How will inflation stop?
भाववाढ कशी थांबेल ?
आजकाल कोणतीही वस्तू घेण्यास बाजारात जा किंवा सेवा घेण्यास
कोणत्याही
कार्यालयात जा तसेच हॉस्पिटलमध्ये , वकिलाकडे , कॉन्ट्रैक्टरकडे , मग तो गवंडी असो , प्लंबर असो , पेंटर असो किंवा इलेक्ट्रीशियन असो , सर्वांचे उत्तर एकच परवडत नाही. अव्वाच्यासव्वा पैसे घेणारे भाजीवाले , फळवाले , किराणा भुसारवाले , मटण - अंडी - मासे विकणारे सर्व सांगतात , परवडत नाही . एवढी भाववाढ होऊनही सर्व विक्रेते व दुकानदार व्यापारी व सेवा
उद्योगवाले दोघेही म्हणतात , परवडत नाही . मग पैसा जातो कोठे ?
कोणताही नोकर ठेवा कितीही पगार द्या , प्रत्येक जण म्हणतो , परवडत नाही. पुन्हा पगारवाढीसाठी काही कारणे दाखवून अर्ज केला जातो . लगेच
पगारवाढ ही लागते . नाहीतर तो म्हणतो , चाललो मी , ही घ्या तुमची किती . आयटी उद्योगामुळे
सर्वांचेच पगार वाढले. राज्य व केंद्र सरकारी नोकरांची भरपूर पगारवाढ झाली . या
शिवाय भ्रष्टाचारामुळे मिळतो तो पेसा वेगळाच . तरीही म्हणतात पगार परवडत नाही .
शिक्षणासाठी एवढ्या भरमसाट देणग्या देऊनही शिक्षण सम्राट विद्यार्थ्यांना मूलभूत
सुविधा पुरवत नाहीत. तेही म्हणतात , परवडत नाही , घरबांधणी भाव तर गगनाला भिडलेले आहेत , तरीही बिल्डर म्हणतात , परवडत नाही . याचे कारण शोधले तर असे लक्षात येईल की प्रत्येकाच्या अपेक्षा
भरमसाट वाढलेल्या आहेत . अपेक्षेपेक्षा पैसा जास्त मिळावा असे प्रत्येकालाच वाटते
कारण प्रत्येकाचे राहणीमान उंचावलेले आहे.
याबाबत सखोल परीक्षण केले असता असे लक्षात येईल की , वस्तू भरपूर उपलब्ध आहेत , भावही वाढलेले आहेत . तरीही गिऱ्हाईक आहे व मालाचा तुटवडा पडतो . याचाच अर्थ बाजारामध्ये भरपुर भ्रष्टाचाराचा काळा पैसा आला आहे व तो रीतसर चलनातून बाहेर काढला तरच भाववाढ
खाली येईल , अन्यथा भरपूर माल बाजारात उपलब्ध झाला तरच किंमती खाली येतील आणि याच कारणामुळे भारतीय
अर्थव्यवस्था धोक्यात आल्याचा आभास निर्माण झाला आहे व तो कालांतराने आपोआप
ठिकाणावरती येईल व भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा एकदा मजबूत पायावरती उभी राहील .
-भास्करराव म्हस्के
No comments:
Post a Comment