रयत्न केले असते तर सीमा प्रश्नासारखे असंख्य प्रश्न जे कायम आहेत ते कधीच सुटले असते. परंतु सर्व पक्षांनी होयबा खासदार पसंद केले , अगदी सातवी पास अशांनाही वर्षानुवर्षे खासदार ठेवले. त्यातून महाराष्ट्राचे फार मोठे नुकसान झाले. किमान राज्यसभेवर तरी चांगली माणसे पाठवायचीपण तेही दिसत नाही.
 • पक्ष कोणताही असोप्रचाराच्या वेळी प्रत्येक राजकीय पक्ष काहीही समिकरण मांडू देतते सर्व सत्ता काबिज करण्यापुरतेच असतात. प्रत्यक्षात सगळे सारखेच असतात. ज्याच्या हाती सत्ता तो पारधी अशीच स्थिती राहाते. तात्पुरते लालूच दाखवून एकदा सावजाला आपल्या कब्जात आणले , की ५ वर्षे मग आपलीच मनमानी ! सगळ्यांनाच अशा भूलथापांचा वीट आलाय. पण त्यावर राजकारणापासून अलिप्त होणे हा उपाय नव्हे.
            भारतापुढे नि महाराष्ट्रापुढे आज स्वातंत्र्यानंतर ६५ वर्षांनीही अगणित प्रश्न. आहेत. हे सारे प्रश्न गांभीर्याने सोडवू शकणारे नेतृत्व आपल्याला हवे आहे. हे सारे प्रश्न सोडवण्याऐवजी अद्यापही राजकिय पुढारी केवळ सत्तेचा खेळ खेळण्यात मग्न आहेत. हे नेते सत्तेतले असो किंवा विरोधी पक्षातील , त्यांना खरोखरच त्यात रस नाही. त्यामुळे त्यांना कोणालाही ते प्रश्न सोडवता येणं शक्य नाही. सत्तेसाठी प्रश्न लोबकळत ठेवायचे व त्याचा उपयोग पता मतं मागण्यासाठी करायचा यातून सर्वच पक्षांच्या नेत्यांनी आजपर्यत जनतेची पोर पसवणुक केली आहे.
         केवळ सभासमारंभातून मिरवणारे , आधारस्तंभ देऊन जनतेची फसवणुक करणारे , खालच्या थरावर जाऊन चिखलफेक करणारे , टीका करणारे , पैसा , जात - धर्माचा वापर करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे. त्यासाठी अशा परिवर्तन घडवणान्या नेतृत्वाचा उदय झाला पाहिजे , जो उत्तम धाडसी निर्णय घईल , प्रशासकिय सुधारणा घडवून आणणारे असेल. तो सामान्यांतूनच होईल , त्याचा शोध घेतला पाहिजे. अशा उमद्या नेतृत्वाची देशाला गरज आहे.

                :-  भास्करराव म्हस्के

No comments:

Post a Comment