Saturday, March 7, 2020

Maharashtra Budget 2020....#


Maharashtra Buget 2020
अंदाज पत्रकावरील अंदाज

            निरनिराळ्या वृत्तपत्रामधून वृत्तवाहिन्यावरून तसेच प्रत्यक्ष अंदाज पत्रक मांडताना चुकून काही सूचना सरकारला कराव्याशा वाटतात. तत्पूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या भागांचा साधा नामोल्लेखही केला नाही अशी शेरबाजी केली. हे बजेट फक्त पश्चिम महाराष्ट्राचे आहे. अधिकतर मुंबई आणि पुण्याचेच आहे. त्याचा असा अप्रत्यक्ष अर्थ होतो. तो सपशेल चूक आहे. वास्तविक, विदर्भ आणि मराठवाडा या दोन्हींच्या वाट्याला दीर्घकाळ मुख्यमंत्रीपद राहिलेले आहे. विदर्भासाठी कन्नमवार, वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक, देवेंद्र फडणवीस अशी एकवीस वर्षाची कारकीर्द मिळालेली होती व त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांचा कोणी हात धरला होता का? की विदर्भाचा विकास करू नका?

         तसेच मराठवाड्यासाठी विलासराव देशमुख, शंकरराव चव्हाण, अशोक चव्हाण यानाही सुमारे १५ वर्ष मुख्यमंत्रीपद मिळाले होते. मुंबईच्या वाट्याला मनोहर जोशी , नारायण राणे यांचे ५ वर्षाचे मुख्यमंत्रीपद आले होते. म्हणजे ६० वर्षाच्या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये पश्चिम महराष्ट्राच्या वाट्याला २५ वर्षे आली होती त्यात कोकणासाठी अंतुलेच्या रूपाने ५ वर्षाचा काल कमी होतो म्हणजे कोकण आणि मुंबईकर यांना एकूण ९ ते १० वर्षाचा काल मिळालेला होता. सर्व हिशोब करता यशवंतराव चव्हाण, शरद पवार, वसंतदादा हे तीन मुख्यमंत्री पश्चिम महाराष्ट्राच्या वाट्याला १५ वर्षे मिळाले. तरी पश्चिम महराष्ट्र प्रगत दिसत आहे तो मुख्यतः भौगोलिक परिस्थतीच. मुंबई, पुणे, ठाणे हा औद्योगिक विकसित भाग यशवंतरावांच्या दूरदृष्टीने खोलवर रुजवलेली सहकार चळवळ त्यातल्या त्यात साखर कारखानदारी, जीनिंग प्रीसिंग, (कापूस) फॅक्टरीज, सहकारी बँका, औद्योगिक वसाहतींचे जाळे, कृषीउत्पन्न बाजार समित्या, खरेदी विक्री संघ, दुध उत्पादक संघ, फळबागांची लागवड, कुक्कुटपालन इत्यादीमुळेपश्चिम महाराष्ट्र वरवर विकसित झालेला दिसतो. तसेच वसंतदादांनी पश्चिम महाराष्ट्रात शिक्षणाचे खाजगीकरण केले त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात शिक्षण प्रसार मोठ्या प्रमाणात झाला आणि त्या नंतर तो विदर्भ व मराठवाड्यात झाला. म्हणजेच विदर्भात फडणवीसांनी पश्चिम महाराष्ट्राची कॉपी केली. ती ही त्यांना नीट करता आली नाही. साधा त्यांना नागपूरचा पाणी प्रश्न सोडवता आला नाही. त्यांनी जास्त करून लक्ष घातले परदेशी गुंतवणुकीत त्या गुंतवणुकीचा बोऱ्या वाजला आहे.
       जरी हा पश्चिम महाराष्ट्र वरवर विकसित झाला असला तरीही पश्चिम महाराष्ट्रात व कोकणात ७०% शेतकरी हा पाण्यावाचून वंचित आहे ही वस्तुस्थिती कशात घेणे आवश्यक आहे. म्हणजे महाराष्ट्राचा विकास हा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात सुद्धा असंतुलित आहे. हेही फडणवीसांनी व विद्यमान मुख्यमंत्र्यांनी लक्षात घेणे आवशयक आहे.
                                        
                                     -भास्करराव म्हस्के

No comments:

Post a Comment