Thursday, March 5, 2020

corona ---------------------how to prepare ?


                                                   कोरोनावर विजय कसा मिळवू शकाल…?

                               संपूर्ण जगभरात कोरोनाव्हायरसने थैमान घातले आहे. जगभरातील एकूण ३१०० लोकांचा जीव या व्हायरसने घेतला आहे. तर जवळपास ९० हजार लोकांना या रोगाची लागण झाली आहे. या कोरोना व्हायरसच्या आधीदेखील प्लेग, फ्लू, स्वाइन फ्लू सारखे आजार देखील जगभरात पसरले होते. पण या कोरोनाची तीव्रता आधीच्या फ्लुपेक्षा जास्त असल्याचे निदर्शनास येत आहे.
                                               खरतर हा जीवघेणा आजार ज्या देशातून उत्पन्न झाला. त्या देशातच या आजारामुळे हजारो बळी गेले. बहुधा हे सर्व त्यांच्याच चुकीचे फळें म्हणता येईल. जगाची लोकसंख्या सर्वाधिक असणाऱ्या आणि संपूर्ण जगावर विजय मिळवू पाहणाऱ्या चीनमध्येच या जीवाणूचा जन्म झाला. या देशातील जनता प्रत्येक सजीव हा आपल्या भक्षणासाठी असल्याचे मानते. वटवाघळे आणि खवले मांजर यांच्याशी आलेल्या अतिसंपर्कामुळे या आजाराचे विषाणू मानवी शरीरात पसरल्याचे सांगण्यात आले आहे.


                                   चीनच्या वूहान या शहरातून या रोगाची सुरुवात झाली. जवळपास ६० हून अधिक देशांमध्ये हा रोग पसरला आहे.चीनबरोबरच इराण, इटली आणि काही प्रमाणात अमेरिका या देशांत या आजाराचे सर्वाधिक बळी आहेत. त्याचप्रमाणे आता भारतातही या कोरोनाने बाधित असलेले एकूण २९ रुग्ण सापडले आहेत.पण या कोरोनावर मात करण्यासाठी सर्व पातळींवर कामे करणे आवश्यक आहे. भारतातील केरळ या राज्यात या कोरोना व्हायरसवर उपाय करुन येथील काही रुग्णांना बरे करून घरी पाठवण्यात आले आहे. त्यामुळेसर्व राज्यांनी केरळसारखे अनुकरण करणे गरजेचे आहे.


                                              कोरोना व्हायरस होऊ नये यासाठी आजारी व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणावरील गर्दीत जाणे टाळणे. मुंबई, पुणे सारख्या शहरांमध्ये गर्दी जास्त असल्याने याठिकाणी हा रोग पसरण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे यांसारख्या मोठमोठ्या शहरांमध्ये जास्त खबरदारी बाळगणे आवश्यक आहे. मॉब मिटींग्ज कमी करणे, राजकीय मिरवणुका, मोर्चे, सभा काही काळापुरत्या थांबवाव्या. तसेच होळी,गणेशोत्सव सारखे सार्वजनिक उत्सव बंद करावेत. तसेच शाळा-कॉलेज काही दिवस बंद ठेवणे. किंवा शालेय स्तरावर विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात यावी.


                    कोरोना हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी देखील स्वच्छता बाळगणे आवश्यक आहे. रस्त्यावर कचरा करणे टाळावे. प्रत्येकाने आपला परिसर स्वच्छ ठेवावा. कुठेही उघड्यावर थुंकू नये. नाक, डोळे, तोंड यावर वारंवार हात फिरवू नये. सतत स्वच्छ पाण्याने हात धुणे. पर्यटन किंवा सहलीला जाणे टाळणे. डायनिंग हॉल किंवा हॉटेल्स मधील गर्दी कमी करणे यांसारखे उपाय आपण व्यक्तीगत पातळीवर करू शकतो.








                     सरकारने देखील या कोरोनावर मात करण्यासाठी आपाआपल्या परीने झटपट कामे करणे गरजेचे आहे. रस्त्यावरील ड्रेनेज तुंबले असेल तर तात्काळ दुरुस्त करणे. तसेच लोकांच्या उपचारासाठी दवाखान्यांची संख्या वाढवणे कोरोनाग्रस्त संशयित रुग्णांसाठी वेगळे विभाग बांधणे आवशयक आहे. सरकारी कचेऱ्यांमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना झटापट कामे करण्याचे आदेश दिले पाहिजे. कोर्ट, बँका या ठिकाणांवरील गर्दी टाळण्यासाठी उपययोजना केल्या पाहिजेत. तसेच मोठमोठ्या मंदिर - मश्जिदमध्ये भाविकांची गर्दी होत असते त्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे.

                                      तसेच या कोरोना सारख्या संकटाला न घाबरता राज्यपातळीवर या आपत्तीचे संपत्तीत रुपांतर करता येऊ शकते. या कोरोना व्हायरसमुळे सध्या तोंडाला मास्क लावून सगळे फिरत आहेत त्यामुळे मास्कच्या किंमतीत देखील वाढ झाली आहे. त्यामुळे मास्क तयार करणे हा उद्योग आता जास्त चालणारा आहे. ग्रामीण भागातील महिलांना आपल्या सुती जुन्या साड्यांपासून मास्क बनवता येऊ शकते. त्यामुळे महिलांना रोजगार मिळवता येऊ शकते तसेच मास्क वाटपाचे अभियान चालू करता येऊ शकते.
                                      दरम्यान, कोरोना या व्हायरसवर मात करण्यासाठी स्वच्छतेची जास्त गरज आहे आणि या स्वच्छतेचा प्रश्न हा पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे स्वच्छ पाण्याची व्यवस्था करणे हे सरकारचे काम आहे. त्यामुळे आता या कोरोना व्हायरसच्या निमित्ताने तरी आता सरकार पाणी प्रश्न सोडवणार का?
                                                                                                    -भास्करराव म्हस्के

No comments:

Post a Comment