Monday, March 2, 2020

Remedies on sick factories


                                                       Remedies on sick factories

आजारी कारखान्यांवर उपाययोजना


१ . उद्योग संचालनालयात स्वतंत्र विभागाची स्थापना - उद्योगामध्ये परिपूर्ण अभ्यास असणाऱ्या व्यक्तीच्या सहाय्याने एक स्वतंत्र समिती उद्योग संचालयाने नियुक्त करावी . शिवाय या समितीच्या हाताखाली स्वतंत्र विभाग स्थापावा . त्यासाठी आय . ए . एस . अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी , अशा सर्व आजारी कारखान्यांनी निदानासाठी अर्ज कारावेत . ह्या सर्व तंत्रज्ञांनी आजारी कारखान्यांचा परिपूर्ण अभ्यास करून निदान ठरवावे व नंतर बँकेला शिफारस करावी . सदर समितीत बँका , चेंबर ऑफ काँग्रेस , असोसिएशनचे प्रतिनिधी आणि अशा आजारी कारखान्यांचे प्रतिनिधी यांचाही समावेश करावा . शक्य असल्यास काही आजारी कारखानदारांना एकत्रपणे अथवा स्वतंत्रपणे मुलाखतीस बोलवावे .

२ . संशोधन केंद्रे - संशोधन केंद्रे व गुणनियंत्रण चाचणी शाळा अविकसित भागात स्थापणे . छोट्या उद्योगासाठी मुंबई सोडून अविकसित भागात अशा गुण नियंत्रण चाचणी शाळा व संशोधन केंद्रे ठेवल्यास उद्योजकांना दिलासा मिळेल .

 ३ . स्टार्टअप इंडियानुसार सरकारने उत्पादन सुरू केल्यापासून ३ वर्षे आय कर माफ असे म्हटले आहे , पण ते १० वर्षे माफ असणे आवश्यक आहे . कारण त्यानंतरच बऱ्याच चढ उताऱ्या नंतर व्यवसायाची खरी सुरुवात होत असते .


                                                                                                                   - भास्करराव म्हस्के

















No comments:

Post a Comment