Showing posts with label work. Show all posts
Showing posts with label work. Show all posts

Friday, February 28, 2020

Remedies for drought relief...( दुष्काळमुक्तीसाठी उपाय)


  Remedies for drought relief...( दुष्काळमुक्तीसाठी उपाय)                


                           दुष्काळमुक्तीसाठी उपाय



 १ . मर्यादित ऊस लागवड करावी .
 २ . ड्रिप वापरणाऱ्या उत्पादकांचाच ऊस साखर कारखान्यासाठी घ्यावा .
 ३ . अपूर्ण पाटबंधारे कालव्यासह पूर्ण केली पाहिजेत .
 ४ . कालव्यांचे अस्तरीकरण करायला हवे .
 ५ . शहरात मोजून पाणी दिले पाहिजे .
 ६ . मोठमोठ्या नगरपालिकांच्या भोवतालची गावे समाविष्ट न करता स्वतंत्र ग्रामपंचायत            टाऊनशिपसाठी ग्रामपंचायतीतील टी . पी . अँक्टप्रमाणे सर्वाधिकार देऊन स्वतंत्र                  पंचायतीस वाढू द्यावे व शहरांची वाढ मर्यादित ठेवावी .
७ . उद्योग क्षेत्राला स्वतःच्या पाणी स्त्रोतांचा नियम करावा ,
 . समान किमान पाणी वाटपाचे सूत्र ठरवावे .

९ . पाणी प्राधान्यक्रम अग्रहक्रमाने अमलात आणायला हवा ,
            १० . बि . ओ . टी . तत्वावर अपूर्ण पाटबंधारे पूर्ण करायला हवेत ,
११ . पाण्याचा गैरवापर हा दखलपात्र गुन्हा समजला जावा ,
१२ . पाण्याचे महत्त्व हे प्राथमिक शिक्षणापासून थेट पदवी परीक्षेपर्यंत टप्प्याटप्याने शिकवले            जावे .
१३  सांडपाणी रिसायकल करून कार्यक्षम पध्दतीने वापरण्यासाठी स्पर्धात्मक निबंध                    मागवावेत.
१४ . खोरेनिहाय पाणीवाटप तंट्यासाठी न्यायनिवाडा करणारी न्यायसभा निर्माण करावी .               न्यायमंडळे , लोकन्यायालय , लवाद इ . नेमायला हवेत .
१५ . कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांसाठी संशोधनास भरपूर प्रोत्साहन द्यायला हवे .
१६ . धरणातील पाणी कालव्यातून शेतापर्यंत जाताना उघड्या कॅनॉलमधून जाते . ते बंद                पाइपातून करणे खर्चिक असले तरी आवश्यक आहे . गुजरात सरकारने कालवे सोलार              पॅनेलने झाकून दोन उद्देश साध्य केले आहेत . एक विद्युत निर्मिती व दुसरे पाण्याचे              बाष्पीभवन थांबवणे .


 १७ . कालव्यावरून फ्लाय-ओव्हर घेऊन अग्रो एक्सप्रेस वेज निर्माण करून सरकारला आणखी प्रगत पाऊल पुढे टाकता येईल . .
 १८ . भूपृष्ठाखाली प्रचंड जलसाठे , कृत्रिम धरणे तयार करायला हवेत . ब्राझीलमध्ये अशी धरणे आहेत .
 १९ . नद्याजोड , खोरेजोड आणि धरणजोड प्रकल्प यावर सखोल विचार होण्याची आवश्यकता आहे . कारण , सध्याच आपण कृष्णेचे पाणी उजनीपर्यंत पोहोचवलेले आहे . त्याचाही विचार व्हायला हवा होता . तद्वत , खोरे - निहाय पाणी वळविणे करावे लागणार आहे . 


 . २० . पाण्याच्या प्राधान्यक्रमाविषयी काय सूत्र असावे . पिण्याचे पाणी , अत्यावश्यक कृषी उत्पादने , उद्योग , फळबागा , ऊसशेती , विद्युत निर्मिती , नौकानयन यांची क्रमवारी ठरवणे आवश्यक आहे .
. २१ . तसेच पिण्याच्या पाण्याची टंचाई राजकारणाच्या पलीकडे गेल्याशिवाय संपणारच नाही . त्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन सामुदायिक निर्णय पेण्याची गरज आहे व त्यामध्ये खालील निर्णय घ्यावे लागतील. शहरांची वाढती लोकसंख्या , वाढता पसारा कडक कायदे करून धांबवावा लागेल.

 *कारखानदारी खेड्याकडेच वळवावी लागेल . ऊस कारखानदारी मर्यादित क्षेत्रातच ठेवावी लागेल . सध्याच्या क्षेत्राच्या १ / ३ क्षेत्रातच ठेवावी लागेल . उसाला पाणी १०० % ड्रीप इरिगेशननेच द्यावे लागेल .
शहरातील सांडपाण्याची प्रक्रिया कार्पोरेशनकडून सक्तीने करून घ्यावी लागेल .
शहरामध्ये घरोघरी रिसायकलिंगचे पाण्याचे शुद्धीकरण करण्याची प्रक्रिया जबरदस्तीने करावी लागेल .
 धरणातील , कालव्यातील व शेतीतील पाणी बाप्पीभवनामुळे ३५ % वाया जाते त्याएवजी solar pannel धरणावर टाकल्यास बाष्पीभवन थांबेल व वीज निर्मिती होईल , कॅनोल वर fly over टाकल्यास कृषी मालवाहतुकीसाठी स्वतंत्र रस्ते तयार होतील व बाष्पीभवन थांबेल . शेतावर मल्चिंग ( आवरण ) केल्यास पिकांना फार वेळा पाणी द्यावे लागणार नाही .
 जल साक्षरतेचे धडे बालवाडीपासून ते पदवी परीक्षेपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातून द्यावेच लागतील .
 पाण्याचा वापर पुनर्वापर याचे लोकशिक्षण देण्याची गरज .
. कमी पाण्यात येणाऱ्या बियाणांची निर्मिती करावी लागेल .
 कोणतेही कृषी उत्पादन लागवडीपासून ते हंगामापर्यंत येईपर्यंत किमान काळ कसा लागेल यावर भरीव संशोधनाची गरज .
 समान किमान पाणी वाटपाचे सूत्र ठरवावेच लागेल , त्यात जिरायत बागायत शेतकरी - ग्रामीण , शहरी नागरिक ह भेदभाव ठेवता येणार नाही .
जलसंधारणाच्या प्रयोगामध्ये महाराष्ट्रामध्ये गेल्या ३० ते ४० वर्षात पाझर तलावापासून आजपर्यंत निरनिराळे प्रयोग झाले त्यावर २ लाख कोटी एवढा प्रचंड खर्च झाला आहे . तरीही पाणी प्रश्न आवाक्यात येत नाही , याचाच अर्थ कुठेतरी जलसंधारण भरकटलेले आहे , आणि व्यक्तीगत झाले आहे , त्याला शास-शुद्ध पायावर नव्याने दिशा दयावी लागेल .
अपूर्ण पाटबंधारे योजनांसाठी खाजगीकरणाच्या माध्यमातून कर तोडगा काढलाच पाहिजे , नाही तर सिंचन घोटाळे होत राहणारच , तर मग कार्य - कुशलतेने खाजगी संस्था पाईपलाईनने पाणी देऊन त्यावर संपूर्ण कब्जा ठेवू शकते , त्यासाठी गरज आहे ती वास्तव योजना मांडणाऱ्या तज्ञाची .
महाराष्ट्रातील नामवंत जलतज्ञांनी सरकारला नसता सल्ला , तपासण्या , नुसते कागदी रिपोर्ट न देता नेमके वास्तव नियोजन सांगितले पाहिजे . जागतिक दर्जाचे जलतज्ज्ञ महाराष्ट्रामध्ये उपलब्ध असताना महाराष्ट्रातील पाणी प्रश्न गेली ५४ वर्ष सुटत नाही हा दैवदुर्विलास आहे असे माझे ठाम मत आहे .
नदीकडेला व कॅनोलच्या कडेला भूपृष्ठावर व भूपृष्ठाखाली प्रचंड जल साठे करावे लागतील . वेळप्रसंगी मोठी धरणे , छोटी धरणे , नद्या , नाले , खोऱ्यांचा विचार न करता भूगर्भातून एकमेकांना जोडावे लागतील तसेच भूपृष्ठाखाली आणि भूपृष्ठामध्ये पाणी साठवण्यासाठी प्रचंड पाणी साठे तयार करावी लागतील .
सर्व स्तरांवरील पाणी वापराची जलनीती कायद्याने ठरवावी लागेल . पाण्याचा गैरवापर हा दखलपात्र गुन्हा ठरवला जावा व त्या गुन्ह्यास जबरदस्त शिक्षा ठेवली जावी , मग तो ऊस शेतकरी असो किंवा शहरातील अलिशान flat मध्ये राहणारा नागरिक असो .
भूगर्भातील खडकाप्रमाणे ढोबळमानाने विंधन विहिरींची खोली मर्यादित ठेवण्याचा कायदा करावा , तसेच विहिरींच्या खोल्या मर्यादित ठेवल्यास भूगर्भातील पाण्याचे काही अंशी सम प्रमाणात वाटप होणे शक्य आहे .

महाराष्ट्रातील सर्व जलाशयांचे त्यात छोटी धरणे , पाझर , तलाव , कोल्हापूर टाईप बंधारे , शेततळे यामधून बाष्पीभवनामुळे १ / ३ पाणी वाया जाते , त्यासाठी Hydroelectric Power निर्माण करणाऱ्या धरण साठ्यावर Flexible Solar Panel टाकल्यास बाष्पीभवनामुळे वाया जाणारे पाणीही वाचेल व महाराष्ट्राला पाहिजे तेवढी विद्युत निर्मितीही होईल . अशा प्रकारचे प्रकल्प फ्रान्समध्ये झालेले आहेत . फ्रान्समधील कंपन्या भारतात येऊन गुंतवणूक करण्यासही तयार आहेत .

                                                    - भास्करराव म्हस्के