Monday, March 16, 2020

The politics of statues...........#


पुतळ्यांच्या राजकारणावर उत्तर काय ?


  सरदार पटेल पुतळाः २५०० कोटी रुपये , शिवाजी महाराज - समृद्रातील अमेरिकेच्या स्वातंत्र्य देवते पेक्षाही उंच पुतळाः ७००० कोटी रुपये, बाळासाहेब ठाकरे स्मारक पुतळा , डॉ. आंबेडकर स्मारक अशी पुतळा उभारणीची चढाओढ करण्यापेक्षा जनतेला आता मूलभूत सुविधा व तात्काळ प्रशासकीय सुधारणा हव्या आहेत. 


पुतळ्यापेक्षा थोर व्यक्तींची शिकवण लोकांपर्यंत पोहोचवा. जातीय दंगलीचे मूळही बऱ्याच पुतळ्यांच्या विटंबनेतून निर्माण होते आणि ती विटंबना त्यांच्याच अनुयायांनी महत्त्व वाढविण्यासाठी केलेली असते. ही समाजकंटकांची खेळी असते व त्यामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडते, जातीय धर्मीय तणाव विकोपाला जातात, ही वस्तुस्थिती आहे.

 पुतळा उभारणीसाठी शांत व रम्य ठिकाणी स्वतंत्र पुतळा उद्यान उभारावे म्हणजे वाहतुकीस अडचण येणार नाही व सर्व मान्यवर व्यक्तींचे पुतळे व त्यांचे कार्य एकाच ठिकाणी पहावयास मिळेल , अशी व्यवस्था केली तर हिडीस प्रकार होणार नाहीत "
                                   

                                    :- भास्कराव म्हस्के
















Voters think when choosing a candidate....?


उमेदवार निवडताना मतदारांनी कसा विचार करावा ?


Ø  गेली कित्येक वर्षे काही ठरावीक मंडळी राजकारणात आहेत. राजकारण हाच त्यांचा व्यवसाय  बनलेला आहे. तेव्हा नवीन रक्ताच्या म्हणजे २५ ते ४५ या वयोगटातील उमेदवारांना निवडावे.
Ø  राष्ट्रीय व सामाजिक प्रश्नांचा ज्यांचा अभ्यास आहे व आपापल्या मतदारसंघात ज्याचे काम आहे, अशा उमेदवारांचा प्रथम विचार करावा.
Ø  ज्यांच्याकडे राजकीय, सामाजिक शुध्दता आहे, त्यांना निवडावे. ज्या उमेदवारांमध्ये प्रश्न सोडवण्याची क्षमता आहे. असांना अग्रक्रम द्यावा. जे विकले जाणार नाहीत व तशी लेखी हमी देतील, त्यांना निवडावे.
Ø  कालबध्द कार्यक्रम राबविला नाही तर आगाऊ राजीनामा देण्यास तयारी असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य द्यावे.
Ø  मतदान करताना कोणाला मत द्यावे, या प्रश्नाइतकेच कोणाला देऊ नये , याच्याही कसोट्या निश्चित करण्यास महत्त्व आहे. एकवेळ फार श्रेष्ठ नसलेला उमेदवार निवडला गेला तर फारसे बिघडणार नाही, पण समाजविघातक पध्दतीने राजकारण करणाऱ्या व   संशयास्पद चारित्र्याच्या व्यक्तींना धान्यातल्या खड्यासारखे बाजूला काढणे फार महत्वाचे आहे. म्हणून कोणाला निवडू नये, या संदर्भातल्या काही कसोट्या सुचवित आहे.

Ø  अनेकदा निवडून आलेल्यांना खुशाल पाडा. राजकारणात नवी पिढी येऊ द्या.
Ø  ज्याच्या संपत्तीची मोजदाद करता येणार नाही, अशा भ्रष्ट माजी आमदार, मंत्री, साखर कारखानदार , समाजाला पिळून धनाढया झालेल्यांना, शिक्षण सम्राटांना पराभूत करा.
Ø  ज्यांना सामाजिक - राजकीय चारित्र्य नाही अशांना मते देऊ नयेत.
Ø  पैशांपेक्षा व्यक्ती महत्त्वाची मानावी व उत्तम व्यक्तींना निवडावे.
Ø  राजकारण हेच ज्याचे चरितार्थाचे साधन आहे , त्यांना निवडून देऊ नये.
Ø  संपत्तीची आकडेवारी देण्यास तयार नसलेल्या उमेदवारांस आपणही मते देण्यास नकार द्यावा.
Ø  कालबध्द कार्यक्रमांच्या अटींवर आगाऊ राजीनामा देण्यास तयार नसलेल्या उमेदवारांस पराभूत करावे.

Ø  निवडून आल्यावर नीतिमुल्ये ठोकरून सत्तेसाठी सत्ताधारी पक्षाला जाऊन मिळणाऱ्या उमेदवाराला जरूर पाडावे. दारू , मटका , जुगार यांवर अवलंबून जीवन जगणान्यांना अवश्य पराभूत करावे .

Ø  कार्यकर्त्यांनी ५ वर्षे नेत्याच्या मागे राहून ज्या नेत्याने ऐनवेळी टोपी बदलली , त्या नेत्याला अथवा त्याच्या उमेदवाराला जरूर पाडा.

                                               :- भास्करराव म्हस्के





Saturday, March 14, 2020

Sick Small Businesses and their solution .....?


 आजारी छोटे व्यवसाय - उद्योगांच्या गंभीर समस्येवर उपाय काय ?



 महाराष्ट्रातील आजारी छोट्या उद्योगांची संख्या दिवसोंदिवस वाढत  चालली आहे. वेळीच उपाय केले नाहीत तर हा प्रश्न खूपच गंभीर बनेल . हे  उद्योग  आजारी पडण्याची कारणे पुढीलप्रमाणे


नियोजनातोल अपूर्णता –
 छोटा व्यावसायिक हा अनुभवी असतो . त्याला एकट्याला  सर्व भूमिका पार पाडाव्या लागतात. त्यामुळे नियोजन करतांना दुरदृष्टीचा अभाव असतो, स्वाभाविकच नियोजनात गंभीर चूका होतात आणि त्यामुळे कारखाना हळूहळू आजारी पडतो.

 व्यवस्थापनातील अडचणी
 त्याला एकट्याला सर्व भूमिका पार पाडावयाच्या असल्याने व्यवस्थापन करणे अवघड जाते. तो स्वतः एकवेळ तंत्रज्ञ असेल तर व्यवस्थापक नसेल आणि व्यवस्थापक असेल तर उत्तम विक्रेता नसेल आणि तिन्ही गोष्टी एकत्र सापडणे मुष्कील. अरे , स्वतंत्र माणसाची नियुक्ती करावी म्हटले तर परवडत नाही. शिवाय हे तिन्ही गुण एकत्र असणारा एखादा निघाला , तर त्याला जमाखर्चाच्या ज्ञानाचे अंग नसेल तर सगळाच निकाल लागला. तर त्याही गोष्टीमुळे अडचणी निर्माण होतात.

अपुऱ्या ज्ञानाने अडचणी
बरेच छोटे कारखाने सुरवातीला ठीक चालतात. पुढे त्यांना तांत्रिक  ज्ञानाची अडचण पडते. संशोधन त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आणि त्यामुळे मोठ्या कारखान्यांच्या चढाओढीत तो टिकू शकत नाही. मोठा कारखानदार किंवा प्रगत छोटा उद्योगपती या सगळ्या गोष्टींची काळजी घेतो . धंद्यातील संशोधनाचे ज्ञान माहिती असणे अत्याआवशक असते.

 दर्जा नियंत्रणाची सोय नाही –
बऱ्याच छोट्या कारखानदारांकडे दर्जा नियंत्रण किंवा गुणवता नियंत्रणाची सोय नसल्याने त्यांच्या मालाचा दर्जा एकसारखा राहात नाही आणि त्यामुळे मालाच्या तक्रारी वाढतात. पर्यायी त्यांच्या विक्रीवर परिणाम होतो कारखाना आजारी पडतो.

बिले लवकर मिळत नाहीत –
मोठ्या उद्योगांवर अवलंबून असणाऱ्या छोट्या उद्योगांना मोठ्या उद्योजकांकडून बिले लवकर मिळत नाहीत आणि जास्त तगादा करावा , तर ऑर्डर जाण्याची शक्यता असते आणि वेळेवर बिले न मिळाल्यामुळे आर्थिक अडचणी उद्भवतात . पर्यायी कारखाना अडचणीत येतो.


आर्थिक संस्थांचे अडवणुकीचे धोरण –
 बँका , एम. एस. एफ. सी. सारख्या संस्था छोट्या उद्योगांचे अर्ज लवकर निकालात काढत नाहीत. पर्यायी जमवाजमव केलेला पैसा इकडेतिकडे जातो . तोपर्यंत बाजारभाव वाढलेले असतात व योजना परत पुन्हा दुरूस्त करावी लागते. पुन्हा भांडवलाचा प्रश्न येतो. असा या दुष्टचक्रात तो सापडतो.


इमारत व जागा
 यावरील खर्च हा खरोखर छोट्या उद्योगाला परवडत नाही. यासाठी बँका पैसेही देत नाहीत. त्यामुळे त्याकडे असलेली रक्कम इमारतीत व जागेत चुकीच्या अंदाजपत्रकामुळे संपुन जाते व धंदा अडचणीत येतो.

विक्रीकर –
 बऱ्याच उद्योजकांना करांबद्दल गंभीरपणे विचार करायची सवय नसते. ' त्यामुळे विक्रीकर ग्राहकाकडून वसूल केला जातो. तो कचेरीत भरला जात नाही व पर्यायी एकदम रक्कम भरणे शक्य होत नाही आणि मग या कराची रिकव्हरी सुरू होते. त्याचे अकाऊंटला अटेचमेंट येते आणि मग बँका त्याच्याकडे संशयाने पाहू लागतात.

कच्च्या मालाचा तुटवडा
कच्च्या मालाच्या पुरवठ्याची उद्योग संचनालय कधी हमी घेत नाही. त्यामुळे कधी कधी फार पंचाईत होते. विशेषतः सिमेंटप्रणित उद्योगची तर फारच अडचण होते. टाईल्स , पाईप्स ,प्रीकास्ट , स्लॅबवाले इ. लोकांना सिमेंट तुटवड्यामुळे दुहेरी भार बसतो. बांधकाम थंडावल्यामुळे मागणी कमी होते व कच्च्या मालाचा कोटा नसल्यामुळे उत्पादन थांबते , याही कारणामुळे अनेक कारखाने आजारी पडले आहेत.

कर्जाचा दुरुपयोग –
 छोट्या उद्योगांसाठी बँकांचे धोरण शिथिल असल्यामुळे प्रथमत: कर्ज मिळण्यास अडचण होत नाही. म्हणून या संस्थांकडून जरुरीपेक्षा जादा कर्ड घेऊन ते इतर ठिकाणी गुंतवणूक केल्यामुळे किंवा खर्च करून टाकल्यामुळे सर्व कर्जाचा व परतफेडीचा बोजा पडल्यामुळे अनेक उद्योग अडवणीत येतात.


जरुरीपेक्षा जास्त मशिनरी व स्टाफ –
अनेक कारखानदार उद्योग चालण्यापुर्वी त्याच्या विस्ताराची योजना करून अपेक्षित मशिनरी घेवून ठेवतात. जरुरीपेक्षा जास्त माणसे नोकरीस ठेवतात. त्यामुळे खर्चाच्या अडचणी येतात.

-    भास्करराव म्हस्के

About Sick Industries...........?


आजारी उद्योगांपुढील प्रश्न




                माणूस आजारी असला किंवा असहाय्य असला की , लोक नुसतेच त्याच्याकडे सहानुभूतीने पाहतात. सक्रिय सहाय्य कोणी करत नाही. तीच परिस्थिती या आजारी कारखान्याची होते. माणस आजारी असला तर तु कशावरून आजारी आहे , असे विचारले तर तो किमान सर्टिफिकेट आणू शकेल. तर आजारी कारखान्यांना आजारपणाचे निदान करावयाचे असेल तर त्यासाठी आजारपणाचा शिक्कामोर्तब करणारी संस्थाच नाही. स्वत:च त्याने सांगावे. अमुक अडचण आहे , तमुक अडचण आहे. पण आजारपणाचे निदान करणारा कोणीच नसतो.

             असा असाहाय्य कारखानदार प्रथम जातो तो बँकेच्या दारात. बँकेकडून त्याला फार वाईट वागणूक मिळते. त्याच्या अडचणी समजावून घेतल्या जात  नाहीत. त्याने केलेल्या चुकांचा त्याला पश्चाताप होत असला तरी त्याला पुन्हा एकवार उभे रहाण्याची संधी प्राप्त होत नाही. याउलट त्याच्यावर कायदेशीर केस वगैरे करून बँका , एम. एस. एफ. सी. विक्रीकर अधिकारी त्याला अधिक अडचणीत आणू पाहतात , नव्हे आणतातच . 

           बरे , एकदा बँक पूर्वग्रहदूषित झाली असेल , तर दुसऱ्या बँकेकडे जायचे म्हटले की सर्व कर्ज पूर्ण भरणे हे कोणासही शक्य होत नाही व शेवटी सदा आजारी कारखान्यास त्याच बँकेत सापत्न वागणूक मिळते.

          अडचणीतील उद्योगात मदत मागावयाची असेल तर कोणाकडे जावे हा संभ्रम निर्माण होतो. कोणाकडे मदतीचा हात पसरावा हे समजत नाही. सरकारकडे अशा उद्योगांसाठी काहीच पर्यायी योजना नाही. बँका , वित्तमहामंडळे , आर्थिक मदत करणाऱ्या संस्था या तर त्यांच्याकडे पाठ फिरवून बसलेल्या असतात. काय केले म्हणजे तो यातून बाहेर येईल हे समजत नाही. त्याचा कोणीच वाली नसतो.
-    भास्करराव म्हस्के

Youngest Leader In Politics ......# India



तरुणांनी राजकारणात का यावे ?


    'समर्थांच्या राजकारणाचे मर्म दुसऱ्याला समर्थ बनविण्यात आहे. पण जो दुसऱ्याच्या सामर्थ्याला घाबरून ते नष्ट करण्याचे डावपेच खेळतो, त्याच्या सामर्थ्याला शिवतेज लाभणे शक्य नाही. ज्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांसारखा सूर्य महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर तळपत होता, त्याच काळात कान्होजी आंग्रे आणि बाजीप्रभू देशपांडे यांसारखे तेजस्वी नरवीर ' न भूतो न भविष्यती ' अशी ऐतिहासिक कामगिरी बजावतात , हा योगायोग नसतो. ती सर्वोच्च नेतृत्वाची बुध्दीमान योजना व विचारसरणी असते. पण आज चित्र असे दिसते , की नेत्याला दाखवून द्यायचे की असते की मीच सर्वश्रेष्ठ आहे , त्यामुळं तो पक्षातील आपल्या इतर साथींना मोठा होऊ देत नाही. त्यामुळे कोणत्याही पक्षात सक्षम नेतृत्व करणारा नेता शोधणं अवघडच. कारण प्रत्येकजण प्रत्येकाचे पाय ओढत असतात. यातच राजकारण्यांचा बहुतांशी वेळ खर्च होतो.

     आज मनी अँण्ड मसल हेच राजकारणाचे सूत्र झालेले आहे. विचारांचे राजकारण शिल्लक आहे का ? तर नाही, चालू आहे ते फक्त प्रचारांचे राजकारण आणि गटबाजी. त्यासाठी सर्व राजकीय मुल्यांची श्रदांजली दिली जाते. लोकांना दिलेली आश्वासने धुळीस मिळवली जातात . देशाला गरज आहे तो उत्तरदायी नेतृत्वाची स्वच्छ  प्रशासनाची जबरदस्त धाडसी निर्णय घेणाऱ्या नेत्याची , नव्या  कल्पना तत्काळ  अंमलात आणणाऱ्या व्यक्तींची , भ्रष्टाचाराने  आज संपूर्ण देश पोखरलेला आहे. सामाजिक प्रश्न सोडवण्याची तळमळ असणारे नेतृत्वच देशाला वाचू  शकते. म्हणूनच  अशा तरुणांनी  राजकारणात आले पाहिजे. प्रश्न सोडवणाऱ्या नव्या लोकांना जनतेने  निवडून द्यायला हवे. मग तो अपक्ष का असेना. राजकारणात बदल हा नेहमीच चांगला  ठरतो. त्यातूनच व्यक्तीत बदल घडतो. नवी पिढी हि बंडखोर असते व तीच बदल घडवून आणू शकते.

आपण पाहतो, बुद्धीवतांनी, विचारवंतांनी, सुशिक्षित मध्यमवर्गीयानी,  सच्चे सामाजिक कार्यकते , सामान्य माणसाच्या प्रश्नाची जाण असणाऱ्या अभ्यासकांनी निवडणूक प्रक्रियेपासून स्वत:ला कायम दुर ठेवले आहे. अगदी मतदानाबद्दल त्यांची अनिच्छा  दिसते. त्यामुळेच  भ्रष्ट , मनगटशाहीवाले , घराणेशाहीवाले सतत  निवडून देताना दिसतात. त्याचाच परिणाम म्हणजे अद्यापही राष्ट्रीय व राज्य स्तरावरील शहरांचे , खेड्यांचे प्रश्न सुटलेले नाही. सामान्य माणसाचा मोठा अपेक्षाभंग झाला आहे . तेव्हा या सगळ्यातून तरुणांचे नवविचार क्रांती करू शकतात.
-    भास्करराव म्हस्के