Saturday, March 14, 2020

Sick Small Businesses and their solution .....?


 आजारी छोटे व्यवसाय - उद्योगांच्या गंभीर समस्येवर उपाय काय ?



 महाराष्ट्रातील आजारी छोट्या उद्योगांची संख्या दिवसोंदिवस वाढत  चालली आहे. वेळीच उपाय केले नाहीत तर हा प्रश्न खूपच गंभीर बनेल . हे  उद्योग  आजारी पडण्याची कारणे पुढीलप्रमाणे


नियोजनातोल अपूर्णता
 छोटा व्यावसायिक हा अनुभवी असतो . त्याला एकट्याला  सर्व भूमिका पार पाडाव्या लागतात. त्यामुळे नियोजन करतांना दुरदृष्टीचा अभाव असतोस्वाभाविकच नियोजनात गंभीर चूका होतात आणि त्यामुळे कारखाना हळूहळू आजारी पडतो.

 व्यवस्थापनातील अडचणी
 त्याला एकट्याला सर्व भूमिका पार पाडावयाच्या असल्याने व्यवस्थापन करणे अवघड जाते. तो स्वतः एकवेळ तंत्रज्ञ असेल तर व्यवस्थापक नसेल आणि व्यवस्थापक असेल तर उत्तम विक्रेता नसेल आणि तिन्ही गोष्टी एकत्र सापडणे मुष्कील. अरे स्वतंत्र माणसाची नियुक्ती करावी म्हटले तर परवडत नाही. शिवाय हे तिन्ही गुण एकत्र असणारा एखादा निघाला तर त्याला जमाखर्चाच्या ज्ञानाचे अंग नसेल तर सगळाच निकाल लागला. तर त्याही गोष्टीमुळे अडचणी निर्माण होतात.

अपुऱ्या ज्ञानाने अडचणी
बरेच छोटे कारखाने सुरवातीला ठीक चालतात. पुढे त्यांना तांत्रिक  ज्ञानाची अडचण पडते. संशोधन त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आणि त्यामुळे मोठ्या कारखान्यांच्या चढाओढीत तो टिकू शकत नाही. मोठा कारखानदार किंवा प्रगत छोटा उद्योगपती या सगळ्या गोष्टींची काळजी घेतो . धंद्यातील संशोधनाचे ज्ञान माहिती असणे अत्याआवशक असते.

 दर्जा नियंत्रणाची सोय नाही
बऱ्याच छोट्या कारखानदारांकडे दर्जा नियंत्रण किंवा गुणवता नियंत्रणाची सोय नसल्याने त्यांच्या मालाचा दर्जा एकसारखा राहात नाही आणि त्यामुळे मालाच्या तक्रारी वाढतात. पर्यायी त्यांच्या विक्रीवर परिणाम होतो कारखाना आजारी पडतो.

बिले लवकर मिळत नाहीत
मोठ्या उद्योगांवर अवलंबून असणाऱ्या छोट्या उद्योगांना मोठ्या उद्योजकांकडून बिले लवकर मिळत नाहीत आणि जास्त तगादा करावा तर ऑर्डर जाण्याची शक्यता असते आणि वेळेवर बिले न मिळाल्यामुळे आर्थिक अडचणी उद्भवतात . पर्यायी कारखाना अडचणीत येतो.


आर्थिक संस्थांचे अडवणुकीचे धोरण
 बँका एम. एस. एफ. सी. सारख्या संस्था छोट्या उद्योगांचे अर्ज लवकर निकालात काढत नाहीत. पर्यायी जमवाजमव केलेला पैसा इकडेतिकडे जातो . तोपर्यंत बाजारभाव वाढलेले असतात व योजना परत पुन्हा दुरूस्त करावी लागते. पुन्हा भांडवलाचा प्रश्न येतो. असा या दुष्टचक्रात तो सापडतो.


इमारत व जागा
 यावरील खर्च हा खरोखर छोट्या उद्योगाला परवडत नाही. यासाठी बँका पैसेही देत नाहीत. त्यामुळे त्याकडे असलेली रक्कम इमारतीत व जागेत चुकीच्या अंदाजपत्रकामुळे संपुन जाते व धंदा अडचणीत येतो.

विक्रीकर
 बऱ्याच उद्योजकांना करांबद्दल गंभीरपणे विचार करायची सवय नसते. त्यामुळे विक्रीकर ग्राहकाकडून वसूल केला जातो. तो कचेरीत भरला जात नाही व पर्यायी एकदम रक्कम भरणे शक्य होत नाही आणि मग या कराची रिकव्हरी सुरू होते. त्याचे अकाऊंटला अटेचमेंट येते आणि मग बँका त्याच्याकडे संशयाने पाहू लागतात.

कच्च्या मालाचा तुटवडा
कच्च्या मालाच्या पुरवठ्याची उद्योग संचनालय कधी हमी घेत नाही. त्यामुळे कधी कधी फार पंचाईत होते. विशेषतः सिमेंटप्रणित उद्योगची तर फारच अडचण होते. टाईल्स पाईप्स ,प्रीकास्ट स्लॅबवाले इ. लोकांना सिमेंट तुटवड्यामुळे दुहेरी भार बसतो. बांधकाम थंडावल्यामुळे मागणी कमी होते व कच्च्या मालाचा कोटा नसल्यामुळे उत्पादन थांबते याही कारणामुळे अनेक कारखाने आजारी पडले आहेत.

कर्जाचा दुरुपयोग
 छोट्या उद्योगांसाठी बँकांचे धोरण शिथिल असल्यामुळे प्रथमत: कर्ज मिळण्यास अडचण होत नाही. म्हणून या संस्थांकडून जरुरीपेक्षा जादा कर्ड घेऊन ते इतर ठिकाणी गुंतवणूक केल्यामुळे किंवा खर्च करून टाकल्यामुळे सर्व कर्जाचा व परतफेडीचा बोजा पडल्यामुळे अनेक उद्योग अडवणीत येतात.


जरुरीपेक्षा जास्त मशिनरी व स्टाफ
अनेक कारखानदार उद्योग चालण्यापुर्वी त्याच्या विस्ताराची योजना करून अपेक्षित मशिनरी घेवून ठेवतात. जरुरीपेक्षा जास्त माणसे नोकरीस ठेवतात. त्यामुळे खर्चाच्या अडचणी येतात.

-    भास्करराव म्हस्के

No comments:

Post a Comment