Saturday, February 29, 2020

Appeal and challenge आवाहन आणि आव्हान

 सर्वपक्षीय राज्यकर्त्यांना कळकळीचे आवाहन


                वातावरणातील अकस्मित बदल ग्लोबल वॉर्मिंग आणि जगाला भयभीत करणारा करणा-या दोन समस्या जगातील सर्व क्षेत्रामध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण करणाऱ्या आहेत .त्याच्यावर देशातील सर्व थरातील संशोधकांना आकर्षक बक्षिसे देण्याचे आश्वासन देऊन त्यासाठी लागणारी अत्यावश्यक साधनसामुग्री तातडीने पुरवण्याची जागा व पैसा उपलब्ध करून या संकटांना तोंड देण्यासाठी तात्काळ पावले उचलली नाही तर कुणालाही नियंत्रणात आणता येणार नाही अशी सामाजिक, राजकीय ,आर्थिक परिस्थिती निर्माण होईल.

                   डॉक्टर, दवाखाने ,नर्सेस ,मदतनीस, वॉर्डबॉय, चाचणी घेणाऱ्या प्रयोगशाळा ,पॅथॉलॉजी लॅबोरेटरी यांची प्रचंड उणीव भासेल ,म्हणून वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड गुंतवणूक करावी लागेल. दवाखाने अद्यावत करावे लागतील. वैद्यकीय ज्ञानाची तात्काळ देवाण-घेवाण करावी लागेल .राजकारणाच्या चाललेल्या खेळांना स्थगिती द्यावी लागेल व सर्व पक्षीय मतभेद बाजूला ठेवून आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण करावी लागेल.

                   प्राप्त परिस्थितीमुळे कृषी क्षेत्रावर प्रचंड परिणाम होणार आहे. कोणत्याही देशाला लष्करावर करत असलेल्या महाप्रचंड खर्चात कपात करून तो खर्च वरील गोष्टींसाठी वापरावा लागणार आहे. कारण मानवजातीचे अस्तित्वच संपल्यावर व कोणत्याही राष्ट्राची मानसिकताच संपल्यावर इतर देशावर आक्रमण करण्याची वेळच येणार नाही. ज्यादा लोकसंख्येचा व जादा प्रदेशाचा विकास करावयाचा असल्यास सर्व सुविधा कमी पडतील म्हणून लढाईची भीती सर्व जगाला सोडून द्यावी लागेल व संरक्षण सर्वात महत्त्वाचे राहील .

                     प्रत्येक देशाला आपली लोकसंख्या आणि आपल्या प्रदेश आंतर्गत सोयीसुविधा यावर भर द्यावा लागेल तेव्हा शाहू-फुले-आंबेडकर, शिवाजी महाराज, प्रभुरामचंद्र, महात्मा गांधी ,गणपती उत्सव ,शारदोत्सव ,धार्मिक स्थळांवर होणारा खर्च अशा भावनात्मक बाबी यावर होणारा अनावश्यक खर्च त्यांच्या स्मारकासाठी, पुतळ्यासाठी होणारा महाभयंकर खर्च याला फाटा द्यावा लागेल.

           
         या वरील दोन गोष्टींसाठी भारताने पुढाकार घेण्याची गरज आहे.  आधुनिक औषधापेक्षा हे आयुर्वेदा मुळे कदाचित या रोगाला सामोरे जाण्याचे गणित सुटेल आयुर्वेदामध्ये काम  करणाऱ्या पतंजली सारख्या संस्था व आयुर्वेद संबंधी शिक्षण देणाऱ्या संस्था यांनी पुढाकार घेतल्यास व एक कलमी कार्यक्रम समजून त्यावर भारतामधील असलेले बौद्धिक चातुर्य कदाचित जगाला या आपत्तीतून वाचवू शकेल व सर्वश्रेष्ठ भारत ही सज्ञा खऱ्या अर्थाने अस्तित्वात येईल.

                   इतिहासाचे गोडवे मतांच्या बेरजा वजाबाक्या करतील पण वर्तमान आणि भयानक भविष्य यावर औषध देणार नाहीत हे सर्वांनी लक्षात घ्यावे. एवढेच कळकळीचे आवाहन मी सर्व राज्यकर्त्यांना करतो. तसेच सध्या राजकीय सामाजिक अशांतता झाली आहे. याचे मूळ कारण प्रचंड आर्थिक असते मध्ये आहे त्याचे गणित राज्यकर्त्यांना समजले उमजले तर अनेक राजकीय पेच प्रसंग, मोर्चे ,आंदोलने ,हिंसाचार आपोआप शमेल असे मला वाटते.

 भास्करराव म्हस्के

How will inflation stop? (भाववाढ कशी थांबेल ?)


How will inflation stop?
भाववाढ कशी थांबेल ?


          आजकाल कोणतीही वस्तू घेण्यास बाजारात जा किंवा सेवा घेण्यास कोणत्याही कार्यालयात जा तसेच हॉस्पिटलमध्ये वकिलाकडे कॉन्ट्रैक्टरकडे मग तो गवंडी असो प्लंबर असो पेंटर असो किंवा इलेक्ट्रीशियन असो सर्वांचे उत्तर एकच परवडत नाही. अव्वाच्यासव्वा पैसे घेणारे भाजीवाले फळवाले किराणा भुसारवाले मटण - अंडी - मासे विकणारे सर्व सांगतात परवडत नाही . एवढी भाववाढ होऊनही सर्व विक्रेते व दुकानदार व्यापारी व सेवा उद्योगवाले दोघेही म्हणतात परवडत नाही . मग पैसा जातो कोठे ?


     कोणताही नोकर ठेवा कितीही पगार द्या प्रत्येक जण म्हणतो परवडत नाही. पुन्हा पगारवाढीसाठी काही कारणे दाखवून अर्ज केला जातो . लगेच पगारवाढ ही लागते . नाहीतर तो म्हणतो चाललो मी ही घ्या तुमची किती . आयटी उद्योगामुळे सर्वांचेच पगार वाढले. राज्य व केंद्र सरकारी नोकरांची भरपूर पगारवाढ झाली . या शिवाय भ्रष्टाचारामुळे मिळतो तो पेसा वेगळाच . तरीही म्हणतात पगार परवडत नाही . शिक्षणासाठी एवढ्या भरमसाट देणग्या देऊनही शिक्षण सम्राट विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा पुरवत नाहीत. तेही म्हणतात परवडत नाही  रबांधणी भाव तर गगनाला भिडलेले आहेत तरीही बिल्डर म्हणतात परवडत नाही . याचे कारण शोधले तर असे लक्षात येईल की प्रत्येकाच्या अपेक्षा भरमसाट वाढलेल्या आहेत . अपेक्षेपेक्षा पैसा जास्त मिळावा असे प्रत्येकालाच वाटते कारण प्रत्येकाचे राहणीमान उंचावलेले आहे.


    याबाबत सखोल परीक्षण केले असता असे लक्षात येईल की वस्तू रपूर उपलब्ध आहेत भावही वाढलेले आहेत . तरीही गिऱ्हाईक आहे व मालाचा तुटवडा पडतो . याचाच अर्थ बाजारामध्ये भरपुर भ्रष्टाचाराचा काळा  पैसा आला आहे व तो रीतसर चलनातून बाहेर काढला तरच भाववाढ खाली येईल अन्यथा भरपूर माल बाजारात उपलब्ध झाला तरच किंमती खाली येतील आणि याच कारणामुळे भारतीय अर्थव्यवस्था धोक्यात आल्याचा आभास निर्माण झाला आहे व तो कालांतराने आपोआप ठिकाणावरती येईल व भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा एकदा मजबूत पायावरती उभी राहील .


-भास्करराव म्हस्के






Friday, February 28, 2020

Remedies for drought relief...( दुष्काळमुक्तीसाठी उपाय)


  Remedies for drought relief...( दुष्काळमुक्तीसाठी उपाय)                


                           दुष्काळमुक्तीसाठी उपाय



 १ . मर्यादित ऊस लागवड करावी .
 २ . ड्रिप वापरणाऱ्या उत्पादकांचाच ऊस साखर कारखान्यासाठी घ्यावा .
 ३ . अपूर्ण पाटबंधारे कालव्यासह पूर्ण केली पाहिजेत .
 ४ . कालव्यांचे अस्तरीकरण करायला हवे .
 ५ . शहरात मोजून पाणी दिले पाहिजे .
 ६ . मोठमोठ्या नगरपालिकांच्या भोवतालची गावे समाविष्ट न करता स्वतंत्र ग्रामपंचायत            टाऊनशिपसाठी ग्रामपंचायतीतील टी . पी . अँक्टप्रमाणे सर्वाधिकार देऊन स्वतंत्र                  पंचायतीस वाढू द्यावे व शहरांची वाढ मर्यादित ठेवावी .
७ . उद्योग क्षेत्राला स्वतःच्या पाणी स्त्रोतांचा नियम करावा ,
 . समान किमान पाणी वाटपाचे सूत्र ठरवावे .

९ . पाणी प्राधान्यक्रम अग्रहक्रमाने अमलात आणायला हवा ,
            १० . बि . ओ . टी . तत्वावर अपूर्ण पाटबंधारे पूर्ण करायला हवेत ,
११ . पाण्याचा गैरवापर हा दखलपात्र गुन्हा समजला जावा ,
१२ . पाण्याचे महत्त्व हे प्राथमिक शिक्षणापासून थेट पदवी परीक्षेपर्यंत टप्प्याटप्याने शिकवले            जावे .
१३  सांडपाणी रिसायकल करून कार्यक्षम पध्दतीने वापरण्यासाठी स्पर्धात्मक निबंध                    मागवावेत.
१४ . खोरेनिहाय पाणीवाटप तंट्यासाठी न्यायनिवाडा करणारी न्यायसभा निर्माण करावी .               न्यायमंडळे , लोकन्यायालय , लवाद इ . नेमायला हवेत .
१५ . कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांसाठी संशोधनास भरपूर प्रोत्साहन द्यायला हवे .
१६ . धरणातील पाणी कालव्यातून शेतापर्यंत जाताना उघड्या कॅनॉलमधून जाते . ते बंद                पाइपातून करणे खर्चिक असले तरी आवश्यक आहे . गुजरात सरकारने कालवे सोलार              पॅनेलने झाकून दोन उद्देश साध्य केले आहेत . एक विद्युत निर्मिती व दुसरे पाण्याचे              बाष्पीभवन थांबवणे .


 १७ . कालव्यावरून फ्लाय-ओव्हर घेऊन अग्रो एक्सप्रेस वेज निर्माण करून सरकारला आणखी प्रगत पाऊल पुढे टाकता येईल . .
 १८ . भूपृष्ठाखाली प्रचंड जलसाठे , कृत्रिम धरणे तयार करायला हवेत . ब्राझीलमध्ये अशी धरणे आहेत .
 १९ . नद्याजोड , खोरेजोड आणि धरणजोड प्रकल्प यावर सखोल विचार होण्याची आवश्यकता आहे . कारण , सध्याच आपण कृष्णेचे पाणी उजनीपर्यंत पोहोचवलेले आहे . त्याचाही विचार व्हायला हवा होता . तद्वत , खोरे - निहाय पाणी वळविणे करावे लागणार आहे . 


 . २० . पाण्याच्या प्राधान्यक्रमाविषयी काय सूत्र असावे . पिण्याचे पाणी , अत्यावश्यक कृषी उत्पादने , उद्योग , फळबागा , ऊसशेती , विद्युत निर्मिती , नौकानयन यांची क्रमवारी ठरवणे आवश्यक आहे .
. २१ . तसेच पिण्याच्या पाण्याची टंचाई राजकारणाच्या पलीकडे गेल्याशिवाय संपणारच नाही . त्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन सामुदायिक निर्णय पेण्याची गरज आहे व त्यामध्ये खालील निर्णय घ्यावे लागतील. शहरांची वाढती लोकसंख्या , वाढता पसारा कडक कायदे करून धांबवावा लागेल.

 *कारखानदारी खेड्याकडेच वळवावी लागेल . ऊस कारखानदारी मर्यादित क्षेत्रातच ठेवावी लागेल . सध्याच्या क्षेत्राच्या १ / ३ क्षेत्रातच ठेवावी लागेल . उसाला पाणी १०० % ड्रीप इरिगेशननेच द्यावे लागेल .
शहरातील सांडपाण्याची प्रक्रिया कार्पोरेशनकडून सक्तीने करून घ्यावी लागेल .
शहरामध्ये घरोघरी रिसायकलिंगचे पाण्याचे शुद्धीकरण करण्याची प्रक्रिया जबरदस्तीने करावी लागेल .
 धरणातील , कालव्यातील व शेतीतील पाणी बाप्पीभवनामुळे ३५ % वाया जाते त्याएवजी solar pannel धरणावर टाकल्यास बाष्पीभवन थांबेल व वीज निर्मिती होईल , कॅनोल वर fly over टाकल्यास कृषी मालवाहतुकीसाठी स्वतंत्र रस्ते तयार होतील व बाष्पीभवन थांबेल . शेतावर मल्चिंग ( आवरण ) केल्यास पिकांना फार वेळा पाणी द्यावे लागणार नाही .
 जल साक्षरतेचे धडे बालवाडीपासून ते पदवी परीक्षेपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातून द्यावेच लागतील .
 पाण्याचा वापर पुनर्वापर याचे लोकशिक्षण देण्याची गरज .
. कमी पाण्यात येणाऱ्या बियाणांची निर्मिती करावी लागेल .
 कोणतेही कृषी उत्पादन लागवडीपासून ते हंगामापर्यंत येईपर्यंत किमान काळ कसा लागेल यावर भरीव संशोधनाची गरज .
 समान किमान पाणी वाटपाचे सूत्र ठरवावेच लागेल , त्यात जिरायत बागायत शेतकरी - ग्रामीण , शहरी नागरिक ह भेदभाव ठेवता येणार नाही .
जलसंधारणाच्या प्रयोगामध्ये महाराष्ट्रामध्ये गेल्या ३० ते ४० वर्षात पाझर तलावापासून आजपर्यंत निरनिराळे प्रयोग झाले त्यावर २ लाख कोटी एवढा प्रचंड खर्च झाला आहे . तरीही पाणी प्रश्न आवाक्यात येत नाही , याचाच अर्थ कुठेतरी जलसंधारण भरकटलेले आहे , आणि व्यक्तीगत झाले आहे , त्याला शास-शुद्ध पायावर नव्याने दिशा दयावी लागेल .
अपूर्ण पाटबंधारे योजनांसाठी खाजगीकरणाच्या माध्यमातून कर तोडगा काढलाच पाहिजे , नाही तर सिंचन घोटाळे होत राहणारच , तर मग कार्य - कुशलतेने खाजगी संस्था पाईपलाईनने पाणी देऊन त्यावर संपूर्ण कब्जा ठेवू शकते , त्यासाठी गरज आहे ती वास्तव योजना मांडणाऱ्या तज्ञाची .
महाराष्ट्रातील नामवंत जलतज्ञांनी सरकारला नसता सल्ला , तपासण्या , नुसते कागदी रिपोर्ट न देता नेमके वास्तव नियोजन सांगितले पाहिजे . जागतिक दर्जाचे जलतज्ज्ञ महाराष्ट्रामध्ये उपलब्ध असताना महाराष्ट्रातील पाणी प्रश्न गेली ५४ वर्ष सुटत नाही हा दैवदुर्विलास आहे असे माझे ठाम मत आहे .
नदीकडेला व कॅनोलच्या कडेला भूपृष्ठावर व भूपृष्ठाखाली प्रचंड जल साठे करावे लागतील . वेळप्रसंगी मोठी धरणे , छोटी धरणे , नद्या , नाले , खोऱ्यांचा विचार न करता भूगर्भातून एकमेकांना जोडावे लागतील तसेच भूपृष्ठाखाली आणि भूपृष्ठामध्ये पाणी साठवण्यासाठी प्रचंड पाणी साठे तयार करावी लागतील .
सर्व स्तरांवरील पाणी वापराची जलनीती कायद्याने ठरवावी लागेल . पाण्याचा गैरवापर हा दखलपात्र गुन्हा ठरवला जावा व त्या गुन्ह्यास जबरदस्त शिक्षा ठेवली जावी , मग तो ऊस शेतकरी असो किंवा शहरातील अलिशान flat मध्ये राहणारा नागरिक असो .
भूगर्भातील खडकाप्रमाणे ढोबळमानाने विंधन विहिरींची खोली मर्यादित ठेवण्याचा कायदा करावा , तसेच विहिरींच्या खोल्या मर्यादित ठेवल्यास भूगर्भातील पाण्याचे काही अंशी सम प्रमाणात वाटप होणे शक्य आहे .

महाराष्ट्रातील सर्व जलाशयांचे त्यात छोटी धरणे , पाझर , तलाव , कोल्हापूर टाईप बंधारे , शेततळे यामधून बाष्पीभवनामुळे १ / ३ पाणी वाया जाते , त्यासाठी Hydroelectric Power निर्माण करणाऱ्या धरण साठ्यावर Flexible Solar Panel टाकल्यास बाष्पीभवनामुळे वाया जाणारे पाणीही वाचेल व महाराष्ट्राला पाहिजे तेवढी विद्युत निर्मितीही होईल . अशा प्रकारचे प्रकल्प फ्रान्समध्ये झालेले आहेत . फ्रान्समधील कंपन्या भारतात येऊन गुंतवणूक करण्यासही तयार आहेत .

                                                    - भास्करराव म्हस्के

Wednesday, February 26, 2020

Measures to reduce the delay in judgment?

  Measures to reduce the delay in judgment?

न्यायदानातला विलंब कमी करण्यासाठी उपाय काय ?




Ø ज्याप्रमाणे सरकारने नोटरीची नेमणूक केली त्याच धर्तीवर वकिलांच्या सिनिऑरिटीप्रमाणे त्यांना न्यायदानाचे अधिकार प्रदान करावेत व प्रलंबित खटले निकाली काढावेत .
Ø  जसे ५ - १० वर्षे पॅक्टीस केलेल्या वकिलांना सिनिअर डिव्हीजन स्मॉल कॉज कोर्टाचे अधिकार द्यावेत.


Ø   १० - २० वर्षे पॅक्टीस केलेल्या वकिलांना सिनिअर डिव्हिजनचे काम द्यावे . २५ - ३० वर्षे पॅक्टीस केलेल्या वकिलांना डिव्हिजनल जज यांचे काम द्यावे.
 Ø   ३० वर्षांपुढील पॅक्टीस केलेल्यांना हायकोर्ट बेंचचे काम द्यावे.



Ø  अर्थात अशा नेमणुका करताना काही निकष आणि काही आचारसंहिता ठरवावी लागेल .

Ø  निकष ठरवितांना दरवर्षी त्या वकिलाने चालविलेल्या व निकाली काढलेल्या खटल्यांच संख्या लक्षात घेतली जावी .



Ø  सदर नवनियुक्त ॲडव्होकेट व जजेसची नेमणूक दोन्ही बाजूंच्या संमतीने व्हावी .

Ø  जज्जाचे काम करणाऱ्या वकिलांच्या दाव्याच्या कामी त्यांचे संबंधित असिस्टंट वकील यांना भाग घेण्यास मनाई करावी .




Ø  त्याच धर्तीवर पुष्कळ केसेस तांत्रिक बाबीवर अवलंबून असतात. जसे,  इंजिनिअरिंग बेस , मेडिकल बेस , बँका , जमीनजुमला , प्रॉपर्टी , सरकारी कामासंबंधी , अशा वेळी तज्ज्ञ इंजिनिअर , डॉक्टर्स , आय.ए.एस . आधिकारी , फौजदारीमध्ये आय . पी . एस . अधिकारी इ . अनुभवी मंडळींना असे जज्ज नेमण्यास हरकत नाही .






                                          




Ø  याच्याच जोडीला १९४० चा लवाद कायद्याचे सोपे सुटसुटीत विस्तारीकरण केले तरीही केसेस झटपट होतील . लोकन्यायालये , कौटुंबिक न्यायालये , सहकार न्यायालये , ग्रामन्यायालये , औद्योगिक न्यायालये एवढ्या विभागण्या होऊनही कार्यक्षमतेने कामाचा निपटारा होत नाही , हे सर्वश्रुत आहे .


                                            - भास्करराव म्हस्के

Tuesday, February 25, 2020

आदित्य ठाकरे .......एक भवितव्य (aditya ....a Future)

          काल दिनांक 22. 2. 20 रोजी आपली एबीपी 
माझा वरील प्रकट मुलाखत ऐकली पाहिली.आपण अनेक गोष्टी 
आत्मसात करण्याचा जो प्रयत्न करत आहात तो अभिनंदनीय 
आहे. प्रश्न कोणीही मांडू शकतात.
व महाराष्ट्रात बरेचसे  नेतृत्व प्रश्‍नांच्या पार्श्वभूमीवर जन्माला 
आलेले आहेत .तथापि गेल्या साठ वर्षांत महाराष्ट्राचे अनेक प्रश्न 
सुटलेले नाहीत. ग्रामीण गरिबी आणि शहरी श्रीमंती यामध्ये जमीन-
अस्मानाचा फरक आहे. 

             लोकसंख्या ,ग्लोबल वॉर्मिंग ,जंगलाची वाढकृषी 
क्षेत्राची परवड ,पाण्याचे किमान समान वाटपाचे सूत्रदीर्घकालीन 
मेट्रोच्या योजनांमुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी ,शहरातील 
हवेतील प्रदूषणग्रामीण शहरी तरुण मंडळींचा बेरोजगारीमुळे निर्माण
झालेला असंतोष ,स्त्रियांवरील अत्याचार ,धार्मिक जातीय 
तणाव ,साठ वर्षे होऊनही दोन कोटी ग्रामीण महिलांना 
तासंतासदिवसेंदिवसपाण्यासाठी खर्च करावे लागतात त्यामुळे 
होणारा मनुष्यबळाचा ऱ्हासकोर्टातील अक्षम्य दिरंगाई ,आपत्ती 
संरक्षणाची अपुरी साधने व पथकेभिजत पडलेला सीमावाद ,असे 
अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत .

              आता महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने अभ्यासू उत्तरदायी
 सकारात्मक विचार करणाऱ्या परंतु संयमी उत्तरदायी नेतृत्वाची 
गरज आहे. म्हणून आपण पर्यावरण आणि पर्यटन ही दोन्ही खाती 
अवघड आहेत व महत्त्वाची आहेत ती यशस्वीरीत्या हाताळू शकाल 
अशी आपल्या मुलाखाती वरून माझी समजूत झाली आहे. 

              मी 82 वर्षीय स्थापत्य अभियंता असून पाणी 
शेती सहकार सामाजिक आर्थिक राजकीय परिस्थिती याबाबत 
गेली 60 वर्ष जागरूकपणे लिहीत आलेलो आहे. व उपरोक्त 
विषयावर मी गेले पन्नास वर्ष बरेच लिखाण केले आहे व कृषी 
क्षेत्रामध्ये स्ट्रॉबेरी व स्वीटकॉर्न ही पिके महाराष्ट्रात चालू केली 
आहेत . तीस वर्ष त्यात भरपूर प्रगती केली आहे व आणखी प्रगती 
होणे शक्य आहे. सदर विषयांमध्ये मी वेळोवेळी केलेल्या बहुमूल्य 
सूचना या फडणीस सरकारने अजिबात विचारात घेतल्या नाहीत. 
त्यामुळे महाराष्ट्रात मोठी पिछेहाट झाली. मी आपल्याशी संपर्कात 
राहील व एकावेळी एक विषयाची मांडणी आपल्यासमोर करीन. 

           आपण त्यावर जरूर ॲक्शन घ्याल अशी आशा आहे. 
कै. यशवंतराव चव्हाण यांनी 25.12. 1960 रोजी मी वालचंद 
इंजिनिअरिंग कॉलेजचा विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष असताना
वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त त्यांना निमंत्रण दिले असताना त्यांनी 
मला आग्रहाने राजकारणात येण्याची आज्ञा केली होती.तथापि एका 
प्राथमिक शिक्षकांचा मुलगा सहा भावंडांचे कुटुंब त्यामुळे घरची 
नाजूक आर्थिक परिस्थिती म्हणून मला तात्काळ नोकरी पत्करावी 
लागली व मी नगर शहराचे शहर अभियंता म्हणून काम स्वीकारले 
.हे फक्त आपल्या माहितीकरता कळवत आहे माझी दहा प्रकाशित 
पुस्तके आपल्याला मार्गदर्शक ठरतील त्यापैकी काही पुस्तके मी 
मुख्यमंत्र्यांना पाठवीत आहे व ती तुम्ही जरूर वाचून पहावीत.


 कळावे आपला,
भास्करराव म्हस्के