Tuesday, February 25, 2020

How will Maharashtra be free from drought? (महाराष्ट्र दुष्काळमुक्त कसा होईल ?)

How will Maharashtra be free from drought?

महाराष्ट्र दुष्काळमुक्त कसा होईल ?



महाराष्ट्रातील दुष्काळ हा मानवनिर्मित आहे .

त्याची कारणे पुढीलप्रमाणे –
१ . दिशाहीन शहरांची बेसुमार वाढ .
२ . बेसुमार अनावश्यक साखर उत्पादन ( १ कोटी टन )
३ . बाष्पीभवन आणि भूगर्भातील गळती ( परकोलेशन ) यावर नियंत्रण नाही .
४ . धरणांची अपूर्ण कामे , काही धरणे पूर्ण पण कालवे नाहीत , तर काही कालवे पूर्णपणे धरणे नाहीत .
५ . लांबच लांब अस्तरीकरण नसलेले कालवे , त्यामुळे बेसुमार गळती .
६ . शहरी लोकांची पाणी वापरण्याची बेफिकिरी .
७ . समान किमान पाणी वाटपाचे सूत्र नाही .
८ . पाणी वापराचे प्राधान्यक्रम ठरवूनही अंमलात येत नाही .
९ . ३ टक्के ऊस शेतीला ७० टक्के पाणी दिले जाते.
१० . कॅनालच्या कमांड एरियात असंख्य विहिरीतून होणारा पाण्याचा उपसा ( ऊर्जासाठी )
११ . दिशाहीन तांत्रिक पाया नसलेली जलसंधारणाची कामे , ज्या कामामुळे धरणाच्या को चमेंट एरियात अडचणी निर्माण झाल्या व त्यामुळे पाझर तलाव , लघु तलाव , मध्यम तलाव कोरडे पडले . गेल्या ३० - ४० वर्षात जलसंधारणाच्या नावे १ लाख कोटी रुपये खर्च झाले . तेच पैसे मोठया धरणासाठी वापरले असते तर निश्चित पाणी उपलब्ध झाले असते .
१२ . जलसंधारणाच्या प्रयोगांना १०० टके यश आले असते , तर आजही परिस्थिती आली नसती . अनेक सामाजिक संस्थांनी कार्यकत्यांनी जलसंधारणाचे ढोल वाजवून पैसा व प्रसिध्दी मिळवली . मात्र कोणतीही कायमची उपाययोजना झाली नाही . झाली ती तात्पुरती सोय , तीही अडचणीत आणणारी .
१३  . असमान खोलीच्या विंधन ( बोरवेल ) विहिरी ,



पाण्याची प्रश्नकुंडली
१ . महाराष्ट्रात , उभ्या असलेल्या सध्याच्या २५० साखर कारखान्यांमध्ये नव्या साखर कारखान्यांची मंजुरी रोखण्याचे प्रयत्न का झाले नाहीत ? किंवा त्यावर भाष्य का केले गेले नाही ? वास्तविकरित्या गोडबोले समितीने एकरी नवीन साखरकारखान्यास परवानगी देऊ नये अशी शिफारस केली होती , मग तरीही महाराष्ट्र सरकारने नव्या कारखान्यास कशी परवानगी दिली ? हा चर्चेचा विषय होऊ शकतो आणि त्याचे उत्तर केवळ राजकीय समीकरणे हेच आहे असे दिसून येते .



२ . तीन टक्के जमिनीचे क्षेत्र व शेतकरी ७० टक्के पाणी ऊसासाठी वापरतात व बाकी ९७ टके जनता व ६० टक्के कोरडवाहू शेतकरी उद्योग ग्रामीण आणि शहरी पाणीपुरवठा यासाठी केवळ ३० टके उपलब्ध आहे . त्यावर कसा प्रकाश टाकला गेला नाही


३ . जनावरांच्या चाऱ्यासाठी वापरला जाणारा ऊस आणि बाडे याचे क्षेत्र २५ ताख एकर एवढे आहे . तर ४ कोटी जनावरांसाठी ते क्षेत्र चाऱ्याच्या कुरणाच्या रूपाने १ कोट एकरामध्ये परिवर्तन केले तरच भागू शकते . त्यासाठी पाण्याची आवश्यकता हो नितांत आहे . पाण्याची हमी असल्यास व भरपूर सकस चारा जनावरांस मिळाल्यास दप उत्पादनात ३० ते ४० टक्के वाढ होणे शक्य आहे . यासाठी जनावरांच्या हमखास चरण्यासाठी कुरणे व त्यासाठी हमखास पाणी पुरवणे हा विचार का मांडला गेला नाही ?


४ . १९९४ साली मराठा चेंबर येथे कै. हस्तीमत फिरोदिया यांनी पाण्यासंबंधीच्या परिषदेच्या परिसंवादामध्ये माधवराव चितळे यांच्या साक्षीने जनावरांच्या चाऱ्याचा विचार अग्रक्रमाने करावा असा मांडला होता . त्याची नोंद गाभीर्यपूर्वक का घेतली गेली नाही ?



५ . पश्चिम घाटातील पाणी पूर्व पाटात आणणे ही योजना ४० वर्षापूर्वी मा . शरद पवार यांच्या कानावर सी . एस . गांधी यानीपातली असता , अपुल्या विद्युत पुरवठ्यामुळे ते शक्य नाही , म्हणून बाजूला ठेवण्यात आली . तीच योजना पुन्हा एकदा मी मा . अजित पवार यांना प्रत्यक्ष दिली होती व विजेचा प्रश्न पवनचक्रीच्या साहाय्याने सोडवून योजना वास्तवात आणने शक्य असून तशी योजना त्यांच्या समोर मांडली होती .


६ . महाराष्ट्र पाणी परिषदेच्या सभेमध्ये सिंचन भवन येथे मी भूपृष्ठाखालील धरणे हा पाणी प्रश्नावरील एक महत्त्वाचा उपाय होऊ शकतो . हे ब्राझीलचे उदाहरण देऊन मांडले होते. मात्र त्यांचाही विचार झाला नाही . का ?

७ . पुराच्या वेळेस नदीनाल्यातून वाहणारे पाणी तसेच , कॅनॉलमधून वाहणारे अतिरिक्त पाणी हे ग्रामीण भागामध्ये बेसिंग टॅंक बांधून भूपृष्ठाखाली किंवा भूपृष्ठावर प्रचंड पाणीसाठी ( महातळी ) तयार करणे हाही एक उपाय . होऊ शकतो . याचा विचार अभ्यासकाकडून का मांडला गेला नाही ?


८ . गुजरात सरकारप्रमाणे कॅनाल व धरणे यावर सोलर पॅनल टाकून बाष्पीभवनाने वाया जाणारे पाणी वाचविणे शक्य आहे . विद्यत निर्मिती शक्य आहे . हेही पाणी परिषदेमध्ये मांडले होते . यांचाही विचार का होत नाही ?



९ . समान किमान वाटपाबद्दलही कोणतीच चर्चा झाली नाही किंवा कोणतेच सूत्र मांडले गेले नाही . त्याबाबत कै . विलासराव साळुखे यांनी कोरडवाहु शेतकऱ्यांना किमान एका पिकाला पाणी मिळाले पाहिजे असा दुराग्रह धरला होता . त्यावरही सरकारने कोणतीही भूमिका स्पष्टपणे घेतली नाही , याचाही उल्लेख जलतज्ज्ञांनी केला नाही .



                                                                   भास्करराव म्हस्के

Monday, February 24, 2020

परकीय चलनासाठी वरदान ठरणारे पीक कोणते ? how to make money from farm?


 परकीय चलनासाठी वरदान ठरणारे पीक कोणते ?

१९८९ - ९० या साली पुण्यात स्ट्रॉबेरी लावून स्ट्रॉबेरी हे पीक कोणत्याही ठिकाणी आणि कोणत्याही जमिनीत येते हे सिध्द करून दाखवून मी शेतकन्यांना नव्या पिकाची दिशा दिली होती . त्याचा प्रचार मी जगभर आणि भारतभर केला , स्ट्रॉबेरी ही केवळ हिल स्टेशनवरच येते , असा असलेला पूर्वीचा गैरसमज खोडून टाकला व ती पठारावर येऊ शकते , मुरुमात येऊ शकते , सिमेंट पाईपात येऊ शकते असे निरनिराळे प्रयोग करून लाखो शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे . काश्मीर ते कन्याकुमारी आणि कच्छ ते कलकत्ता अशा संपूर्ण भारतामध्ये आम्ही स्ट्रॉबेरी उत्पादित केली . त्याचा प्रतिसाद म्हणून आता शेतकरी प्रत्यक्षात स्ट्रॉबेरीकडे वळू लागलेला आहे . नागपूर , इंदापूर , रतलाम , नगर , औरंगाबाद , लातूर , कोचीन , काश्मीर , भेलगाव , कोल्हापूर अशा अनेक ठिकाणी शेतकरी हे लाभदायक पीक घेत आहेत . अवघ्या ६ महिन्यात भरघोस उत्पादन देणारे हे पीक स्ट्रॉबेरी शेतकऱ्यांना जीवनदान देणारे ठरेल असे माझे अनुभवांती मत आहे .

 परदेशात स्ट्रॉबेरीला आंब्यापेक्षा जास्त मागणी आहे आणि दरही परवडण्यासारखे आहेत . कॅलीफोर्निया येथे समुद्र किनाऱ्यावरही स्ट्रॉबेरी होते , हे प्रत्यक्ष पाहून मी स्ट्रॉबेरीचा सखोल अभ्यास केला होता . टिशू कल्चर रोपेही यशस्वीरित्या तयार केलेली आहे , तरी शेतकऱ्यांनी महापुरे वटवृक्षी जाती तेथे लव्हाळे वाचती या तत्त्वज्ञानावर स्ट्रॉबेरीचे लव्हाळे असणारे पीक जरूर घ्यावे . परंतु तरीही शेतकरी सहजासहजी स्ट्रॉबेरी हा त्यांना मार्केटिंगचे मार्गदर्शन जरूर घ्यावे . परंतु तरीही या पिकाच्या मार्केटिंग संबंधी समज - गैरसमज व अपुरी माहिती यामुळे शेतकरी सहजासहजी लावण्यास अद्याप धजावत नाही हेही खरे . तेव्हा त्यांना समजून सांगावे , म्हणन हा लेख

जगातील सर्व देशांमध्ये स्ट्रबिरी हे फळ प्रतिष्ठीत मानले जाते व साधारणपणे ५ ते १० / किलो प्रतवारी प्रमाणे मिळतो . भारतामध्ये अद्याप हे पीक अती श्रीमंतांचे आहे असा सर्वसामान्य जनतेचा समज, ते फळ सामान्य माणसांकरिता नाही , म्हणून ते विकले जाईल की नाही याबद्दल शेतकऱ्यांच्या मनामध्ये शंका आहे , म्हणून शेतकरी सदर फळाच्या लागवडीकडे वळत नाही.

 परंतु भारत ही जगातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे व सर्वसामान्य माणस अद्याप स्ट्रॉबेरी खाण्यास शिकायचा आहे , कारण ते फळ अद्याप परदेशी फळासारखे वाटते . मात्र सुमारे ५० ते ६० वर्षापूर्वी भारतामध्ये द्राक्षांबद्दलही तसेच होते . फक्त भोकरी द्राक्षं नाशिकला होत असत व ती द्राक्ष केवळ दवाखान्यातील आजारी , माणसासाठी घेतली जायची , ती द्राक्ष महागडी असत . त्यांची किंमत साधारणपणे १२ आणे ते १ रुपया किलो अशी असे . तीच द्राक्षं या ६० वर्षामध्ये क्रांतिकारी बदल होऊन , अनेक जाती निर्माण होवून , सर्वसामान्य माणसांच्या हातात पडलेली आहे आणि संपूर्ण भारतात परिचित झालेली आहेत व त्यांचा दर्जा अत्यंत सुधारलेला असल्यामुळे परदेशातही मार्केट काबीज करू लागलेली आहे . तीच गोष्ट स्ट्रॉबेरीबाबत होईल व स्ट्रॉबेरी अत्यंत लोकप्रिय होईल , त्याचे प्रमुख कारण म्हणजे या फळांचे देखणेपण व चव हे आहे .

स्ट्रॉबेरी लागवडीच्या प्रगत तंत्रज्ञानाप्रमाणे poly house , green house चा विचार न करता एकेरी उत्पादन २० टनापर्यंत घेता येते . तसेच लागवडीसाठी लागणारी एकरी २२ , ६०० रोपे भारतात आता उपलब्ध होण्याची शक्यता आहे . म्हणून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी अभ्यासपूर्वक स्ट्रॉबेरीची लागवड केली व योग्य मार्केटिंग केले . तर त्यांना एकरी ६ ते १० टन सहजारत्या उत्पादन घेता येईल व त्या पासून सुमारे ४ ते १० लाख एकरी उत्पादन अवघ्या ६ महिन्यात घेता येईल . शेतकऱ्याच्या च्या दृष्टीने अत्यंत सोईचा काळ हा सप्टेंबर १५ ते मार्च १५ , कारण याकाळात पाऊस संपतो आणि हिवाळा चालू होतो . स्ट्रॉबेरीची लागवडही ऑगस्ट - सप्टेंबर मध्ये केली जाते व ऑक्टोबर - नोव्हेंबर पासून फळे सुरु होतात . अवघ्या ६० दिवसात स्ट्रॉबेरीला फळे लागतात . इतक्या झटपट काळात कोणत्याही फळझाडाला फळे लागत नाही . तसेच हिवाळ्यामुळे पिकावर रोगराईचे प्रमाणही कमी असते .


 स्ट्रॉबेरीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहे , त्यापैकी एक म्हणजे त्यात इलेजिक असिड हे भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे . जे इतर कोणत्याही फळात उपलब्ध नाही , त्यामुळं अमेरिकेत तर कित्येक लोक केवळ स्ट्रॉबेरीवर दिवस काढतात . त्या अॅसिडमुळे कॅन्सर रोगाला प्रतिबंध होऊ  शकतो . भारतात तंबाखू खाणारे आणि धूम्रपान करणारे सुमारे ५० ते ६० % लोक आहेत . किंबहुना जास्तच आहेत . जर अशी जाहिरात केली की , धुम्रपान करणे व तंबाखू खाणे धोक्याचे असले तरी तुम्ही त्याबरोबर दोन स्ट्रबिरी खाल्ल्या तर तुम्हाला कॅन्सर होणार नाही , अशी जाहिरात केली तर कितीतरी स्ट्रॉबेरीचा खप होऊ शकेल . तसेच हे फळ लहान मुलांना अतिशय आवडते . म्हणून प्राथमिक शाळेत काही दिवस हे फळ फुकट वाटली तरी महिन्या दोन महिन्यामध्ये मुलांना त्याचे आकर्षण निर्माण होऊन ते आपल्या आई - वडिलांना स्ट्रॉबेरी विकत घेण्याचा आग्रह धरतील व असा प्रयोग आम्ही अनेक ठिकाणी केला आहे . तसेच खेडेगावांतील यात्रा , कुस्त्यांचे फड , निरनिराळ्या कॉलेजमधील तरुण - तरुणी , क्रिकेट , सिनेमागृहे इ . ठिकाणी आम्ही स्ट्रॉबेरीचे प्रयोग केलेले आहे व त्यास भरघोस यश मिळालेले आहे , असे म्हणतात ना विकणाऱ्यांची माती सोन्याच्या भावाने विकली जाते व न विकणाऱ्याचे सोन्याची माती होते आणि स्ट्रॉबेरीमध्ये तर गुप्त सोने लपलेले आहे व ते जितक्या लवकर महाराष्ट्रातील शेतकरी ते जाणून घेईल , तितक्या लवकर त्याची आर्थिक प्रगती होईल.तसेच या फळाला फार मोठी परदेशी बाजारपेठ आहे , म्हणून त्याचा परदेशी चलन मिळविण्याकरिता मोठा उपयोग होईल , कारण जगात सर्वात जास्त खपणारे व प्रतिष्ठेचे फळ म्हणून या फळाकडे प्रहिले जाते . तसेच विमान वाहतुकीचा दरही या फळाला परवडू शकतो व लंडनच्या बाजारात किंवा दुबईच्या बाजारात हे फळ अवघ्या १२ तासात दुकानात पोहचते. फक्त पॅकींग करताना ते नव्या नवरीसारखी सजवलेले पाहिजे . फळ काढल्याची तारीख त्यावर असली पाहिजे . उन्हाळ्यामध्ये ६० % ते ७० % पिकवलेले फळ मार्केटिंगला न्यावे . हिवाळ्यामध्ये १०० % पिकवलेले फळ मार्केटींगला न्यावे , पावसात शक्यतो फळे तोडू नये त्यामुळे बुरशी लागते . तसेच फवारलेले औषध ० % स्ट्रॉबेरीवर शिल्लक राहील , याची खात्री घ्यावी लागेल . देठांची लांबी फळ सहज हातात धरता येईल एवढी असावी . जपानमध्ये लांब देठाच्या फळाला मागणी आहे . जागतिक बाजारपेठ ५० लाख टनाची आहे . फळ करणाऱ्यांनी रोपांच्या भानगडीत पडू नये व रोपेसुध्दा भारतात तयार करण्याचे तंत्र आत्मसात करावे . निष्कारण डॉलर मध्ये पैसे गुंतवू नये , तसेच सामुदायिकरत्यिा जाहिरात केल्यास जाहिरातीचा खर्च वाचू शकतो व वाहतूक सुध्दा शक्यतो सामुदायिकरित्या केल्यास खर्च कमी होईल . फळाचे उत्पादन प्रत्येक गावी एक प्रकारचे व एक सारखे असावे म्हणजे फॅक्टरीमध्ये तयार होणाऱ्या मशिनरीसारखे एकसारखे असले पाहिजे म्हणजे विक्री सुलभ होते .


                   भास्करराव म्हस्के

Saturday, February 22, 2020

कृषिक्षेत्राला नवी संजीवनी कशी देता येईल ? how to improve agriculture ?



1)  कृषिक्षेत्राला नवी संजीवनी कशी देता येईल ?
   पूर्वी शेती करताना चांगले आणि भरपूर उत्पादन मिळविणारे शेतकरी इतरांना शेती
उत्पादनाचे रहस्य सांगत नसत . त्यामुळे इतर शेतकरी चाचपडत उत्पादन करत असत. 
आता काळ बदलला आहे . एकमेकाला सर्व शेती उत्पादनाच्या महत्त्वाच्या बाबी सांगितल्या
व एकसारखे उत्पादन घेतले तर सर्वांचाच अधिक फायदा होऊ शकतो .

आपल्याला कृषिक्षेत्राला नव संजीवनी द्यायची असेल तर खालील बाबींचा विचार केला पाहिजे 

१ . कृषी व्यवसायाची पिछेहाट केवळ साधन सामग्रीची अपूर्णता , अपुरा अर्थपुरवठा , अर्धवट शास्त्रीय संशोधन यांमुळे आहे . उद्योगपती , व्यापारी , बिल्डर्स यांनी आपापल्या कुवतीप्रमाणे ग्रामीण अथवा शहरी विभाग दत्तक घेऊन त्याचा सर्वांगीण विकास साधण्याचे ठरवले तर नवा भारत घडवणे अवघड नाही . मला आठवते , जे . नीळकंठ कल्याणी यांनी महापालिकेकडून कोणतेही मानधन न घेता पुण्यातील कमला नेहरू पार्क अनेक वर्ष मेंटेन केला होता . त्याच धर्तीवर उद्योगपतींनी कृषी व्यवसायातील एखादे पीक दत्तक घेऊन ते इच्छुक शेतकऱ्यांच्यामार्फत शास्त्रशुध्द पायावर चालवल्यास देशातील कृषी उत्पादनातील अपुरेपणा नष्ट होईल . खाद्य तेले , डाळी आयात करणे थांबेल . भाजीपाला , फळे साठवणूक नसल्यामुळे व सुयोग्य वाहतूक नसल्यामुळे जी महाग झालेली आहेत ती स्वस्त होऊ शकतील सरकारने शुन्य दराने शेतकऱ्यांना हवे तेवढे कर्ज हवे तेव्हा उपलब्ध करून दिल्यास कृषी क्षेत्रात क्रांती होणे शक्य आहे

२ . जलसंधारणेच्या यशोगाथा गायल्या जातात पण प्रश्न का सुटत नाही?
      निव्वळ जाहिरातीमुळे काही विशिष्ट नावे आणि गावे प्रसिध्दीच्या  क्षेत्रात आली असली 
तरी त्यांची प्रतिकृती किंवा कॉपी इतर गावांनी का केली नाही ? हा विचार होणे आवश्यक आहे.         जलसंधारणावरती होणारा खर्च ही तात्पुरती मलमपट्टी आहे व जलयुक्त  शिवार ही घोषणा        फसवी आहे . कारण गेल्या ४० वर्षात जलसंधारणावरती झालेला २ लाख कोटी रुपयांचा            खर्च निव्वळ वाया गेलेला आहे . प्रश्न सुटलेला नाही . शाश्वत पाणी हा कृषि क्षेत्राचा              मूलभूत आधार आहे . त्यासाठी छोट्या मध्यम , मोठ्या पाटबंधारे योजना व नदी                किनाऱ्यावर ठरावीक अंतरावर केलेले महाकाय पाणी साठे जे पूरसंरक्षकही ठरतील असे बांधणे        आवश्यक आहे व तोच पाणी प्रश्नाचा खरा उपाय आहे .


३ . कृषी उत्पादनाला योग्य भाव मिळाला पाहिजे , म्हणून शेतापासून ते शहरापर्यंत मोठ्या प्रमाणावर शीतगृहांची बांधणी अत्यावश्यक ठरते . त्यासाठी प्रसंगी सबसिडी न देता शून्यव्याज दराने कर्ज द्यावे व पाच वर्षांत परतफेड न झाल्यास त्यावर सौम्य व्याज आकारावे . ह्या शीतगृहांच्या बांधणीमुळे वाया जाणारा तीस ते चाळीस टक्के कृषी माल वाचू शकतो व तो शेतकऱ्यांना ,  गिऱ्हाइकांना  , व्यापाऱ्यांना जास्त पैसे मिळवून देऊ शकतो . कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये अशा शीतगृहांची तसेच शीतवाहनांची फार मोठ्या प्रमाणावर गरज आहे . तसेच उत्पन्नाची खालीलप्रमाणे वर्गवारी करावी .


भाज्यांची वर्गवारी
पहिला ग्रुप - मिरची , लिंबू , कोथिंबीर , आले इ .
दुसरा ग्रुप - पालेभाज्या - मेथी , शेपू इ .
तिसरा ग्रुप - शेंगवर्गीय भाज्या - शेवगा , गवार इ .
चौथा ग्रुप - वेलवर्गीय भाज्या - भोपळा , कारली , घोसाळी इ .
पाचवा ग्रुप - कोशिंबिरीच्या भाज्या - काकडी , गाजर , बीट मुळा इ .
सहावा ग्रुप - फळ भाज्या - वांगी , तोंडली . सुरण , पडवळ , सिमला मिरची इ .
सातवा ग्रुप - फ्लॉवर , कोबी .

Seasonal फळे एकत्रितपणे मार्केट केल्यास भरपूर फायदा होऊ शकेल . काही फळांची वर्गवारी खालीलप्रमाणे करता येईल .


पहिला ग्रुप - संत्री , मोसंबी , डाळिंब .
दुसरा गुप - स्ट्रॉबेरी , चेरी , द्राक्ष ,
तिसरा ग्रुप - कलिंगड , खरबूज ,
चौथा ग्रुप - पपई , केळी ,
पाचवा ग्रुप - सफरचंद , पेरू , चिकू .
सहावा ग्रुप - अननस , फणस .
सातवा ग्रुप - अंजीर ,
आठवा ग्रुप  - जांभूळ , करवंद , आवळा .
नववा ग्रुप - आंबा .
दहावा ग्रुप - सीताफळ , रामफळ

४. कृषी व्यवसायाला लागणारा निधी शेतकऱ्यांना सहज सुलभ पध्दतीने एनी- टाईम - मनी या न्यायाने तात्काळ उपलब्ध झाला पाहिजे.किंबहुना बँकांनी शेतावर जाऊन शेतकऱ्यांची आर्थिक गरज ओळखून तात्काळ मदत दिली पाहिजे. तसेच कृषी विद्यापीठांनी फिरत्या प्रयोगशाळा तसेच जमीन तपासणी व प्लॅन्ट पॅथोलॉजी यासाठी फिरती पथके नेमून, ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविली पाहिजेत.टि.व्ही. च्या माध्यमातून यशोगाथा भारतभर फिरल्या पाहिजेत . जमिनीचे तुकडे झाल्यामुळे जमीन कसणे व उत्पादन वाढवणे कार्यक्षमतेने होत नाही . यासाठी सामुदायिक शेती,contract फार्मिंग हेच प्रयोग यापुढे फायदेशीर ठरणार आहेत व त्यामुळे यांत्रिकीकरण व ऑटोमायझेशन सोपे होणार आहे . तसेच आत्महत्येचे प्रमाणही कमी होणार आहे .

' ५ . औद्योगिक क्षेत्र आणि कृषीक्षेत्र हातात हात घालुन  कृषिक्षेत्रात उतरेल तर प्रचंड कृषी प्रक्रिया उद्योग भारतात सुरू होणे शक्य आहे . साधा विचार केला की दूध , साखर , डाळी ह्या गोष्टी जर ग्रामीण क्षेत्रात निर्माण होतात तर मग तेथेच चॉकलेट , बिस्किटे , मिठाई असे पदार्थ चालू केल्यास कितीतरी मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होऊ शकते व फायदा होऊ शकतो . कंपन्यांनी पुढे येऊन कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग पध्दतीने शेतकऱ्यांशी करार केल्यास हे काम अधिक वेगाने पुढे जाऊ शकते .

६ . कृषीक्षेत्रामध्ये अनेक विद्यापीठे होऊनही अद्याप खरे संशोधन बाकी आहे . बदलत्या वातावरणात पावसाचा लहरीपणा , गारपीट , भूकंप , महापूर यासारखे भयानक संकटे , दुष्काळ , बदलते हवामान , तसेच जैविक तंत्रज्ञान विकसित करून तयार केलेली उत्पादने या सर्वांवर सखोल संशोधन करून जागतिक परिषदा बोलावून यावर सामुदायिक निर्णय घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे .   

 ७ . इस्राईलमध्ये शेतमाल निर्यात करणाऱ्या वाहनांना वेगळा रंग दिला जातो व त्यांना वाहूतक यंत्रणेमध्ये प्रथम प्राधान्य दिले जाते . त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये कॅनॉल वरून हायवे काढून त्यांना अग्रो एक्सप्रेस हायवे असे नाव देता येईल . रेल्वे खात्याने हे केल्यास शेतमाल वाहतूक अत्यंत सुलभ होईल व शेतमाल पुरवठा सर्व भारतात संतुलित राहील , त्यामुळे शेतमालाची भाव वाढ होणार नाही.व सगळीकडे भाव स्थिर राहतील . शक्य असल्यास एक्सप्रेस हायवेवरील एखादा ट्रॅक फक्त शेतमाल वाहतुकीसाठी राखीव ठेवावा , म्हणजे शेतमाल सगळीकडे उत्तमरीतीने व जलद पोहोचू शकेल.  

८ . निरनिराळ्या कारणाने शेतीतील पिकांचे खूप मोठे नुकसान होते . त्यापैकी नगदी पीक म्हणून द्राक्ष , स्ट्रॉबेरी आणि भाजीपाला यांच्यासाठी तर मांडव टाकून युव्हीएस प्लॅस्टीक कव्हर वापरून पिके वाचवण्याची वेळ येते. थोडक्यात सध्या तर ग्रीन हाऊस किंवा पॉली हाऊसमध्ये नगदी पीके घेण्याची वेळ आलेली आहे , त्यासाठी सरकारने भरीव आर्थिक मदत देण्याची गरज आहे . दुष्काळ , गारपीट , अवकाळी पाऊस यामळे होणारे संभाव्य नुकसान टळावे म्हणून व शेतकऱ्यांना हमखास उत्पादन मिळावे म्हणून हा प्रयत्न अत्यावश्यक ठरणार आहे . तसेच कमी खर्चातील ग्रीन हाऊस किंवा पॉली हाऊस कसे करता येईल याचा विचार होण्याची गरज आहे . त्यासाठी संशोधनावर खर्च करावा लागेल , तसेच लोखंडाऐवजी बांबू वापरून खर्च कमी करता येईल काय ? याचा विचार करावा लागेल .


९ . शेती व्यवसायाची चाललेली घसरण , परवड पाहता आणखी एक उपाय म्हणजे शेतकऱ्यांनी संपावर जाणे हा एकच पर्याय शिल्लक राहतो . शेतकऱ्यांनी संपावर जाणे याचा सोपा अर्थ असा की , शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतावर स्वतःच्या उत्पादन क्षमतेचे गोदाम बांधून त्यात माल साठवणे व कामापुरती बँकेची मदत घेणे . एकेका पिकाचे गावापासून ते जिल्ह्यापर्यंत सर्वेक्षण करून बाजारात माल केव्हा पाठवायचा याचे नियोजन केल्यास बाजारात माल जादा होणार नाही . तसेच गरजेप्रमाणे ज्याला रकमेची गरज आहे . त्याप्रमाणे बाजारात माल बाजारात पाठवल्यास भाव खाली येणार नाही , बाजार नियंत्रित राहील . सिझन चालू झाला की , केवळ साठवण नाही म्हणून शेतकरी सर्व माल मार्केटला पाठवतो , त्यामुळे मालाची मार्केटमध्ये मोठी आवक होऊन भाव कोसळतात व त्या कोसळलेल्या भावाने व्यापारी माल विकत घेतात व आपल्या गोदामामध्ये टाकतात आणि त्यावर बँकेकडून पैसे उचलतात व शेतकऱ्यांना सवडीप्रमाणे पट्टी करून पैसे पाठवतात व भाववाढ होताच ज्यादा भावाने माल विकून भरपूर नफा कमावतात . तसेच प्रत्येक शेतकरी सर्व शेतमाल पिकवतोच असे नाही , त्यामुळे हेच धोरण शेतकऱ्यांनी वैयक्तिक अधिक सामुदायिक गोदामे करून प्रत्येक पिकाची बँक तयार केल्यास व त्यावर नियंत्रण ठेवल्यास शेतकऱ्यांना मार्केट ताब्यात ठेवता येईल आणि हवा तेवढा भाव मिळाल्यावरच माल विकावयाचा हे धोरण ठेवल्यास व बाजाराच्या क्षमतेएवढाच माल बाजारात पाठवल्यास हे संतुलन दलालाशिवाय व कुठल्याही कराशिवाय शक्य होईल . ही योजना यशस्वी करण्यासाठी गाव , तालुका , जिल्हा या स्तरावर कंट्रोलिंग ऑफिसेस नेमून पिकाप्रमाणे बँका केल्यास शेतकरी मार्केट कंट्रोल करू शकतील असा माझा दावा आहे . यासाठी मोबाईल फोन ही सुविधा अत्यंत सोईची झालेली आहे . उदाहरण द्यावयाचे झाल्यास दारफळ जि . सोलापूर येथे ज्वारीची धान्य बँक आहे , त्याच धरतीवर पिकाचोक निर्माण झाल्यास शेतकऱ्यांना मनाप्रमाणे भाव मिळवणे शक्य होईल . प्रश्न येईल तो नाशवंत मालाचा . त्यासाठी शीतगृहाची उभारणी करावी लागेल व त्यासाठी सरकार भरपूर अनुदान देत आहे . प्रत्येक गावाने ही सुरुवात केली व त्यानंतर गावागावांची साखळी निर्माण केली . तर सदर योजना निश्चित फलदायी होईल व ज्या व्यापाऱ्याकडे शेतकऱ्यांना हेलपाटे मारावे लागत असत . तेच व्यापारी शेतकऱ्यांच्या दारात जातील व माल या म्हणून विनंती करतील . यासाठी ज्या - त्या पीक अंकेच्या सर्वोच्च संस्थेने दररोजचे रेट व दररोजचा पुरवठा रेग्युलेट करायचा आहे . सुरुवात कडधान्य , तेलबिया यांनी करून हळूहळू इतर सर्व पिकांकडे वळता येईल . एखाद्या पिकाचे उत्पादन ज्या जिल्ह्यात सर्वोच्च आहे . त्या जिल्ह्यात सर्वोच्च कंट्रोलिंग ऑफिस असावे . जसे ज्वारी - नगर आणि सोलापूर , बाजरी - पुणे , मूग - नगर आणि परभणी , तूर - यवतमाळ आणि अमरावती इ . तसेच कोणत्याही मध्यस्थाशिवाय व शेतकरी संघटनेच्या कोणत्याही नेत्याशिवाय व्यापारी तत्त्वांवर शेतकऱ्यांनी अशा मार्केट साखळ्या निर्माण कराव्यात . त्यासाठी अत्यावश्यक गोदाम , वाहतूक व्यवस्था , दर्जा नियंत्रण , अँटोमॅटीक भराई - उतराई - वजन या गोष्टीला महत्त्व द्यावे लागेल , त्याचबरोबर शेतकऱ्यांनी हायवेच्या बाजूला जागा घेऊन १०,२०, २५ एकरात सामुदायिक मार्केट किंवा अॅग्रो  मॉल तयार केला तर तेथे थेट गि-हाइकांची गाठ पडून अधिक नफा मिळणे शक्य आहे . 

१० . शेतमाल विक्रीचे आणखीही उपाय आहेत . हवी फक्त इच्छाशक्ती . जसे हुरडा पार्टीला करतो त्याच धरतीवर योजना करणे , शहरातील माणसे विविध कारणांनी महामार्गावरून जात - येतच असतात , तेव्हा . ठिकठिकाणी जसे चहापाण्यासाठी धांबतात त्याच धर्तीवर शेतमाल विक्रीचे थांबेही करता येतील . शेतमाल विक्रीची मोठमोठी केंद्रे संरक्षित ठेवून तसेच पार्किंगसाठी प्रशस्त जागा ठेवल्यास प्रचंड यश मिळेल . शहरातील शाळा , कॉलेजेस त्यांची खेळांची मैदाने , सरकारी कचेऱ्या , बँका , न्यायालये , निरनिराळे क्लब , विद्यापीठ आवार यामध्ये प्रचंड जागा उपलब्ध असतात , त्याचप्रमाणे शहराभोवतालच्या टेकड्या पुष्कळशाप्रत्येक खेळण्याकरिता वापरल्या जातात , त्या जागाही इतर वेळांत शेतमाला वापरता येणे शक्य आहे . शेतकन्यांनी आपआपल्या उत्पादनाची ठरावीक वजनाची पाकिटे करून ठेवली व त्यावर नाव , पत्ता व ब्रँड नेमही घातल्यास अधिक उत्तम,सुरुवातीला ब्रँड  नेम नाही घातले तरी चालेल . या पाकिटांमुळे पटापट माल विक्री करणे शक्य होईल . शेतमालांच्या किंमती राऊंडेड ठेवाव्यात . ज्यायोगे सुट्या पैशांच्या देवाण-घेवाणीत वेळ जाणार नाही . किंबहुना पॅकेज नोटांप्रमाणे असावेत . उदा . १० रुपयांचे कांदे , २० रुपयांचे बटाटे इ . काही शेतकऱ्यांच्या शेतावरचा माल एकत्र करून सामुदायिकरित्या वाहतूक केल्यास तसेच टेम्पोला चार पाच काऊंटर उघडल्यास भराभर विक्री होणे शक्य आहे .

११ . शेतकऱ्यांनी प्रत्येक घरातील एक मुलगा शेतमाल विक्रीसाठी नियुक्त केल्यास नोकरीपेक्षा दहापट पैसे या व्यवहारात मिळतील व त्याची भरभराट होईल . खेडोपाडी बंगले , घरे , गाड्या दिसतील व शहरातील आणि खेड्यातील परिस्थितीत फरक राहणार नाही , जी गोष्ट भाज्यांची तीच फळांची . भारतीय बाजारपेठ जगात सर्वश्रेष्ठ आहे . शेतकऱ्याने हे लक्षात ठेवावे . .

१२ . प्रत्येक पिकाच्या मार्केटिंगसाठी शेतकऱ्यांनी गाव पातळीपासून जिल्हा पातळीपर्यंत सामुदायिक मार्केटिंगचे तंत्र वापरले तर त्यामुळे दर्जा नियंत्रणही करता येईल , प्रतवारीही करता येईल व मार्केटिंग यशानंतर प्रत्यक्ष पीक तयार करण्याबद्दल सामुदायिक विचारही करता येईल , कारण सध्या शेतीचे लहान लहान तकडे झाल्यामुळे मशागत , पाणी इ . गोष्टी अवघड झाल्या आहेत . सामुदायिक शेतीमुळे बी - बियाणे , खते , औषधे , फवारणी , मजुरी सोईची होईल . विमानानेसुद्धा फवारणी होऊ शकेल व त्यासाठी छोट्या छोट्या विमानाचा उपयोग फवारणीसाठी करता येईल .
शिवाय ड्रोप , पॉलीहाऊस , ग्रीनहाऊस , शीतगहे . पॅकिंग हाऊसेसचाही विचार सामुदायिक पद्धतीने  चांगला राबविता येईल व चांगले अॅम्बेसडर नेमून बॅडचे नाव देऊन जाहिरातही करता येईल . त्यामळे शेतकऱ्यांना भाव वाढून मिळतील , तसंच एकमेकांतील स्पर्धा संपुष्टात येईल व एकदम माल मार्केटला येणार नाही व भावही कोसळणार नाहीत . त्यासाठी अद्ययावत गोदामांची साखळी, हक्काची वाहतूक व्यवस्था आणि यांत्रिक हाताळणी हवी . यातूनच प्रक्रिया उद्योगहि समर्थपणे उभा राहू शकेल . पूर्वी तालुका खरेदी - विक्री संघ , जिल्हा खरेदी - विक्री संघ , मार्केटिंगच्या विचाराने काढले होते . पण भष्टाचाराच्या भस्मासुराने ते नामशेष केले . आता  आधुनिक युगात कॉर्परेट पद्धतीने हे शास्त्र अधिक शुद्ध होईल . त्यात सर्व कारभार पारदर्शी असेल व उत्पादनही एकसारख्या दर्जाचे असेल . एकसारखे उत्पादन तसेच सामुदायिक अथवा स्वतंत्र ग्रेडिंग , पॅकिंग हाऊसेस व तयार पॅक मालासाठी वातानुकूलित , अर्ध वातानुकूलित किंवा बिगर वातानुकूलित गोदामे बांधणे आवश्यक आहे . हल्ली पॅकिंगला फार महत्त्व आहे . म्हणतात ना, सोन्याचा मुलामा असलेल्या पॅकिंगमधून मातीही सोन्याच्या भावाने विकली जाते , तर सोन्याला मातीचा लेप लावून पॅकिंग केले तर ते मातीमोल भावाने विकले जाईल . सामुदायिक मार्केटिंगमुळे गोदामे हाताळणी सोपी जाईल व वाहतूकही स्वस्त होईल . प्रत्येकाने स्वतंत्र वाहतूक करण्याऐवजी टेम्पो लोड , ट्रक लोड , वॅगन लोड अशाप्रकारे केल्यास स्वस्त पडेल . तसेच सामुदायिक पॅकिंग , ग्रेडिंग , वेअर हौसिंगमुळे कमी प्रतीच्या मालाचा प्रक्रिया उद्योगही तेथच उभारता येईल . याबाबत अनेक फळांच्या उत्पादक संघांनी पुढाकार घ्यावा व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे . भारतातील शेतकरी ऑटोमायझेशन नसतानाही खूप चांगले उत्पादन घेतो जर त्याला ऑटोमायझेशन , यांत्रिकीकरणाची जोड दिली तर इस्राइल , चीनला सहज मागे टाकू शकेल .

१३ . भारतीय लोकसंख्या व मनुष्यबळ ही आपली ताकद आहे . कुशल मनुष्यबळ निर्माण करण्याची गरज आहे . जगातील एवढे उद्योजक भारतात येतील की नको नको म्हणण्याची पाळी येईल . भारताला गरज आहे ती फक्त विदेशी तंत्रज्ञान आयात करण्याची व विदेशी कंपनीत काम करीत असलेल्या कुशल भारतीयांना आकर्षक अटींवर भारतात परत आणण्याची . भारतामधील सर्वच गोष्टींना सर्वच स्तरांचे व सर्वच किंमतीचे मार्केट उपलब्ध आहेत . येथे 500 रू .डझनाचा हापूस आंबाही विकला जातो आणि तोच सडका झाल्याने ५० रू . डझनानेही विकला जातो . परदेशात जावून माल नाकारला गेला तर शेतकऱ्यांना फार मोठा फटका बसतो , कारण जहाज किंवा विमान वाहतुकीचा मोठा खर्च केलेला असतो . भारतात मात्र तसे नाही . रू . २०० / - किलो स्ट्रॉबेरीवाल्याने नेली नाही तर रू . १७५ वाला तयार असतो . शिवाय ३५ - ४० टक्के माल वाहतुकीच्या साठवणीच्या अपूर्णतेमुळे सडला जातो . त्याचे प्रक्रिया उद्योगात रुपांतर केले तर कितीतरी व्हैल्यू अडीशन होऊ शकते .

भारतीय कृषिमालाची , मसाल्यांची चव परदेशात विकली जाईल . मग कदाचित ती गावरान ज्वारी असेल , मटकी असेल , मेथी असेल अथवा फळे असतील . जगात भारतीय रेस्टॉरंट जास्त जोरात चालणार ते केवळ चवीमुळे . यदाकदाचित चिनी पदार्थानाही भारतीय पदार्थ मागे टाकतील . झाले पाहिजे ते शहाणपणाचे मार्केटिंग . वास्तविक भारतातही बाहेर खाण्याचे प्रमाण वाढलेले आहे . विशेषतः गावरान पदार्थांना चांगली मागणी आहे . हेही कृषी उत्पादकांनी लक्षात घ्यायला हवे .

१४ . भारतीय कृषी उत्पादनाला विशिष्ट चव आहे व तेच प्रमुख आकर्षण भारतीय बाजारपेठेला व परदेशी बाजारपेठेला भुलवू शकते . हे लक्षात घेता आपणांस भारतीय कृषी उत्पादनांची चव मार्केटिंग करायची आहे व त्यासाठी मूळ दर्जा कायम राखावयाचा आहे . त्यासाठी दर्जा नियंत्रण करणारा एक शेतकरी प्रतिनिधी नेमावा म्हणजे हलका माल बाजारात जाणार नाही .

 भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा हा प्रथमपासून कृषिक्षेत्र हाच आहे . तथापि गल्या ५० - ६० वर्षात कृषी क्षेत्राकडे केलेले अक्षम्य दुर्लक्ष आर्थिक असमतोल निर्माण करण्यास कारणीभूत झाले आहे . क्षेत्राकडे काळजीपूर्वक लक्ष दिले तर महाराष्ट्रातच काय तर देशात क्रांती होईल . सरकार लक्ष देईल न देईल पण प्रत्येक शेतकर्याने स्वतः बाजारातील भावाची उच्चांकी पातळी पाहन मार्केटला माल नेऊन भरपूर नफा कमवावा . शेतकऱ्यांवर आत्महत्येची पाळी येणार नाही . त्यामुळे व्यापारी , दलाल यांनी शेतकऱ्यांवर चालवलेल्या संरमजामशाही मक्तेदारीला लगाम बसेल व भारतीय अर्थव्यवस्था कृषिक्षेत्राकडे झुकेल .

 कुचकामी गोदामे व त्यावरील उपाय
१९७५ साली इंदिरी गांधी यांनी खाजगी गोदामे बांधून ती भाड्याने घ्यावीच असे अन्न महामंडळास सांगितले व त्यासाठी तात्काळ ४ . ५ % चे सॉफ्ट लोन देण्याची बँकांना आज्ञा केली . त्याबरहुकूम मी अहमदनगर येथे २५००० टनाचे गोदाम बांधले व आजतागायत ते अन्न महामंडळाकडे आहे . या चाळीस वर्षात अन्न महामंडळाच्या अकार्यक्षम व भ्रष्ट कारभाराची मला जवळून पाहण्याची संधी मला मिळाली . त्यातील माझे निरीक्षण आणि समीक्षण खालीलप्रमाणे आहे .

 १ . गोदामे जुनी झाल्याने कार्यक्षमतेने धान्याची वाहतूक करता येत नाही . गोदामामधील माल अनेक दिवस पडून राहिल्याने खराब होतो व , तो , वरचे पैसे घेऊन मातीमोल भावाने विकला जातो .
 २ . गोदामाची देखभाल चांगली होत नाही .
 ३ . गोदामामध्ये मूलभूत सुविधांचा अभाव आहे .
 ४ . गोदामांची भाड्याची भाववाढ करताना प्रचंड भ्रष्ट्राचार होतो .
 ५. गोदामातील मालाची ने-आण करताना ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्टर्स मोठ्या प्रमाणात भ्रष्ट्राचार करतात .
६ . मालाची चढउतार करताना माथाडी कामगार संप करून अडवणूक करतात .
7) कीडनियंत्रक फवारे ( फ्युमीकेशन ) नीटनेटकेपणाने न केल्यामुळे किंवा नुसतेच केल्यासारखे दाखवून पैसे खाणे या सर्व प्रकारामुळे अन्न महामंडळाकडील गोदामे कुचकामी व अकार्यक्षम ठरलेली आहेत .


 त्यासाठी उपाय-

 १ . गोदामे सायलोज पध्दतीने बांधून ॲटोमॅटीक लोडिंग अनलोडिंग करून वाहतूक करावी .
 २ . शहरामधील जागेचे भाव अतिशय जास्त असल्याने गोदामे मोठ्या प्रमाणात शहरात बांधणे शक्य नाही , म्हणून सदर गोदामे रेल्वेच्या कडेला असलेल्या छोट्या गावामध्ये किंवा राष्ट्रीय महामार्गावरील खेड्यामध्ये बांधावीत म्हणजे जमिनीचा भाव कमी असल्याने तेथे गोदामे बांधणे जमीन मालकाला किंवा फूड कॉर्पोरेशनला बांधणे सोपे जाईल व खेडेगावात मोठ्या प्रमाणात लोकांना काम मिळेल .
३ . अन्न महामंडळासाठी चार कोटी मे.टन एवढाच साठा पुरेसा असल्याने ज्यादा साठ्याची गोदामे खाली करावीत . तसेच चाळीस वर्षापूर्वीची गोदामे रद्दबादल किंवा कॅन्सल करावीत .
 ४ . शक्यतो धान्य साठवणुकीचे काम खाजगी क्षेत्राकडे दिल्यास त्यातील धान्य वाया जाणार नाही . या हमीवर दंडात्मक कारवाई करणे शक्य होईल व सुमारे चार लाख टन धान्याची नासाडी थांबेल.

भास्करराव म्हस्के