देशातील सुमारे ७० टक्के जनता ही शेतीवर जगते, त्यातील ५० टक्कयांहून अधिक लोक जिराईत शेतकरी आहेत, ते जवळजवळ दारिद्र्यरेषेखालचेच आहेत,पण तरीही शेतीला कधीही पुरेसे संरक्षण मिळाले नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे कधीही गाभीर्याने पाहिले गेले नाही. विविध शेतकरी संघटनांनी खूप काम केले पण ते परिपूर्ण नाही. पहिल्या काही पंचवार्षिक योजनांमध्ये झाली तेवढीच मोठी धरणे झाली, नंतर शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा केव्हाही सखोल विचार झालाच नाही. त्याउलट भारतातील कारखानदारी मात्र वाढत गेली. तिचा पाया मजबूत झाला. तसा शेतीचा मात्र झाला
शेती व शेतकरी त्रिशंकू अवस्थेत आहेत. परिणामतः सर्व व्यापारी, दलाल श्रीमंत झाले. शेतकऱ्यांच्या जीवावर कारखानदारही गब्बर झालेत, मात्र शेतकरी आहे तिथंच राहिला. शेवटी प्रत्येक माणूस प्रत्येक देश, हे जग चालते ते अन्नावरच. कोणी कितीही पैसा कमावला तरी तो पैसा खाऊन काही जगू शकत नाही. त्याला शेतकर्यांच्या अन्नधान्याची गरज आहेच, कारण कृत्रिम अन्नाचा काही अद्याप शोध लागलेला नाही. तेव्हा शेतकरी हा जगला पाहिजे. त्याला जगवलं पाहिजे, नव्हे तो.राजा असला पाहिजे, शेतकऱ्याचे राज्य आले पाहिजे. ही मोठी गरज आहे. त्यासाठी माझे काही मुद्दे पुढीलप्रमाणे -
शेतकरी ह्याची व्याख्या शेतीवर जगतो, स्वतः शेती करतो, तो शेतकरी. अशी असायला हवी.
कोणीही येऊन शेतीधंद्यात
लुडबूड करू नये.
शेतीला म्हणून सरकारने जे काही धोरणात्मक
कायदे केलेले आहेत, ते सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोचले पाहिजे. मध्येच
गडप होता कामा नयेत.
शेतक-्यांना स्वतः हुन मार्केटिंग करता
यावे यासाठी पंकिंग, ग्रेडिंग शेड, प्रीकुलींग, कोल्ड स्टोअरेज, स्वत:ची
गोदामे यांसाठी पतपुरवठा केला जावा.
शेतकरी, उत्पादक, सभासद वर्ग हा
५० टक्के भागभाडवलदार असल्याशिवाय शेतीवर आधारित नव्या
गुंतवणुकीच्या कंपन्यांना भांडवल उभारणीस परवानगी देऊ नये.
शेतमाल विक्रीसाठी शहराच्या मोक्याच्या
ठिकाणी शेतकऱ्यांच्या मुलांनाच गाळे द्यावेत. म्हणजे शेतातील माल
डायरेक्ट कंइ्युमरपर्यंत जाईल. दोघांनाही उत्तम भाव मिळेल.
झुणकाभाकर योजनेप्रमाणे.
कृषीउत्पन्न बाजार समितीत होणारे लिलाव
पारदर्शक व्हावेत. रुमाल टाकण्याची पध्दत बंद व्हावी.
कृषीउत्पन्न बाजार समितीत भरपूर मोठी
शीतगृहे होण्याची गरज आहे.तसेच विमानतळावरही मोठी शीतगृहे जरुरीची आहेत.निर्यातीच्या सर्व सवलती शेतकऱ्यांना
मिळाल्या पाहिजेत.
साखर कारखाने सुरक्षित
ठेवून जिराईत शेतकरी सुखी कसा होईल हेसूत्र मांडले गेले
पाहिजे
परदेशी दौरे, माहिती दौरे, मार्केटिंग दौरे यांत प्रामुख्याने शेतकऱ्यांच्याच मुलांचा भरणा झाला
पाहिजे.
शेतक-याच्या मुलांना शेतमालाच्या मार्केटिंगसाठी तात्काळ पतपुरवठा केला गेला पाहिजे.
व्यवसायातसुध्दा ५० टक्के भाग-भांडवलदार हे उत्पादक असले पाहिजेत व त्यांचा त्यावर कंट्रोल असला पाहिजे.
नवीन नवीन प्रोजेक्ट हे प्रथम शेतकऱ्यालाच द्यावेत. बिगर शेती उद्योजकांना देऊ नयेत.
शेतजमीन हस्तांतर कायदा व धरणातील पाणीपुरवठा हा फक्त शेती करणाच्यांसाठीच असला पाहिजे. फार्म हाऊस
बांधण्यासाठी नाही.
शेतजमिन विकत घेऊन ती ३ वर्षे पडीक ठेवल्यास सरकारने दुसर्यास कसण्यासाठी द्यावी.
धनिक वर्गाने पडिक जमीन उपयोगात आणावी. ती काही थोडी नाही.एक कोटी हेक्टर आहे.
पाणी साठचाच्या खाजगीकरण प्रस्तावामध्ये त्या योजनेखालील शेतक-्यांना सामावून इंटिग्रेटेड बोजना करणे शक्य आहे.
भास्करराव म्हस्के
No comments:
Post a Comment