Friday, March 27, 2020

Irrigation Commission


सिंचन आयोगाने करावयाचा विचार



v छोट्या व मोठ्या योजनांच्या कालव्याची लांबी मर्यादित करून त्रिस्तरीय कालवे काढून पाणी मर्यादित क्षेत्रात खेळवावे. आपोआप जलसंधार मृदसंधारण होईल.
v खेड्यातील - शहरातील पिण्याचे पाणी सर्रास पाणीसाठ्यातून - धरणातून कलव्यातून घ्यावे.

v औद्योगिक पाणी खाजगीकरणातून करावाम्हणजे प्रादेशिक असमतोल होणार नाही.
v नवीन कालवेउपकालवे यावरून रस्तेपूल न्यावेत म्हणजे बाष्पीभवन कमी होईल व खेड्यातील दळणवळण सोपे होईल.
v शेतीसाठी पाणी वापरावयाचे नसून पिकांसाठी पाणी हि जल साक्षरता शेतकऱ्यांमध्ये वाढवावी.

v पाण्याचे वाटप चारमाहीआठमाहीबारमाही व्हावे व त्रिस्तरीय कालव्यातून व्हावे. त्यामुळे कोरडवाहू जमिनींना किमान एका पिकाला पाणी मिळेल. महाराष्ट्रातील जिरायत शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे.

v भूगर्भातील पाणी सततच्या उपश्यामुळे मर्यादीत होणार आहे. त्यामुळे पाणीसाठे वाढविणे हाच सर्वेत्तम उपाय होणार आहे.

:- भास्करराव म्हस्के



Thursday, March 26, 2020

Sugarcane cultivation and alternative arrangements....

                                         उसाची शेती व पर्यायी व्यवस्था



  आज कोणत्याही पाण्याची हमी नसताना कोरडवाहू शेतकरी अत्यंत कष्टाने उसापेक्षा जास्त पैसा मिळवत आहे , त्यास जर पाण्याची हमी दिली तर तो चमत्कार घडवून दाखवेल , त्यामुळं प्राप्त परिस्थितीमध्ये या संकटग्रस्त उद्योगाला काय वास्तव पर्याय असावेत हे मी खाली नमूद करीत आहे.

पर्याय क्रमांक १ :
अत्यंत कार्यक्षम पद्धतीने चालणारे मोजके साखर कारखाने जबरदस्तीने ड्रीप वापरून घेणारे व त्या कारखान्यांना ऊस पुरवणारे ठिंबक सिंचनावर ऊस उत्पादन करणारे शेतकरी यांनाच सरकारने साखर उद्योगात स्थिर करावे व महाराष्ट्राला लागणारी साखर मर्यादित २५ लाख टनापर्यंत करावी. साखर जीवनाला अत्यावश्यक आहे काय ? माणशी २० किलो साखरेचा हिशोब धरला तर २२ लाख टन महाराष्ट्राला साखर लागते. मग एवढी साखर कशासाठी ? काय करायचे एक कोटी टन साखर उत्पादनाचे ? वास्तविकरित्या मागणी आणि पुरवठा या अर्थशास्त्रातील नियमाप्रमाणे साखर कारखानदारांनी विचार केला असता , तर हा प्रश्न उद्भवला नसता. स्थानिक बाजार पेठेच्या मागणीच्या मानाने पुरवठा दुप्पट - तिप्पट झाला. जागतिक बाजार पेठेतील साखरेचे भाव कोलमडले तरी , आपल्याकडील साखर कारखाने चालूच आहेत. यासाठी निर्दयपणे एक कोटी टन साखर समुद्रात टाकून दिली व अतिरिक्त ऊस जनावरांना खाद्य म्हणून वापरले , तरच खोटी भाववाढ करून व जनावरे वाचवून ज्यादा दुध उत्पादन करून , यातून ताबडतोबीने काय होणे शक्य आहे , याचा निर्दयपणे विचार करावा लागेल , पण हा कायमचा पर्याय नाही.

पर्याय क्रमांक २ :
जसे कारखानदार आपल्या एखाद्या उत्पादनाची मागणी कमी कमी होत चालली तर तो पर्यायी उत्पादन बाजारात आणतो. त्याप्रमाणे साखर कारखानदारीने पर्यायी प्रक्रिया उद्योगाबाबत फार गंभीरपणे विचार करणे आवश्यक आहे.



पर्याय क्रमांक ३ :
 अमेरिकेमध्ये मक्यापासून फार मोठ्या प्रमाणावर साखर केली जाते व त्याच मक्या पासून इथेनॉलही अत्यंत उच्च दर्जाचे होते. मक्यापासून तयार होणारे इथेनॉलही उसातील इथेनॉलपेक्षा कित्येक पट सरस गुणधर्माचे असते. मक्याला पाणीही कमी व अल्पकाळ लागते. मक्यापासून कॉर्न इंडस्ट्रीचे १००० उपपदार्थ तयार होतात. तेथे ऊस उत्पादक व मका उत्पादक यांची जबरदस्त स्पर्धा असून त्यात मका उत्पादक अधिक नफा कमवित आहेत. तीच गोष्ट महाराष्ट्रातील साखर उद्योगाने अवलंबली किंवा स्वीकारली तर पाण्याचा आणि गुरांच्या चाऱ्याचाही मोठा प्रश्न सुटू शकतो व विविध उपपदार्थ तसेच मोठ्या प्रमाणावर इथेनॉल निर्मिती होऊ शकते. हवी तेवढी साखर निर्माण करता येते.



 पर्याय क्रमांक ४ :
 बंद पडणाऱ्या , बंद पडलेल्या आणि भविष्यात बंद पडण्याची शक्यता असणाऱ्या साखर कारखानदारांनी कारखाना क्षेत्रावर ग्रामीण एम . आय . डी . सी . कृषी प्रक्रिया औद्योगिक वसाहत , ग्रामीण गृहप्रकल्प स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट , टाउनशिप , कुशल कामगार निर्मिती केंद्र , सोलर एनर्जी प्रकल्प अशा विविध योजनांचा विचार करावा. कारखान्याची जागा , राहण्याची घरे व इतर बाबी या सर्वामुळे एम आयडीसीमधे प्राथमिक खर्चात बचतही होईल. मिठाई निर्मिती , चॉकलेट निर्मिती , वेगवेगळ्या डाळी , वेगवेगळी खाद्ये तेले , अन्नप्रक्रिया उद्योग काढता येतील. तसेच त्या साखरकारखान्यांच्या गोदामांचे शीतगृहात रुपांतर करून त्यात शेतकऱ्यांचा कृषी माल साठवला जावा , यासाठी लागणारी वीज निर्मीतीसुध्दा सोलर पैनलपासून तयार होणे शक्य आहे. बाकी उपलब्ध मशिनरी परदेशात जावून विकावी. बंद कारखाना मशिनरी १०० ते २०० कोटी रुपयांस विकली जाते. व तेथे हवे असल्यास भागीदारी ठेवावी कारण , अद्याप जगातील मागासलेल्या देशांमध्ये साखर कारखानदारीला भरपूर वाव आहे , एवढेच नव्हे तर ऊस उत्पादक , ऊस कामगार यांनाही बरोबर घेणे शक्य आहे. सदर ठिकाणी सभासदांनीच पुढाकार घेऊन प्रचंड घरबांधणी करून एक सुदर शहर निर्माण करता येणही शक्य आहे. त्यासाठी प्रत्येक भागधारकाला सुमारे २५ लाख किमतीचे एक घर मिळेल अशी व्यवस्था करता येणे शक्य आहे. याशिवाय ऊस उत्पादनाला लागणारे पाणी , भाजीपाला , फळे , तेलबिया , डाळी इकडे वळवल्यास त्यातूनही भरपूर उत्पादन करणे शक्य आहे.


पर्याय क्रमांक ५
 शहरात व खेड्यात आज सुमारे चार कोटी कुशल कामगारा आवश्यकता आहे. त्यातल्या त्यात कृषीक्षेत्राला त्याची जाणीव कृषीक्षेत्राला त्याची जाणीव तीव्रपणे होऊ . लागली आहे. कारण आधुनिक शेतीला लागणारे अटोमोयझेशन , आपोआप चालणारी यंत्रणा , ड्रीप फाँगर , विद्युतीकरण , स्त्रिक्लर्स , ग्रीन हाऊस , पॉली हाऊस , शेडनेटिंग तसेच जैविक खतनिर्मिती , त्याचा वापर तसेच शेतीच्या मशागतीसाठी व हंगामासाठी लागणाऱ्या यंत्राची व अवजाराच्या निर्मितीची नितांत गरज आहे व कुशल कामगार निर्मिती केंद्रातून शिक्षण घेऊन असे संस्थांमधून कुशल कामगार निर्माण करणे शक्य आहे.


पर्याय क्रमांक ६ :
सध्या चालू असलेल्या साखर कारखानदारीमध्ये चाललेला भ्रष्ट्राचार लक्षात घेता , तसेच उत्पादन खर्चात कपात करणे शक्य असूनही त्यासाठी ऊस तोडणी अॅटोमॅटिक मशिनची व यंत्राची आयात केली जात नाही. तसेच ऊस वाहतुकीऐवजी रस वाहतुकीचा विचार का केला जाऊ नये ? यामुळे खर्चात होऊ अधिक बचत शकेल असाही विचार करता येईल. सर्व साखर कारखानदारी कालव्यांच्या जाळ्यांनी वेढलेली आहे व त्या कालव्यांच्या रस्त्यावरून रूळ टाकून किंवा कालव्यांवर फ्लाय ओव्हर्स टाकून ऊस वाहतूक करने सोपे जाईल. इतर वाहतुकीसही त्याची अडचण होणार नाही.


 पर्याय क्रमांक ७ :
 ऊस उत्पादकांनी १२ महिने शेती अडकवून होणाऱ्या मर्यादित ३० ४० , ००० रू . च्या उत्पादनापेक्षा चारमाही , आठमाही पाण्यात येणारे जीवनावश्यक कृषी उत्पादन उदा. तूर , मूग , हरभरा , उडीद , डाळी , शेंगदाणा , सोयाबीन , सूर्यफूल , मका , तीळ यांचा विचार करावा , तसेच मिरची,भाजीपाला , डाळिंब , केळी , पपई , पेरू , चिक , अंजीर , स्ट्रॉबेरी , मधाळ मका , कलिंगड , द्राक्षे इ. सारख्या फळांपैकी एकाची निवड करून त्याचे उत्पादन घ्यावे. 


बासमती तादळ , गहू , ज्वारी यांनाही भरपूर , न संपणारी मागणी आहे. अशारीतीने एक कोट एकरात आवश्यक कृषी उत्पादन झाल्यास ही उत्पादने निम्म्या किंमतीत उपलब्ध होतील व महागाई निम्यावर येईल.


पर्याय क्रमांक ८ :
वास्तविक रित्या वाढत्या साखर कारखानदारांनी मद्य वा विद्युतनिर्मितीऐवजी इंजिनिअरिंग उद्योगात लक्ष घातले असते व शेती उपयोगी ट्रॅक्टर , यंत्रे , अवजारे , खते किंवा औषध - निर्मिती केली असती वा अन्नप्रक्रियेकडे वळले असते तर आज दिवाळखोरीत निघालेले साखर कारखाने वाचले असते. याबाबत उत्तम उदाहरण वारणाचे आहे. तेथील साखर कारखानदारांनी डाळी , खाद्यतेले , बटाटा - प्रक्रिया ( चिप्स ) , तेल इत्यादीचा विचार करावा. तसेच विद्युतनिर्मिती करणारे कारखाने इतर इंधनावर विद्युतनिर्मिती करू शकतात.

                तथापि राज्यकर्तेसंबंधित शेतकऱ्यांचेकामगारांचे नेते हे होऊ देणार नाहीत. कारणतसे केल्याने त्यांचे अस्तित्वच धोक्यात येईल. मात्र ११ लाख ऊस उत्पादकांकडे पर्याय आहेत. तसेच ९ लाख कामगारांकडेही पर्याय आहेत. हे या सर्वांना समजावले पाहिजे.
तेव्हा ११ कोटी शहरी व ग्रामीण लोकसंख्या पिण्याच्या पाण्यावाचून तडफडते आहे. ५ कोटी जिरायत शेतकरी पाण्याच्या हमीशिवाय शेती करतोय आणि आत्महत्याही करतो , या पार्श्वभूमीवर ३० लाख ऊस उत्पादक १० ताय कामगार , ५ - ५० कामगार नेते , १०० - १५० प्रमुख राज्यकर्ते यांचे हित जपावे का , याचा गंभीर्याने विचार करायला हवा. ऊसाचे अतिरिक्त पाणी इतर क्षेत्रास वळविल्यामुळे ३ कोटी ग्रामीण महिलांची १०० दिवसांची पायपीट वाचेल. या मनुष्यबळाची किंमत सुमारे ३० हजार कोट रुपये होईल. कृषी उत्पादनात वाढ झाल्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या रोजच्या खर्चामध्ये निम्याहून अधिक बचत होईल. प्रत्येक व्यक्तीमागे किमान २० रुपये धरले , तरीही वर्षामध्ये ६० हजार कोटी रुपये वाचतील.


             कल्पना करा , ऊस शेती बंद अथवा मर्यादित केली तर म्हणजेच जी साखक कारखानदारी सुदृढ आहे व जेथे शेतकरी एकरी ५० टनांच्या पुढ ऊस उन शेतकरी एकरी ५० टनांच्या पुढ ऊस उत्पादित करतात असेच कारखाने चालू ठेवले व महाराष्ट्राला हवी तेवढीच ( २२ लाख टन ) साखर दत केली तर द्यावे लागणारे नुकसान हे एकूण जनतेवर पडणाऱ्या इतर महागाईच्या भाराच्या मानाने नगण्य ठरेल. महाराष्ट्राचे सर्व प्रश्न मार्गी लागतील.
            महाराष्ट्रात भरपूर पाणी उपलबध होईल. पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष सपल. महाराष्ट्र टँकरमुक्त होईल. पाण्यासाठीची ३०००० कोटी रुपयांची स्त्री शक्तीची पायपीट थांबेल. अपुऱ्या पाण्यामुळे होत असलेली रोगराई थांबेल , घरबांधणी उद्योग झपाट्याने वाढतील.
         
आजही उभ्या पिकाची भरपाई २० , ००० कोटी रुपये देऊन महाराष्ट्र पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडव शकेल . उभे पीक चारा म्हणून वापरून जनावरे वाचतील . लेख लिहिणारा वेडा असेही काही राज्यकर्ते किंवा जाणकर म्हणतील . पण क्रांती ही वेडेपणातूनच होत असते. त्यामुळे असा क्रांतिकारी निर्णय हा महाराष्ट्राला नवसंजीवनी देणारा ठरेल. राज्यकर्त्यांना , माजी - आजी पुढाऱ्यांना , साखर सम्राटांना , कामगारांना , शेतकरी संघटनेच्या नेत्यांना जितक्या लवकर हे उमजेल तेवढे महाराष्ट्राचे लवकर कल्याण होईल.
             अकरा लाख शेतकरी व नऊ लाख कामगार अशा वीस लाख संघटितांपायी महाराष्ट्राची अकरा कोटी असंघटित जनता पाण्यासाठी अप्रत्यक्षरित्या वेठीस धरली गेलेली नाही काय ? हा प्रश्न मी सर्वांनाच विचारतो.
        
                               :- भास्करराव म्हस्के



Wednesday, March 25, 2020

Expectations of the common man



सामान्य माणसाच्या अपेक्षाभंगाची कारणे
• राजकारणातील सर्वसामान्य कार्यकर्ताही अल्पावधीत श्रीमंत होतो , हे लक्षात येताच समाजातील गुंड प्रवृत्तीच्या लोकांत राजकारणाबद्दल आकर्षण निर्माण झाले .
• राजकारणामुळे पैशासोबतच मिळणारी प्रतिष्ठा , मान सन्मान  , सत्ता सुखसोईमुळे १९५२ पासूनच्या निवडणुकीत जी घराणी उतरली , त्यांची पकड राजकारणावर दिवसेंदिवस पक्की होत गेली. साखर कारखाने , शिक्षण संस्था , बैंकांसह पत संस्था  , जिल्हापरिषद , पंचायत समित्या , ग्रामपंचायत सगळीकडे त्यांनी ही पकड पद केली व इतरांना प्रवेश जवळजवळ अशक्य झाले. अनंत काळ सत्ता भोगल्यामुळे सुबलेला परिवार राहिला नाही.त्यामुळे निवडणुकीत कितीही खर्च करण्याची ताकद त्याच्याकडे आहे. राजकिय भ्रष्टाचाराला अंतच राहिला नाही . त्यातून शासकीय यंत्रणाही भ्रष्ट झाली .
सर्वसामान्य सच्चा कार्यकर्ता एवढा खर्च करू शकत नसल्यामुळे राजकारणाबाहेर राहिला. ही होती घराणेशाहीची मुहूर्तमेढ.
• अगदी दुर्बल विरोधी पक्ष व सरकारला धारेवर घरण्या सक्षम विरोधीपक्ष नेत्याची उणीव व त्याच्यात असलेला अभ्यासाचा व आक्रमक वक्तृत्वाचा अभाव त्यामुळे सत्ताधारांनी स्वैराचार केला.
• या सर्व गोष्टींत बुध्दिवंत , विचारवंत आमूलाग्र बदल घडवून आणू शकत होते , पण तेही या प्रक्रियेपासून जाणूनबुजून दर राहिले. कार्यक्षम सरकारी निवृत्त अधिकारी वर्ग निवृत्तीनंतर विचार प्रकट करताना प्रशासकीय उणिवांची माहिती देतात. तेच त्यांनी प्रशासनात असताना परखडपणे मांडले तर ! पश्चात बुध्दी काय कामाची ? नंतर वृत्तपत्रातून लांबलचक लिहन परिवर्तन कसे घडणार ?  
• केंद्रामध्ये मराठी खासदारांचा दर्जा हा मौनी खासदारांसारखा असतो. इतर राज्यातील खासदार राज्याच्या प्रश्नावर एक होऊन सकारवर तुटून पडतात. महाराष्ट्रातील खासदारांनी सतत ५ वर्षे एकत्रित प्रयत्न केले असते तर सीमा प्रश्नासारखे असंख्य प्रश्न जे कायम आहेत ते कधीच सुटले असते. परंतु सर्व पक्षांनी होयबा खासदार पसंद केले , अगदी सातवी पास अशांनाही वर्षानुवर्षे खासदार ठेवले. त्यातून महाराष्ट्राचे फार मोठे नुकसान झाले. किमान राज्यसभेवर तरी चांगली माणसे पाठवायचीपण तेही दिसत नाही.
 • पक्ष कोणताही असोप्रचाराच्या वेळी प्रत्येक राजकीय पक्ष काहीही समिकरण मांडू देतते सर्व सत्ता काबिज करण्यापुरतेच असतात. प्रत्यक्षात सगळे सारखेच असतात. ज्याच्या हाती सत्ता तो पारधी अशीच स्थिती राहाते. तात्पुरते लालूच दाखवून एकदा सावजाला आपल्या कब्जात आणले , की ५ वर्षे मग आपलीच मनमानी ! सगळ्यांनाच अशा भूलथापांचा वीट आलाय. पण त्यावर राजकारणापासून अलिप्त होणे हा उपाय नव्हे.
            भारतापुढे नि महाराष्ट्रापुढे आज स्वातंत्र्यानंतर ६५ वर्षांनीही अगणित प्रश्न. आहेत. हे सारे प्रश्न गांभीर्याने सोडवू शकणारे नेतृत्व आपल्याला हवे आहे. हे सारे प्रश्न सोडवण्याऐवजी अद्यापही राजकिय पुढारी केवळ सत्तेचा खेळ खेळण्यात मग्न आहेत. हे नेते सत्तेतले असो किंवा विरोधी पक्षातील , त्यांना खरोखरच त्यात रस नाही. त्यामुळे त्यांना कोणालाही ते प्रश्न सोडवता येणं शक्य नाही. सत्तेसाठी प्रश्न लोबकळत ठेवायचे व त्याचा उपयोग पता मतं मागण्यासाठी करायचा यातून सर्वच पक्षांच्या नेत्यांनी आजपर्यत जनतेची पोर पसवणुक केली आहे.
         केवळ सभासमारंभातून मिरवणारे , आधारस्तंभ देऊन जनतेची फसवणुक करणारे , खालच्या थरावर जाऊन चिखलफेक करणारे , टीका करणारे , पैसा , जात - धर्माचा वापर करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे. त्यासाठी अशा परिवर्तन घडवणान्या नेतृत्वाचा उदय झाला पाहिजे , जो उत्तम धाडसी निर्णय घईल , प्रशासकिय सुधारणा घडवून आणणारे असेल. तो सामान्यांतूनच होईल , त्याचा शोध घेतला पाहिजे. अशा उमद्या नेतृत्वाची देशाला गरज आहे.

                :-  भास्करराव म्हस्के

Hill dam scheme


             टेकडी
धरणे योजना


     कायमचा दुष्काळ हटवण्यासाठी अपूर्ण धरणे पूर्ण करूनही पाण्याची गरज भागणार नाही म्हणून पावसाचे पाणी अडवण्यासाठी प्रचंड महाकाय पाणी साठे (पाणी गोदामे) निर्माण करावी लागणार आहेत. विशेषत : बाप्पीभवन व पाणी झिरपून जाणारे सुमारे ७० टक्के पाणी वाचवण्यासाठी टेकडी धरणे ही एक अभिनव योजना जी मी महाराष्ट्र सरकारला सुचवली. त्याचे ठोस फायदे असे –
१ . कमी खर्च
२ . कमी वेळेत उभारणी
३ . बाष्पीभवन व झिरपून जाणारे ७० टक्के पाण्याची बचत
४ . सोईस्कर विद्युत निर्मिती
५ . कोरडवाहू शेतीचा आणि पाण्याचा प्रश्न
६ . कोकणातील पाण्याचा प्रश्न निकाली निघेल 
७ . महाराष्ट्र दुष्काळमुक्त होईल,

          सोबतच्या कल्पना चित्रात दाखवल्याप्रमाणे टेकडी धरणे हा महाराष्ट्राला पाणी प्रश्नासाठी चांगला पर्याय होऊ शकता , याची शाखशुध्द मांडणी खालीलप्रमाणे आहे.
       कोणत्याही गावामध्ये , शहरामध्ये असलेल्या टेकड्यांचा उपयोग सदा पाणी साठा निर्माण करण्याकरता होणे शक्य आहे आणि अर्थातच त्या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी , शेतीसाठी , विद्युत निर्मिती , जंगल वाढवणे, पर्यावरण संतुलन या अनेक बाबी साध्य होण्यासाठी आहेत. तसेच टेकडीवरील एकण ( कंशब्यांड एरिया ) पाणलोट क्षेत्राची मोजणी करून तेथील सरासरी पावसाचा अंदाज घेऊन एकूण साठ्याच्या पाण्याचे गणित मांडता येणे शक्य आहे. त्या गणितानुसार टेकडीच्या पायथ्याशी भूमिगत पाणी साठे निर्माण करून, भुमिगत धरणावर व त्यावरील अडलेल्या पाणी साठ्यावर सोलर पॅनल बसवून विद्युतनिर्मीती शक्य आहे व त्याच विद्युत निर्मितीमधून पाणी पम्पिंग करून पुन्हा टेकडीवर जंगल वाढवणे , पिण्यासाठी टाक्या भरणे व शेतीसाठी पाणीपुरवठा करणे शक्य आहे. देशापेक्षाही कोकणात पाऊस जास्त असल्यामुळे तेथे ही धरणे अधिक फायदेशीर व उपयुक्त ठरतील तसेच महाराष्ट्रात सर्व भागांमध्ये प्रचंड प्रमाणात टेकड्या असल्यामुळे पाणलोट क्षेत्र भरपूर आहे व पाऊस कमी पडला तरीही तेथे ही योजना केली तर महाराष्ट्राला खूप फायदेशीर ठरेल व पाणी प्रश्न मार्गी लागेल असे माझे स्थापत्य अभियंता व पाणी प्रशिक्षक म्हणून ठाम मत आहे .
          सध्या चालू असलेल्या पाटबंधारे योजना प्रचंड खर्चाच्या व वेळखाऊ भ्रष्ट्राचाराला कुरण ठरलेल्या आहेत. त्याबरोबर तत्काळ उपयोगात येणाऱ्या या टेकडी धरणांचा विचार महाराष्ट्राने केल्यास सिमेंटच्या साखळी बंधाऱ्यासारखी क्रांती महाराष्ट्रामध्ये होईल . यामुळे पुनर्वसनाचा प्रश्न येणार नाही , पर्यावरणाचे संतुलन राखले जाईल , कोरडवाह शेतीचा प्रश्न सुटेल. विद्युत निर्मिती , रोजगार निर्मिती , कारखानदारी वाढेल , पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल व ग्रामीण भागाचा कायापालट होईल.
                                   
                                  :- भास्करराव म्हस्के





Monday, March 16, 2020

Marathi Man # Money #Business # Economics



मराठी माणसाची अर्थकारणात पिछेहाट कशी थांबेल ?


  स्वातंत्र्यानंतरची सुमारे ४८ वर्षे बारकाईने अभ्यासली तर मराठी माणूस अर्थकारणात मागेमागे चालला आहे. आज महाराष्ट्रातील सर्व आर्थिक नाडया बिगर महाराष्ट्रीयन माणसांच्या  ज्यांनी गेल्या ५० वर्षात महाराष्ट्रात येऊन धंदा केला त्यांच्या हातात आहेत. मराठी माणसे व्यापार करू शकत नाहीत. त्यांच्यातला थोडक्यात समाधान वाटणे हा स्वभाव काढून टाकणे आवश्यक आहे. मराठी माणसांना असलेला अहंगंडभांडणेएकमेकांचे पाय ओढणे कोर्टकचे भाऊबंदकी  मोडेन पण वाकणार नाही हा बाणा नुकसानीचा ठरला आहे. त्याने कामाप्रमाणे स्वतःबदल करणे आवश्यक आहे. मराठी माणसे नोकऱ्या शोधत हिंडतात व्यापारात लक्ष पालत नाहीत. भांडवल नाही म्हणून गप्प बसतात. जर ही वृत्ती मराठी तरुणाने टाकली नाहीतर तो कायम कोणाचा तरी गुलामच रहाणार.
 राज्यकत्यांनी अर्थकारणात बिगर मराठी माणसाशीच व्यवहार केले. मराठी माणसांना विश्वासात घेऊन कधीही व्यापार केला नाही. कारणत्यांना बोटायचे की प्राचाराचा बोभाटा मराठी माणसात झाला तर पुन्हा राजकारणात अवघड होईल. परप्रांतीय अमराठी माणूस भ्रष्टाचारासाठी त्यांना अधिक सोईचा व संरक्षित वाटत होता. म्हणूनच महाराष्ट्राच्या स्थापनेपासून सत्तेशी जवजीक असणारे बिगर महाराष्ट्रीयन आज एवढे मोठे झाले आहेतकी ती एक सत्ताच होऊन बसली आहे.

सहकारी क्षेत्रात साखर कारखान्यांमुळे क्रांती झालीआर्थिक नाड्या थोड्याफार हातात आल्यापण तरीही साखरसम्राटांनी व्यापारासाठी मराठी माणसे जवळ केली नाहीत. कारखान्यांचे सल्लागार कंत्राटदार वाहतूकदार,  लिलाव घेणारे सर्व - बिगर महाराष्ट्रीयन निवडले. दरवर्षीच्या कोट्यवधी   रुपयांच्या खरेदीतील कमिशन साठून साखर सम्राट गबर झाले पण त्यांना सप्लाय करणारे व्यापारी त्याहून जास्त गबर झाले. वास्तविक कारखान्यातील सभासदांची मुले शहरात नोकरी शोधायला हिंडत असताना अशा मुलांना जवळ करून भांडवल पुरवून साखर कारखानदारांनी व्यापारी शिक्षण देणे आवश्यक होते. शेवटी सर्व व्यापारी-सप्लायर कॉन्ट्रैक्टर्स कारखान्यामधून अँडव्हान्स घेऊनच मोठे झालेत.
      त्याचबरोबर पैशांची गंगोत्री होती तेव्हा इतर उद्योगात साखर कारखानदारांनी वळणे आवश्यक होते. त्याच काळात स्कूटर मोटारसायकल रेडिओ टीव्ही पाईप्स ट्रॅक्टर औषधे असे अनेक उद्योग महाराष्ट्रात उद्याला आले आणि ते बहुतांशी बिगर महाराष्ट्रीयन लोकांचे होते.गरज ओळखून महाराष्ट्रात बिगर मराठी माणसांनी कारखानदारीतव्यापारात पाय रोवले आणि भक्कम केले.
     मराठी माणूस कायम भांडवल नाही म्हणून सतत तक्रार करतो आणि स्तब्ध बसतो किंवा नोकरी पसंत करतो. ही गोष्ट जरी खरी असली तरी चातुवापासून व्यापार हा वैश्याकडे गेला आहे. त्यामुळे कोठेही गेलात तर व्यापारी हा वैश्य वर्णाचाच आहे. खेडेगावातील वाणी हा तिथल्या पाटलापेक्षा श्रीमंत असतो किंवा पैसेवाला असतो. याचे कारण आपण व्यापाराकडे कधी नीट पाहिले नाही. तो आपला प्रांत नाही आपल्याला व्यापार करताच येत नाही अशीच भूमिका मनात ठेवून मराठी माणसे येत्या ३५ वर्षात अर्थकारणापासून दर फेकली गेली.
                          मराठी माणसाला नोकरीत धन्यता वाटते. याचे प्रमुख कारण शाश्वत  उत्पन्न डोक्याला ताप नको ही वृत्ती बहुतांश मराठी माणसे नोकरीच्याच शोधात असतात.राज्यकर्त्यांना विचारानोकरीसाठी किती मराठी मुले येतात  व किती बिगर मराठी मुले येतात. तर ९० - ९५ टक्के मराठी मुले नोकरीसाठी धडपडत असतात. व्यापाराचा विचारही त्यांच्या डोक्यात येत नाही.

    वास्तविक शेतमालाला दिवसेंदिवस चांगली मागणी येत असताना खेड्यातील मुले नोकरीच्या शोधात असतात. विक्रेता होण्याची त्यांना ताज वाटते. शहरामध्ये ताजा व दर्जेदार शेतीमाल पॅकिंग करून विकता तर भरपूर    पैसे मिळतात. पण चिकाटीने विक्रेता म्हणून व्यवसाय करणे भावात नाही. मोठमोठे व्यापारी - कारखानदार हे पक्षी होते आणि मग कारखानदार झाले.
           विक्रेता होण्याची धडपड मराठी माणसांनी कधीच व्यवसायातील चिकाटी मराठी माणसाना कधीही जमणार नाही. समजूत केली. स्वभाव बदलता येतो इच्छा फक्त हवी.मोडेन परंतु वाकणार नाही हा बाणा मराठी माणसाने बदलला . बाणाप्रमाणे ताठ तरीही धनुष्याप्रमाणे लवचीक होणे मराठी माण आवश्यक आहे. या स्वभावापायी मराठी माणूस व्यापारात खूप नका करून घेतो. बिगर महाराष्ट्रीय कायम लीन असतातव्यापारात वाकेन पण आर्थिकदृष्ट्या मोडणार नाहीही वृत्ती मराठी माणसाला जोपासावी लागेल.
                        महाराष्ट्रातील सर्व कोर्टात भांडणे चालू आहेत ती बहुतांशी महाराष्ट्रीय किंवा मराठी माणसांचीच आहेत. व्यापारी किंवा बिगर महाराष्ट्रीयन शक्यतो कोर्टाची पायरी चढत नाहीत. एकमेकांत समंजसपणे व्यवहार मिटवतात. व्यापाराचा वेळ कोर्टात वाया घालवित नाहीत.

         मराठी माणूस शक्यतो एकमेकांत स्पर्धा करत असतो. दुसऱ्याचे पाय ओढणे आणि त्याला पुढे न जाऊ देणे ही वृत्ती बदलली नाही तर भविष्यकाळ चांगला नाही. इतर बिगर मराठी माणसे एकमेकांना मदत करीत असतात. तोराला देईल पण तुला देणार नाहीही आपली वृत्ती आहे. ती बदलावी लागेलआपल्यातला माणूस मोठा केला पाहिजे. त्याबद्दल मनात आकस आएता कामा नये.
         महाराष्ट्रात गेल्या १५ वर्षांत छोट्यामोठ्या कारखानदारीत मराठी माणसे मागे का पडली याचा विचार केला तर मार्केटिंग नाही एवढे एकच कारण सबळ आहे. तसेच दर्जा नियंत्रण नाही.
         मराठी माणसे गप्पांत फार वेळ घालवितात. म्हणतात ना वादे वादे भवती बुध्दी भेदः पण त्या नुसत्याच गप्पा होतात. त्यातून निष्पन्न काहीच होत नाही. गावोगावी जशी चावडी असतेतसे शहरातही ठरावीक गप्पांचे अड्डे असतातआणि तेथे मराठी खूप वेळ देतो.
               राज्यकर्ताण्यानीही मराठी माणसांना सत्तेसाठी एकमेकांत झुंजवत ठेवले. राज्य करणातच अर्थकारण आहे या वस्तुस्थितीसाठी मराठी माणसे एकमेकांत लढत राहिली.
                        राज्यकर्ते आणि शासनातील नोकरवर्ग हे दोघेही मराठी असले तरी माणसांची कधीच कामे लवकर होणार नाहीत. राज्यकत्यांचा राजकीय स्वार्थ असल्याशिवाय त्यांची कामे झालीच नाहीत. परप्रांतसीद करून पटापट झाली. मराठी माणसाबरोबर राज्यकत्याना कपाता गोवा राज्यकत्यांनी कधीही सादेबाजी केली नाही. शासनातील नोकरवर्गांनी मराठी माणसाला व्यवसायात कधीही वर येऊ दिले नाही. नेहमी परप्रांतीयांनाच मदत केली आणि तीही भ्रष्टाचाराच्या माध्यमातून. मराठी माणसाला झगडावेच लागले.
           मराठी माणसे कायम अरे - तुरे च्या हमरी तुमरीच्या भाषेत वागतात. बिगर मराठी माणसे आर्जवाने काम करून घेतात. तो आर्जव आपण यापुढे शिकलो नाही तर साराच व्यापार मराठी माणसाकडून निघून जाईल. आपण जी व्यापारपेठ पाहतो त्यात मराठी माणसांच्या दुकानात जायला मराठी माणूसच सहसा तयार होत नाही.
           खोट्या प्रतिष्ठेपायी मराठी माणूस धंद्यातील भांडवल खातो. कर्जबजारी होतो. व्यवसातील नफ्यातला काही भागच आपला आहे बाकी धंद्याच्या वाढीसाठी आहे हे सूत्र पाळत नाही. सणवार लमवार लग्नकार्ये इत्यादीत वाट्टेल तो खर्च होऊन जाऊ द्यातपुढचे पुढे. हे धोरण ठेवून साऱ्या व्यवसायाचा नाश करतो. प्रत्येक गोष्टीचे नियोजन करावे लागते हे मराठी माणसाला जमत नाही आणि त्यासारखे वागणेही जमत नाही. त्यासाठी एकमेकांतील खोट्या प्रतिष्ठेची चढाओढ थांबविणे मराठी माणसाने शिकले पाहिजे.
           वास्तविक मराठी माणूस जगात सर्वात बुध्दिमानअनेक तरुण हुशार मुले अमेरिकेत मोठ्या पदांवर आहेत. भारतातील मोठमोठ्या कंपन्यांमध्येही मोठ्या पदांवर महाराष्ट्रीयन माणसे आहेत. मात्र बुध्दी अनुभव माहिती ज्ञान यांची एनकॅशमेन्ट मराठी माणसाला कधीही करता आली नाही. त्यांच्याच माध्यमातून बिगर मराठी माणसे मोठी झाली. याचाही मराठी माणसांनी जरूर विचार करावा.
मराठी माणसांनी चालवलेल्या संस्था मोठ्या होऊ शकल्या नाहीत. मोठ्या झाल्या तरी त्यांची वाढ होऊ शकली नाही. त्याचे कारण म्हणजे माणसांनी मोठे होण्याचा प्रयत्न केला. संस्था मोठी होऊ दिली नाही. सस्था मोठी झाली की माणसे आपोआप मोठी होतातहे सूत्र मराठी माणूस विसरला. संस्थाच खाण्याचा प्रयत्नही अनेक माणसे करतात.
           तुझं आहे तुजपाशी नाटकात जसे लिहीले आहे की उंट तिरकाच चालतोहत्ती सरळ चालतोघोडा अडीच घरे चालतो. तसा मराठी माणसासाठी असलेला ठराविक चक्रमपणा तो भूषणावह समजतो. आपल हे असं आहे बुवा मला तुम्ही बदला मी आपली चाल काहीही झाले तरी बदलणार नाही. ही वृत्ती मराठी माणसाने सोडून समन्वयसामंजस्य हे गुण घेतले नाहीत तर मराठी माणसे महाराष्ट्रातून फार लवकर संपून जातील.

             शेतकऱ्यांच्या सर्व सभेत मी सांगत आलो आहेकी शेती करतो तो शेतकरी शेतीवर जगतो तो शेतकरी ही व्याख्या केली नाही तर शेतीधंद्यातील आकर्षणामुळे सर्व धनदांडगे शेतीतही येतीलयेत आहेतच. मग हळूहळू मराठी माणसाकडे असलेला एकमेव शेती व्यवसाय हाही बिगर मराठी माणसांकडे जाईल व शेतकऱ्यांना स्वतःच्याच शेतावर शेतमजूर म्हणून वागावे लागेल.
             महाराष्ट्रातील आर्थिक नाड्या ह्या बहुतांशी बिगर मराठी माणसाच्या ताब्यात आहेत. त्यामुळे राज्यकर्तेही त्यांच्याच अधिपत्याखाली व्यापारी करार किंवा कामे करतात. यांत मी बिगर मराठी माणसाला अजिबात दोष देत नाही. तुला न मला घाल कुत्र्याला ह्या म्हणीप्रमाणे मराठी माणूस कंगाल राहिला नि परप्रांतीय हत्ती झाले. धनसम्राट झाले. आम्ही आता त्यांच्याच पोटात घुसायला हवे. मार्केटींगचे दर्जा नियंत्रणाचेचिकाटीचे सातत्याचे धडे गिरवायला हवेत आणि व्यापारी व्हायला मराठी माणसाने सज्ज व्हायला हवे.
            मराठी माणसे संकटकाळीपरीक्षेच्या वेळी अतिशय उत्तम कामगिरी बजावतात. एरवी ते सहजरित्या घेतात. बिगर मराठी माणूस मात्र प्रत्येक दिवस परीक्षेसारखा घेतो म्हणून यशस्वी होतो.
            मराठी माणूस चुकांची कबुली कधीच प्रांजळपणे करीत नाही. त्यावर वाद घालणे वकिली शब्दात चूक असली तरी आपण कसे बरोबर हे दाखविण्यात वेळ दवडतो.
            मराठी माणूस स्वतःसाठी उत्तम वकील असतो. बिगर मराठी माणूस चुकांची कबुली देऊन शक्यतो वाद टाळून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो.
गैरसमजूत हा मराठी माणसाचा पायाभूत स्वभाव आहे. आपल्या मोईन इतर माणसांबद्दल गैरसमजूत करून घेणे आणि आपला हेका न सोडणे हाही मराठी मनाचा स्वभाव बदलणे आवश्यक आहे.
            महाराष्ट्रात जाती - उपजातीतील भांडणे ही मराठी माणसाच्या आर्थिक विकासाला अडथळा आणणारी मोठी विचारात घेण्यासारखी गोष्ट आहे. मराठा ब्राम्हण मराठी - माळीधनगर - माळीसाळी - माळी - कोष्टीमराठी वंजारीवंजारी - धनगर अशा अनेक जाती - उपजातीतील भांडणांचा अभ्यासपूर्वक विचार केला तर राज्यकर्त्यांनीच आपल्या साईसाठी - मतदारांचा एक गट्ठा करण्यासाठी अशा गोष्टींना प्रोत्साहन दिले व आपल्यात संघर्ष लावून दिले व त्याचा भरपूर फायदा मराठीपरप्रांतीयांनी उचलला हे लक्शात येते. ह्यात त्यांचीही चूक नाही. आपणच उपडी करून दिलीमग ते काय थांबणार.

            वर्षानुवर्षे शेतीव्यवसायातलढायांत अडकल्यामुळे ऐश्वर्य उपभोगण्याची सवयच मराठी माणसाला नव्हतीत्यामुळे जरी समजा श्रमाने व नशिबाने श्रीमंती वाट्याला आली तरी त्यावेळी मराठी माणूस अविचारी बनतो व संपत्तीला वाटा निर्माण करतो. हीही गोष्ट मराठी माणसाला विचारात घ्यावी लागणार आहे.
अपयश हे आपले कर्तुत्व कमी पडल्यामुळे किंवा नसल्यामुळे आले आहे असा सरळ कबुलीजबाब देण्याऐवजी काय करूनशीबच नाही असे सांगून ते स्वतःची व कुटुंबाची फसवणूक करीत असतात.
            १०० उपकार केले आणि १०१ वा उपकार करू शकलो नाहीतर मराठी माणसे एकमेकांत वैर निर्माण करून घेतात व अहंभावापायी पुन्हा एकत्र येत नाहीत.  परप्रांतीय उपकाराची जाणीव ठेवून शक्यतो परतफेडीचाही विचार सतत करतो मराठी माणसे बिगर मराठी माणसाकडे निमूटपणे काम करतात. पण मराठी माणसाकडे भांडून त्याचे नुकसान करतात हाही अनुभव आहे.

            मराठी भागीदारी - कारखानदारी दीर्घकाळ टिकल्या नाहीत. सर्व भागीदारी कंपन्या फार छोट्या अवधीत मोडकळीस येतात. बिगर मराठी माणसे शक्यतो भागीदारी टिकवण्याचाच प्रयत्न करतात. अगदीच अशक्य झाले तर फर्म चालू ठेवून त्याचा फायदा एकाने घ्यायचा व रोकड रक्कम दुसऱ्याने घ्यावयाचीअसा तोडगा काढतात. हेही मराठी माणसाने समजावून घेतले पाहिजे. भागिदारी मोडण्याचीही प्रमुख कारणे आर्थिक बेशिस्तअवास्तव उचलअनाठायी खर्च हेच असतात.
            गेल्या १५ - २० वर्षांत महाराष्ट्रात नागरी सहकारी बँका मराठी माणसांनी फार मोठ्या प्रमाणावर सुरू करून अर्थकारणाचा फार मोठा भार त्यांनी शहरी भागात उचलला आहे. तथापि बारकाईने अभ्यास केला तर यांतील बहसंख्य डायरेक्टर मराठी असले नोकर मराठी असले तरी पैशांचा उपयोग मात्र बहुतांशी बिगर मराठी माणूसच करत असतो. कारण मराठी माणसाने अर्थकारणात विश्वासार्हता टिकवलेली नाही. मुळात मराठी माणसांत आपल्या आपल्यातच आर्थिक विश्वासार्हता नाही. त्यापेक्षा आपण परप्रांतीयांवर पटकन विश्वास टाकतो.
           मराठा चेंबर आणि महाराष्ट्र चेंबरमध्ये बहुसंख्य बिगर मराठी सभासद व पदाधिकारी आहेत. मराठी माणूस आहे तो नोकरदार. याचाही मराठी माणसाने विचार करण्याची गरज आहे नव्हे ती काळाची गरज आहे.
                               :- भास्कराव म्हस्के