Saturday, March 14, 2020

Youngest Leader In Politics ......# India



तरुणांनी राजकारणात का यावे ?


    'समर्थांच्या राजकारणाचे मर्म दुसऱ्याला समर्थ बनविण्यात आहे. पण जो दुसऱ्याच्या सामर्थ्याला घाबरून ते नष्ट करण्याचे डावपेच खेळतोत्याच्या सामर्थ्याला शिवतेज लाभणे शक्य नाही. ज्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांसारखा सूर्य महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर तळपत होतात्याच काळात कान्होजी आंग्रे आणि बाजीप्रभू देशपांडे यांसारखे तेजस्वी नरवीर न भूतो न भविष्यती अशी ऐतिहासिक कामगिरी बजावतात हा योगायोग नसतो. ती सर्वोच्च नेतृत्वाची बुध्दीमान योजना व विचारसरणी असते. पण आज चित्र असे दिसते की नेत्याला दाखवून द्यायचे की असते की मीच सर्वश्रेष्ठ आहे त्यामुळं तो पक्षातील आपल्या इतर साथींना मोठा होऊ देत नाही. त्यामुळे कोणत्याही पक्षात सक्षम नेतृत्व करणारा नेता शोधणं अवघडच. कारण प्रत्येकजण प्रत्येकाचे पाय ओढत असतात. यातच राजकारण्यांचा बहुतांशी वेळ खर्च होतो.

     आज मनी अँण्ड मसल हेच राजकारणाचे सूत्र झालेले आहे. विचारांचे राजकारण शिल्लक आहे का ? तर नाहीचालू आहे ते फक्त प्रचारांचे राजकारण आणि गटबाजी. त्यासाठी सर्व राजकीय मुल्यांची श्रदांजली दिली जाते. लोकांना दिलेली आश्वासने धुळीस मिळवली जातात . देशाला गरज आहे तो उत्तरदायी नेतृत्वाची स्वच्छ  प्रशासनाची जबरदस्त धाडसी निर्णय घेणाऱ्या नेत्याची नव्या  कल्पना तत्काळ  अंमलात आणणाऱ्या व्यक्तींची भ्रष्टाचाराने  आज संपूर्ण देश पोखरलेला आहे. सामाजिक प्रश्न सोडवण्याची तळमळ असणारे नेतृत्वच देशाला वाचू  शकते. म्हणूनच  अशा तरुणांनी  राजकारणात आले पाहिजे. प्रश्न सोडवणाऱ्या नव्या लोकांना जनतेने  निवडून द्यायला हवे. मग तो अपक्ष का असेना. राजकारणात बदल हा नेहमीच चांगला  ठरतो. त्यातूनच व्यक्तीत बदल घडतो. नवी पिढी हि बंडखोर असते व तीच बदल घडवून आणू शकते.

आपण पाहतो, बुद्धीवतांनी, विचारवंतांनी, सुशिक्षित मध्यमवर्गीयानी,  सच्चे सामाजिक कार्यकते सामान्य माणसाच्या प्रश्नाची जाण असणाऱ्या अभ्यासकांनी निवडणूक प्रक्रियेपासून स्वत:ला कायम दुर ठेवले आहे. अगदी मतदानाबद्दल त्यांची अनिच्छा  दिसते. त्यामुळेच  भ्रष्ट मनगटशाहीवाले घराणेशाहीवाले सतत  निवडून देताना दिसतात. त्याचाच परिणाम म्हणजे अद्यापही राष्ट्रीय व राज्य स्तरावरील शहरांचे खेड्यांचे प्रश्न सुटलेले नाही. सामान्य माणसाचा मोठा अपेक्षाभंग झाला आहे . तेव्हा या सगळ्यातून तरुणांचे नवविचार क्रांती करू शकतात.
-    भास्करराव म्हस्के

No comments:

Post a Comment