Wednesday, March 25, 2020

Hill dam scheme


             टेकडी
धरणे योजना


     कायमचा दुष्काळ हटवण्यासाठी अपूर्ण धरणे पूर्ण करूनही पाण्याची गरज भागणार नाही म्हणून पावसाचे पाणी अडवण्यासाठी प्रचंड महाकाय पाणी साठे (पाणी गोदामे) निर्माण करावी लागणार आहेत. विशेषत : बाप्पीभवन व पाणी झिरपून जाणारे सुमारे ७० टक्के पाणी वाचवण्यासाठी टेकडी धरणे ही एक अभिनव योजना जी मी महाराष्ट्र सरकारला सुचवली. त्याचे ठोस फायदे असे –
१ . कमी खर्च
२ . कमी वेळेत उभारणी
३ . बाष्पीभवन व झिरपून जाणारे ७० टक्के पाण्याची बचत
४ . सोईस्कर विद्युत निर्मिती
५ . कोरडवाहू शेतीचा आणि पाण्याचा प्रश्न
६ . कोकणातील पाण्याचा प्रश्न निकाली निघेल 
७ . महाराष्ट्र दुष्काळमुक्त होईल,

          सोबतच्या कल्पना चित्रात दाखवल्याप्रमाणे टेकडी धरणे हा महाराष्ट्राला पाणी प्रश्नासाठी चांगला पर्याय होऊ शकता , याची शाखशुध्द मांडणी खालीलप्रमाणे आहे.
       कोणत्याही गावामध्ये , शहरामध्ये असलेल्या टेकड्यांचा उपयोग सदा पाणी साठा निर्माण करण्याकरता होणे शक्य आहे आणि अर्थातच त्या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी , शेतीसाठी , विद्युत निर्मिती , जंगल वाढवणे, पर्यावरण संतुलन या अनेक बाबी साध्य होण्यासाठी आहेत. तसेच टेकडीवरील एकण ( कंशब्यांड एरिया ) पाणलोट क्षेत्राची मोजणी करून तेथील सरासरी पावसाचा अंदाज घेऊन एकूण साठ्याच्या पाण्याचे गणित मांडता येणे शक्य आहे. त्या गणितानुसार टेकडीच्या पायथ्याशी भूमिगत पाणी साठे निर्माण करून, भुमिगत धरणावर व त्यावरील अडलेल्या पाणी साठ्यावर सोलर पॅनल बसवून विद्युतनिर्मीती शक्य आहे व त्याच विद्युत निर्मितीमधून पाणी पम्पिंग करून पुन्हा टेकडीवर जंगल वाढवणे , पिण्यासाठी टाक्या भरणे व शेतीसाठी पाणीपुरवठा करणे शक्य आहे. देशापेक्षाही कोकणात पाऊस जास्त असल्यामुळे तेथे ही धरणे अधिक फायदेशीर व उपयुक्त ठरतील तसेच महाराष्ट्रात सर्व भागांमध्ये प्रचंड प्रमाणात टेकड्या असल्यामुळे पाणलोट क्षेत्र भरपूर आहे व पाऊस कमी पडला तरीही तेथे ही योजना केली तर महाराष्ट्राला खूप फायदेशीर ठरेल व पाणी प्रश्न मार्गी लागेल असे माझे स्थापत्य अभियंता व पाणी प्रशिक्षक म्हणून ठाम मत आहे .
          सध्या चालू असलेल्या पाटबंधारे योजना प्रचंड खर्चाच्या व वेळखाऊ भ्रष्ट्राचाराला कुरण ठरलेल्या आहेत. त्याबरोबर तत्काळ उपयोगात येणाऱ्या या टेकडी धरणांचा विचार महाराष्ट्राने केल्यास सिमेंटच्या साखळी बंधाऱ्यासारखी क्रांती महाराष्ट्रामध्ये होईल . यामुळे पुनर्वसनाचा प्रश्न येणार नाही , पर्यावरणाचे संतुलन राखले जाईल , कोरडवाह शेतीचा प्रश्न सुटेल. विद्युत निर्मिती , रोजगार निर्मिती , कारखानदारी वाढेल , पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल व ग्रामीण भागाचा कायापालट होईल.
                                   
                                  :- भास्करराव म्हस्के





No comments:

Post a Comment