स्ट्राँबेरी शेतीचे जनक भास्करराव किसनराव म्हस्के
देशभरात स्टाँबेरी महाराष्ट्र,तामिळनाडु,पश्मिच बंगाल,कर्नाटक,हरियाणा
,उत्तपप्रदेश,पंजाब,उतराचंल,हिमाचल प्रदेश,मध्यप्रदेश,बिहार पीक या राज्यामध्ये घेतले जाते
स्ट्राँबेरी हे श्रीमंताचे फळ आहे असे सर्वसामान्य जनतेचा गैरसमज आहे तो दुर करुन सदर फळ सर्वसामान्य माणसापर्यंत कसे पोहोचु शकेल. यासाठी उत्पादकांनी स्थानिक बाजारपेठेत,उदा.शाळा,काँलेज,खेडयातील यात्रा,उत्सव इत्यादी ठिकाणी स्ट्राँबेरी फुकट वाटण्याची आवश्यकता आहे.त्यासाठी उत्पादकांना सबसिडी मिळणे आवश्यक आहे.
स्ट्राँबेरी उत्पादनामुळे दर एकरी आठशे माणसी तास (शंभर माणसे)रोजगार निर्माण होऊ शकतो. स्ट्राँबेरी हे उच्च किंमत असलेले असे फळ आहे. स्ट्राँबेरी व्यावसायिक प्रजाती जर लोकप्रिय झाल्यास राष्ट्रीय
,आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत योग्य प्रश्न सोडविल्यास चांगली मागणी होऊ शकते.
स्ट्राँबेरी उत्पादनामुळे दर एकरी आठशे माणसी तास (शंभर माणसे)रोजगार निर्माण होऊ शकतो. स्ट्राँबेरी हे उच्च किंमत असलेले असे फळ आहे. स्ट्राँबेरी व्यावसायिक प्रजाती जर लोकप्रिय झाल्यास राष्ट्रीय
,आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत योग्य प्रश्न सोडविल्यास चांगली मागणी होऊ शकते.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
भारतात एकुण
240 एचए मध्ये स्ट्राँबेरीची लागवड केली जाते.
कर्नाटकात 100 एकर,तामिळनाडुत
200 एकर,पश्चिम बंगालमध्ये
100 एकर,
कालातंराने स्ट्राँबेरीची लागवड कमी होऊ लागली त्याची कारणेही तितकीच महत्वाच आहेत.
1 स्ट्राँबेरी हे अत्यंत लवकर खराब होणारे फळ आहे.व सर्वसाधारण तापमानात
2-3 दिवस टिकते .कोल्डस्टोरेज मध्ये किमान सात दिवस तरी याला काही होत नाही.
2 स्ट्राँबेरी साठविण्याकरत अपुरे कोल्ड स्टोरेज
3 पीक आल्यानतंर बाजारामध्ये मालाल कमी मिळणारा भाव अशी काही कारणे कारणीभुत आहेत.
-----------------------------------------------------------------------------------------------------
भारतात निर्माण होणारी स्ट्राँबेरी .....
कँमरोझा - शाँट डे या प्रकारात ही स्ट्राँबेरी मोडते. कँलिफोर्नियात ही प्रजाती आढळते. या प्रजातीतुन निर्माण होणारी स्ट्र्र्राँबेरी फळ हे घट्ट,मोठे आणि त्याचा चांगला सुगंध असतो. हे फळ अतिसुक्ष्म जंतुपासुन होणा-या रोगांवरही मात करु शकते. भरपुर उत्पादन,फळाती घट्टपणा यामुळे ही जात शेतक-यांच्या पसंतीस उतरत आहे.
ओसे ग्राँडे
- ही कँलिफोर्नियातील प्रजाती शाँट डे प्रकारात मोडत असुन यातुन ताजे आकारास मोठे असे फळ मिळते.काही यामध्ये फळ दुभंगण्याची शक्यता असु शकते.हे फळ ताजे खाण्यासाठी तसेच फळप्रकियेसाठी चांगले आहे.
शाँडलर - ही कँलिफोर्नियात निर्माण होणारी प्रजात असुन भारतातही याचा शेतकरी मोठया प्रमाणात वापर करतात. शाँट डे प्रकारात ही जात मोडत आहे. या फळाची चव,रंग सर्वसाधारण आहे. त्याची सालही तितकीच नाजुक असल्याने निर्यातीस मर्यादा येतात.
सेलव्हा - कँलिफोर्नियात निर्माण होणारी आणि न्युट्रल डे ची ही प्रजाती आहे. गडद तांबडया रंगाचे तसेच घट्ट असे फळ आहे. परंतु ही जात माईट ,माइल्डडयुच्या संसर्गास बळी पडते
स्ट्राबेरी करता आवश्यक असणारी जमीन ,हवामान विषयी
--------------------------------------------------------------------------------
स्ट्राँबेरी अनेक हवामानांच्या प्रकारात वाढु शकते. साधारणपणे आम्लयुक्त ,वालुकामय जमिनीत या वनस्पतीची जास्तीत जास्त वाढ होऊ शकते.याकरता जमिनीचा योग्य निचरा होणे आवश्यक असते. आँक्टोबर ते मार्च या काळातील रात्रीचे कमी तापमान आणि दिवसाच्या सुर्यप्रकाश यामुळे या कालावधीत स्ट्राँबेरीचे फळ लवकर पिकतात.परंतु हिमाचल प्रदेशसारख्या डोंगराळ प्रदेशात फळधारणा उशिरा ह होते. सर्वसाधारणपणे
45 ते 40 दिवसात रोपांना फुले येण्यास सुरवात होते. त्यानतंर 30 ते 40 दिवसानतंर विक्री योग्य फळे तयार होतात.
पेरणीकरता जमीन तयार करणे
---------------------------------------------------------------------------------------
कमी निच-यातील मातीत स्ट्राँबेरी जास्त वाढत नाही. याकरता जमीन पुर्णपणे विकसित करुन पेरणी करता येते. एकाच जागी पाणी साठुन राहिल्यास पिकाला धोका निर्माण होतो.याकरता वरचेवर नांगरणी करुन अनावश्यक तण काढुन जमीन तयार करावी लागते. जमिनीच्या वरच्या 40 सेंटीमीटर स्तरावरच रोपांची लागवड करावी लागते. जमीनीतील निमँहोड इतर कीड नष्ट करण्याकरता जमीन गरम होण आवश्यक आहे. याकरता
20 ते 40 मायक्राँन जाडीचे प्लँस्टिक आवरण आच्छादणे आवश्यक असते यालाच मलचिंग पेपर असे म्हणतात.
सर्वसाधारणपणे जमिनीला सहा आठवडे पर्यंत तापविणे हे घातक किटक व इतर किड नष्ट करण्यासाठी आवश्यक असते.
स्ट्राँबेरीची लागवड,पुरक खते ,आवश्यक पाणी
---------------------------------------------------------------------------------------------------
एका स्ट्राँबेरीच्या झाडास बारा ते अठरा रनर्स येतात. फुटव्यापासुन किंवा धावणा-या खोडापासुन ( याला रनर्स असेही म्हणतात)
नवीन पिकांची लागवड केली जाऊ शकते.महाराष्ट्रात आँगस्ट ते सप्टेंबर मध्ये लागवड केली जाते.वाफ्यात एकुण चार रांगा करुन 25
ते 30 सेंटीमीटर अंतरावर रोपे लावली जातात. थंड तापमानात ही लागवड केली जाते. खाताच्या बाबतीत बोलायचे झाले तर उत्तर भारतात ठिंबक सिंचनाच्या मार्गानेच हिरवे खत दिले जाते त्यामुळे झाडांची वाढ होते. लागवडी दरम्यान फाँस्फरस,पोटँश,झिंक,जिप्सम यांचा चांगला उपयोग होतो.विशेषत नायट्रोजन
,पोटँश ही चांगले खते दिल्यास फळांचा दर्जा वाढतो. स्टाँबेरीला पाणी किती दयावे याची मानके ठरलेली आहेत. जमिनीची प्रत आणि तिथल्या हवामानाचा समतोल साधुन दर तीन ते चार दिवसांनी पाणी दिल्यास पीक चांगले येते. आणि जिथे उष्ण हवामान आहे तिथे जास्त वेळा पाणी दिले जाते. जमीनीचा आलोवा टिकुन राहण्याकरता,झाडांवरील किड नियंत्रणात आणण्याकरता आणि फळांचा दर्जा वाढविण्याकरता मल्चिंग पेपरचा त्याला प्लँस्टिक फिल्मही म्हटल जाते याचा वापर केल्याने उत्पादन वाढण्यास मदत होते.
स्ट्राँबेरीच्या झाडांच्या संरक्षणापासुन ते मार्कैटिंग पर्यतचा प्रवास.....
------------------------------------------------------------------------------------------------
पावडरी माइल्ड डयु,गिफ स्पाँट,लीप स्काँर्च हे सर्वसाधारण स्ट्राँबेरीचे रोग आहेत. पाने व फळांव्यतिरिक्त स्ट्राँबेरीच्या मुळांवर रेड स्टील राँट,ब्लँक रुट राँट इत्यादी रोगांचे आक्रमण होऊ शकते याकरता चांगल्या रोपवाटिकेतुन रोपे आणणे गरजेचे आहे. तरच सर्वसाधारणपणे एका रोपास दोनशे ते तीनशे ग्रँम इतक्या वजनाची फळे येऊ शकतात. स्ट्राँबेरीच फळ हे नाजुक असल्याने त्याची वेचणी काळजीपुर्वक करावी लागते. काढणीच्या वेळी खराब फळे प्रथम झाडापासुन काढली जातात. काढणी दरम्यान
75 टक्के इतके फळ पिकलेले असावे .चांगली फळे काढल्यानतंर ती बाँक्समध्ये ठेवुन थंड वातावरणमध्ये ठेवणे गरजेचे आहे. स्ट्राँबेरीची वाहतुक करताना शीतकरणही आवश्यक असते. अशा समस्यावर तोडगा निघाल्यास स्ट्राँबेरी उत्पादनास आपल्या देशात फार मोठी संधी आहे. तसेच हे फळ उच्च वर्गामध्ये पसंतीस उतरत आहे. प्रसंगी उत्पादन कमी होत असल्याने दलाल याकरता जादाचे कमिशन घेतात. स्ट्राँबेरीचे मार्कैटिंग हे दोन विभागात विभागले असुन खरेदी व प्रक्रियेसाठी खऱेदी केलेली फळे अशी केली जाते.
-------------------------------------------------------------------------------------------------------------
स्ट्राँबेरी फळाचे शेल्फ आयुष्य वाढविण्याकरता नवीन मार्ग शोधणे आवश्यक असुन पँकिंग करता नवे तंत्र निर्माण होण आवश्यक आहे.
स्ट्राँबेरी
उत्पादनता प्लँस्टिकचा वापर वाढल्याने स्ट्राँबेरीचे उत्पादन वाढविणे गरजेचे आहे.
अपेडा व एनएचबी यांनी स्ट्र्राँबेरी साठविण्यासाठी शीतगृहांची संख्या वाढविणे गरजेचे आहे.
सरकारने स्ट्राँबेरी उत्पादन वाढविण्यासोबत त्याच्याशी निगडीत उदयोगांना प्रोत्साहन देता येईल हे पाहणे महत्वाचे आहे.
केंद्र शासनाने तयार केलेल्या विविध योजनांमध्ये राज्यसरकारचा सहभाग महत्वाचा आहे.
संकल्पना व मार्गदर्शन :-भास्करराव म्हस्के
शब्दांकन:-सिमोन , रोहन
No comments:
Post a Comment