Saturday, March 7, 2020

The Solution to financial scams and black money..?

The Solution to financial scams and black money?

आर्थिक घोटाळे व काळ्या पैशावर उपाय काय ?


गेल्या १० ते १५ वर्षांत आर्थिक साक्षरता असलेल्या प्रज्ञावंतांचा झालेला मानसिक बदल व त्यातून सुशिक्षित उच्चभ्रुनी  आर्थिक दरोडेखोरी केल्यामुळे जागतिक बाजारपेठेत आर्थिक असमतोल निर्माण झालेला आहे व त्याचे पर्यावसान हे आर्थिक मंदीमध्ये होणार आहे हे स्पष्ट आहे .
निरनिराळ्या क्षेत्रातील मक्तेदारांनी आपआपल्या सोईप्रमाणे बँकांचा उपयोग करून घेतला. मग त्यात भांडवली बाजारातील कमोडिटी मार्केट मधील सत्तावाद असेल बिल्डर्स असतील मोठमोठे उद्योगपती असतील मोठमोठे व्यापारी असतील तेल माफिया असतील अमली पदार्थांचे माफिया असतील अंडरवर्ल्डमधील बेनामी गुन्हेगार असतील राज्यकर्ते असतील, मोठमोठे कंत्राटदार असतील मोठमोठे जाहिरातदार असतील सिने सृष्टीतील लोक असतील क्रिकेटमधील फूटबॉल मधील सट्टेबाज असतील. या व अशा सर्वांनी खोट्या जुळवाजुळव केलेल्या कागदपत्रांच्या साहाय्याने खोटे स्टॉक दाखवून खोटे वार्षिक ताळेबंद दाखवून बँक कर्मचाऱ्यांच्या सहकार्यानेच आर्थिक बेबनाव केलेला आहे हे उघड आहे .
यासाठी रिझर्व बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन म्हणाले. त्याप्रमाणे  बँकांच्या आर्थिक शुद्धीकरणाची व प्रशासकीय बदलाची नितांत गरज आहे.

 जगातील प्रचंड काळा पैसा हा याच कारणामुळे निर्माण झालेला आहे. तो कोणत्याही परिस्थितीमध्ये चलनात आणणे अत्यंत आवश्यक आहे. चलन बदलण्याचे महाकर्म कठीण काम जगाला करावे लागणार आहे.
 या आर्थिक गुंडगिरीमुळे समाजामध्ये अती श्रीमंत आणि यांच्यामध्ये मोठी दरी निर्माण झालेली आहे. बँकांनी वेळोवेळी न केले  Physical audit  financial monitoring यामुळेच हा अनर्थ घडणार आहे. त्याचप्रमाणे आर्थिक गुन्हेगारांचे बँकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी असलेली अभद्र युती हीही या आर्थिक घोटाळ्यामागचे एक कारण आहे. तसेच राज्यकर्त्यांनी राजकारणात मिळवलेला अमाप पैसा चलनाबाहेर गेल्यामुळे त्यात आणखी भर पडली आहे .
 ही प्रक्रिया सुधारण्यासाठी अत्यंत कडक कायद्यांचीअत्यंत कठोर प्रशासनाची व शंभर टक्के पारदर्शी निर्णयांची व अंमलबजावणीची गरज आहे. आजची परिस्थिती अशी आहे की जो देश प्रथम आर्थिक शुद्धीकरण करेल तोच देश जगात पुढे जाईल. कदाचित तो देश आज प्रकाशातही नसेल.


 परदेशस्थ भारतीयांचा काळा पैसा भारतात आणण्यासाठी गेली अनेक वर्षे बँड वाजवला जात आहे तथापी काहीही ठोस कार्यवाही कोणाकडूनही अद्याप झालेली नाही माझ्या मते इतकी वर्ष चर्चा चालल्यानंतर परदेशी काळा पैसा ठेवणारी व्यक्ती किंवा संस्था तो पैसा तेथे ठेवील काय एव्हाना तो काढून त्याची विल्हेवाटही लागली असेल. त्यामुळे सदर काळा पैसा शोधून काढण्याच्या मोहिमेच्या पदरी निराशाच पडेल.
मला वाटते की परदेशी बँकांत काळा पैसा असेल तर त्याच्यापेक्षा कित्येक पटीने काळा पैसा आपल्या देशातच उपलब्ध आहे परंतु तो बाहेर काढण्याचा पद्धतशीर प्रयत्न सरकारकडून वृत्त वाहिन्यांकडून वृत्तपत्रांकडून अथवा कुठल्याही प्रसार माध्यमांकडून केला जात नाही.

प्रचंड काळा पैसा उपलब्ध आहेहे माहिती असून व सरकारला मूलभूत  सुविधांसाठी प्रचंड पैशाची आवश्यकता आहे हे माहिती असूनही सरकार चाणाक्षपणे हा काळा पैसा चलनात आणण्याचा प्रयत्न का करीत नाही याचेच सखोल आश्चर्य वाटते. माझ्या मते कुणाकडे किती काळा पैसा आहे. तो कसा आला आहे कुठल्या प्रदेशात तो गुंतवला आहे ती व्यक्ती कोण आहे याचा काहीही विचार न करता सरकारने दहा वर्षांसाठी बिनव्याजी बॉन्ड्स काढावेत दहा वर्षांनंतर ते कुठलाही टॅक्स न लावता चलनात आणावेत सदर काळा पैसा उघड केल्यामुळे कोणावरही कसलीही कायदेशीर कारवाई करू नये त्याचे कारण एकच - राष्ट्र उभारणीसाठी सदरचा काळा पैसा वापरला जाणार आहे म्हणून सर्व गुन्हे माफ हा नियम ठेवल्यास भारतातील उदंड काळा पैसा चलनात येईल तो मोजणे कित्येक महिने बँकांना शक्य होणार नाही.


काळा पैसा उगमाचे स्रोत
१. सोने चांदी हिरे
२. फ्लॅट बुकींग
३. जीवनावश्यक वस्तू साठेबाजी
४.  सरकारी खाजगी सहकारी क्षेत्रातील नोकरशाही.
५. ग्रामपंचायत - तालुका पंचायत समिती जिल्हा, राज्यसरकार केंद्र सरकार यामधील राजकारणी त्यांचे दलाल चमचे . उपचमचे कार्यकर्ते.
६. भारतातील देवालये - सत्यसाई शिर्डी तिरूपती इ .
७. किंमती धातू स्टॉक स्टील प्लॅटीनम इ .
८. इलेक्ट्रॉनिक्स गुडस्
९. कमॉडिटी मार्केट
१०. शेअर मार्केट हवाला
११. घोड्यांच्या शर्यती जुगारांचे अनेक प्रकार
१२. जमिनी खरेदी - विक्री
१३. आयकर न भरणारा सेल्सटॅक्स न भरणारा छोटा व्यापारी वर्ग भाजीपाला किराणा फळविक्रेते किरकोळ भाजी विक्रेते, पधारीवाले भेळपाणीपुरीवाले यांच्याकडे निव्वळ बेहिशोबी पैसा फिरत असतो.
१४. अक्टर्स आर्किटेक्ट टॅक्स कन्सल्टंट वकील इंजिनिअर पावती न देणारे.
१५. कापडविक्रेते तयार कपडे विक्रेते .
१६. निर्यात माल कमी किंमत लावून फरक परदेशी चलनात परदेशांत घेणारे.
१७. बिनतारांकित हॉटेल ढाबे खाणावळी
१८. पेट्रोल पंप
१९. वेश्या व्यवसाय
२०. क्रिकेट सिनेमा नाटक कार्यक्रम तिकीट विक्रीचा काळा बाजार
२१. शिक्षण क्षेत्रातील अँडमिशन - सर्वात मोठा काळा बाजार
२२. अंडी मांस यांचे किरकोळ ठोक विक्रेते
२३. मार्केट यार्डातील सर्व शेती माल विक्रेते
२४. ट्रक व्यवसाय टॅक्सी व्यवसाय रिक्षा व्यवसाय
२५. कॉम्प्युटरमुळे होणारे आंतरदेशीय पैशांचे व्यवहार
२६. परदेशाबरोबर खाजगी औद्योगिक सरकारी व्यापारी करार व कमिशन
२७. परदेशी विमान प्रवासी आगबोट प्रवासी, कस्टम अधिकारी
२८. अंमली पदार्थांचा व्यापार करणारे
२९. डॉलरचा फरक १९६० पासून जाणवत गेला . त्यामुळे काळा पैसा  निर्माण झाला .
३०. गंगवार सुपार्या दहशतवाद करणाऱ्या देशांतर्गत व जागतिक टोळ्या व त्यांचे घातकी प्रकार बिन लादेन वगैरे .
 ३१. सागरी भूपृष्ठ विमान वाहतुकीतून होणारी तस्करी स्मगलिंग
३२. वाळू माफियातेल माफिया लॅन्ड माफिया




                                                                 -भास्करराव म्हस्के






















No comments:

Post a Comment