सर्वपक्षीय राज्यकर्त्यांना कळकळीचे आवाहन
वातावरणातील अकस्मित बदल ग्लोबल वॉर्मिंग आणि जगाला भयभीत करणारा करणा-या दोन समस्या जगातील सर्व क्षेत्रामध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण करणाऱ्या आहेत .त्याच्यावर देशातील सर्व थरातील संशोधकांना आकर्षक बक्षिसे देण्याचे आश्वासन देऊन त्यासाठी लागणारी अत्यावश्यक साधनसामुग्री तातडीने पुरवण्याची जागा व पैसा उपलब्ध करून या संकटांना तोंड देण्यासाठी तात्काळ पावले उचलली नाही तर कुणालाही नियंत्रणात आणता येणार नाही अशी सामाजिक, राजकीय ,आर्थिक परिस्थिती निर्माण होईल.
डॉक्टर, दवाखाने ,नर्सेस ,मदतनीस, वॉर्डबॉय, चाचणी घेणाऱ्या प्रयोगशाळा ,पॅथॉलॉजी लॅबोरेटरी यांची प्रचंड उणीव भासेल ,म्हणून वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड गुंतवणूक करावी लागेल. दवाखाने अद्यावत करावे लागतील. वैद्यकीय ज्ञानाची तात्काळ देवाण-घेवाण करावी लागेल .राजकारणाच्या चाललेल्या खेळांना स्थगिती द्यावी लागेल व सर्व पक्षीय मतभेद बाजूला ठेवून आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण करावी लागेल.
प्राप्त परिस्थितीमुळे कृषी क्षेत्रावर प्रचंड परिणाम होणार आहे. कोणत्याही देशाला लष्करावर करत असलेल्या महाप्रचंड खर्चात कपात करून तो खर्च वरील गोष्टींसाठी वापरावा लागणार आहे. कारण मानवजातीचे अस्तित्वच संपल्यावर व कोणत्याही राष्ट्राची मानसिकताच संपल्यावर इतर देशावर आक्रमण करण्याची वेळच येणार नाही. ज्यादा लोकसंख्येचा व जादा प्रदेशाचा विकास करावयाचा असल्यास सर्व सुविधा कमी पडतील म्हणून लढाईची भीती सर्व जगाला सोडून द्यावी लागेल व संरक्षण सर्वात महत्त्वाचे राहील .
प्रत्येक देशाला आपली लोकसंख्या आणि आपल्या प्रदेश आंतर्गत सोयीसुविधा यावर भर द्यावा लागेल तेव्हा शाहू-फुले-आंबेडकर, शिवाजी महाराज, प्रभुरामचंद्र, महात्मा गांधी ,गणपती उत्सव ,शारदोत्सव ,धार्मिक स्थळांवर होणारा खर्च अशा भावनात्मक बाबी यावर होणारा अनावश्यक खर्च त्यांच्या स्मारकासाठी, पुतळ्यासाठी होणारा महाभयंकर खर्च याला फाटा द्यावा लागेल.
या वरील दोन गोष्टींसाठी भारताने पुढाकार घेण्याची गरज आहे. आधुनिक औषधापेक्षा हे आयुर्वेदा मुळे कदाचित या रोगाला सामोरे जाण्याचे गणित सुटेल आयुर्वेदामध्ये काम करणाऱ्या पतंजली सारख्या संस्था व आयुर्वेद संबंधी शिक्षण देणाऱ्या संस्था यांनी पुढाकार घेतल्यास व एक कलमी कार्यक्रम समजून त्यावर भारतामधील असलेले बौद्धिक चातुर्य कदाचित जगाला या आपत्तीतून वाचवू शकेल व सर्वश्रेष्ठ भारत ही सज्ञा खऱ्या अर्थाने अस्तित्वात येईल.
इतिहासाचे गोडवे मतांच्या बेरजा वजाबाक्या करतील पण वर्तमान आणि भयानक भविष्य यावर औषध देणार नाहीत हे सर्वांनी लक्षात घ्यावे. एवढेच कळकळीचे आवाहन मी सर्व राज्यकर्त्यांना करतो. तसेच सध्या राजकीय सामाजिक अशांतता झाली आहे. याचे मूळ कारण प्रचंड आर्थिक असते मध्ये आहे त्याचे गणित राज्यकर्त्यांना समजले उमजले तर अनेक राजकीय पेच प्रसंग, मोर्चे ,आंदोलने ,हिंसाचार आपोआप शमेल असे मला वाटते.
भास्करराव म्हस्के

No comments:
Post a Comment