परकीय चलनासाठी वरदान ठरणारे पीक कोणते ?
१९८९ - ९० या साली पुण्यात स्ट्रॉबेरी लावून स्ट्रॉबेरी हे पीक कोणत्याही ठिकाणी आणि कोणत्याही जमिनीत येते हे सिध्द करून दाखवून मी शेतकन्यांना नव्या पिकाची दिशा दिली होती . त्याचा प्रचार मी जगभर आणि भारतभर केला , स्ट्रॉबेरी ही केवळ हिल स्टेशनवरच येते , असा असलेला पूर्वीचा गैरसमज खोडून टाकला व ती पठारावर येऊ शकते , मुरुमात येऊ शकते , सिमेंट पाईपात येऊ शकते असे निरनिराळे प्रयोग करून लाखो शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे . काश्मीर ते कन्याकुमारी आणि कच्छ ते कलकत्ता अशा संपूर्ण भारतामध्ये आम्ही स्ट्रॉबेरी उत्पादित केली . त्याचा प्रतिसाद म्हणून आता शेतकरी प्रत्यक्षात स्ट्रॉबेरीकडे वळू लागलेला आहे . नागपूर , इंदापूर , रतलाम , नगर , औरंगाबाद , लातूर , कोचीन , काश्मीर , भेलगाव , कोल्हापूर अशा अनेक ठिकाणी शेतकरी हे लाभदायक पीक घेत आहेत . अवघ्या ६ महिन्यात भरघोस उत्पादन देणारे हे पीक स्ट्रॉबेरी शेतकऱ्यांना जीवनदान देणारे ठरेल असे माझे अनुभवांती मत आहे .
परदेशात स्ट्रॉबेरीला आंब्यापेक्षा जास्त मागणी आहे आणि दरही परवडण्यासारखे आहेत . कॅलीफोर्निया येथे समुद्र किनाऱ्यावरही स्ट्रॉबेरी होते , हे प्रत्यक्ष पाहून मी स्ट्रॉबेरीचा सखोल अभ्यास केला होता . टिशू कल्चर रोपेही यशस्वीरित्या तयार केलेली आहे , तरी शेतकऱ्यांनी महापुरे वटवृक्षी जाती तेथे लव्हाळे वाचती या तत्त्वज्ञानावर स्ट्रॉबेरीचे लव्हाळे असणारे पीक जरूर घ्यावे . परंतु तरीही शेतकरी सहजासहजी स्ट्रॉबेरी हा त्यांना मार्केटिंगचे मार्गदर्शन जरूर घ्यावे . परंतु तरीही या पिकाच्या मार्केटिंग संबंधी समज - गैरसमज व अपुरी माहिती यामुळे शेतकरी सहजासहजी लावण्यास अद्याप धजावत नाही हेही खरे . तेव्हा त्यांना समजून सांगावे , म्हणन हा लेख
जगातील सर्व देशांमध्ये स्ट्रबिरी हे फळ प्रतिष्ठीत मानले जाते व साधारणपणे ५ ते १० / किलो प्रतवारी प्रमाणे मिळतो . भारतामध्ये अद्याप हे पीक अती श्रीमंतांचे आहे असा सर्वसामान्य जनतेचा समज, ते फळ सामान्य माणसांकरिता नाही , म्हणून ते विकले जाईल की नाही याबद्दल शेतकऱ्यांच्या मनामध्ये शंका आहे , म्हणून शेतकरी सदर फळाच्या लागवडीकडे वळत नाही.
परंतु भारत ही जगातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे व सर्वसामान्य माणस अद्याप स्ट्रॉबेरी खाण्यास शिकायचा आहे , कारण ते फळ अद्याप परदेशी फळासारखे वाटते . मात्र सुमारे ५० ते ६० वर्षापूर्वी भारतामध्ये द्राक्षांबद्दलही तसेच होते . फक्त भोकरी द्राक्षं नाशिकला होत असत व ती द्राक्ष केवळ दवाखान्यातील आजारी , माणसासाठी घेतली जायची , ती द्राक्ष महागडी असत . त्यांची किंमत साधारणपणे १२ आणे ते १ रुपया किलो अशी असे . तीच द्राक्षं या ६० वर्षामध्ये क्रांतिकारी बदल होऊन , अनेक जाती निर्माण होवून , सर्वसामान्य माणसांच्या हातात पडलेली आहे आणि संपूर्ण भारतात परिचित झालेली आहेत व त्यांचा दर्जा अत्यंत सुधारलेला असल्यामुळे परदेशातही मार्केट काबीज करू लागलेली आहे . तीच गोष्ट स्ट्रॉबेरीबाबत होईल व स्ट्रॉबेरी अत्यंत लोकप्रिय होईल , त्याचे प्रमुख कारण म्हणजे या फळांचे देखणेपण व चव हे आहे .
स्ट्रॉबेरी लागवडीच्या प्रगत तंत्रज्ञानाप्रमाणे poly house , green house चा विचार न करता एकेरी उत्पादन २० टनापर्यंत घेता येते . तसेच लागवडीसाठी लागणारी एकरी २२ , ६०० रोपे भारतात आता उपलब्ध होण्याची शक्यता आहे . म्हणून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी अभ्यासपूर्वक स्ट्रॉबेरीची लागवड केली व योग्य मार्केटिंग केले . तर त्यांना एकरी ६ ते १० टन सहजारत्या उत्पादन घेता येईल व त्या पासून सुमारे ४ ते १० लाख एकरी उत्पादन अवघ्या ६ महिन्यात घेता येईल . शेतकऱ्याच्या च्या दृष्टीने अत्यंत सोईचा काळ हा सप्टेंबर १५ ते मार्च १५ , कारण याकाळात पाऊस संपतो आणि हिवाळा चालू होतो . स्ट्रॉबेरीची लागवडही ऑगस्ट - सप्टेंबर मध्ये केली जाते व ऑक्टोबर - नोव्हेंबर पासून फळे सुरु होतात . अवघ्या ६० दिवसात स्ट्रॉबेरीला फळे लागतात . इतक्या झटपट काळात कोणत्याही फळझाडाला फळे लागत नाही . तसेच हिवाळ्यामुळे पिकावर रोगराईचे प्रमाणही कमी असते .
स्ट्रॉबेरीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहे , त्यापैकी एक म्हणजे त्यात इलेजिक असिड हे भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे . जे इतर कोणत्याही फळात उपलब्ध नाही , त्यामुळं अमेरिकेत तर कित्येक लोक केवळ स्ट्रॉबेरीवर दिवस काढतात . त्या अॅसिडमुळे कॅन्सर रोगाला प्रतिबंध होऊ शकतो . भारतात तंबाखू खाणारे आणि धूम्रपान करणारे सुमारे ५० ते ६० % लोक आहेत . किंबहुना जास्तच आहेत . जर अशी जाहिरात केली की , धुम्रपान करणे व तंबाखू खाणे धोक्याचे असले तरी तुम्ही त्याबरोबर दोन स्ट्रबिरी खाल्ल्या तर तुम्हाला कॅन्सर होणार नाही , अशी जाहिरात केली तर कितीतरी स्ट्रॉबेरीचा खप होऊ शकेल . तसेच हे फळ लहान मुलांना अतिशय आवडते . म्हणून प्राथमिक शाळेत काही दिवस हे फळ फुकट वाटली तरी महिन्या दोन महिन्यामध्ये मुलांना त्याचे आकर्षण निर्माण होऊन ते आपल्या आई - वडिलांना स्ट्रॉबेरी विकत घेण्याचा आग्रह धरतील व असा प्रयोग आम्ही अनेक ठिकाणी केला आहे . तसेच खेडेगावांतील यात्रा , कुस्त्यांचे फड , निरनिराळ्या कॉलेजमधील तरुण - तरुणी , क्रिकेट , सिनेमागृहे इ . ठिकाणी आम्ही स्ट्रॉबेरीचे प्रयोग केलेले आहे व त्यास भरघोस यश मिळालेले आहे , असे म्हणतात ना विकणाऱ्यांची माती सोन्याच्या भावाने विकली जाते व न विकणाऱ्याचे सोन्याची माती होते आणि स्ट्रॉबेरीमध्ये तर गुप्त सोने लपलेले आहे व ते जितक्या लवकर महाराष्ट्रातील शेतकरी ते जाणून घेईल , तितक्या लवकर त्याची आर्थिक प्रगती होईल.तसेच या फळाला फार मोठी परदेशी बाजारपेठ आहे , म्हणून त्याचा परदेशी चलन मिळविण्याकरिता मोठा उपयोग होईल , कारण जगात सर्वात जास्त खपणारे व प्रतिष्ठेचे फळ म्हणून या फळाकडे प्रहिले जाते . तसेच विमान वाहतुकीचा दरही या फळाला परवडू शकतो व लंडनच्या बाजारात किंवा दुबईच्या बाजारात हे फळ अवघ्या १२ तासात दुकानात पोहचते. फक्त पॅकींग करताना ते नव्या नवरीसारखी सजवलेले पाहिजे . फळ काढल्याची तारीख त्यावर असली पाहिजे . उन्हाळ्यामध्ये ६० % ते ७० % पिकवलेले फळ मार्केटिंगला न्यावे . हिवाळ्यामध्ये १०० % पिकवलेले फळ मार्केटींगला न्यावे , पावसात शक्यतो फळे तोडू नये त्यामुळे बुरशी लागते . तसेच फवारलेले औषध ० % स्ट्रॉबेरीवर शिल्लक राहील , याची खात्री घ्यावी लागेल . देठांची लांबी फळ सहज हातात धरता येईल एवढी असावी . जपानमध्ये लांब देठाच्या फळाला मागणी आहे . जागतिक बाजारपेठ ५० लाख टनाची आहे . फळ करणाऱ्यांनी रोपांच्या भानगडीत पडू नये व रोपेसुध्दा भारतात तयार करण्याचे तंत्र आत्मसात करावे . निष्कारण डॉलर मध्ये पैसे गुंतवू नये , तसेच सामुदायिकरत्यिा जाहिरात केल्यास जाहिरातीचा खर्च वाचू शकतो व वाहतूक सुध्दा शक्यतो सामुदायिकरित्या केल्यास खर्च कमी होईल . फळाचे उत्पादन प्रत्येक गावी एक प्रकारचे व एक सारखे असावे म्हणजे फॅक्टरीमध्ये तयार होणाऱ्या मशिनरीसारखे एकसारखे असले पाहिजे म्हणजे विक्री सुलभ होते .
No comments:
Post a Comment