प्रती,
नामदार,
अजितदादा पवार. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई .
विषय – सन २०२०-२१ अंदाजपत्रकासंबंधी काही महत्वाच्या सूचना
महोदय
महाराष्ट्र सरकार पुढील अंदाज
पत्रकासाठी मी काही सूचना आपल्या विचाराधीन असाव्यात यासाठी देत आहे. ज्या पटतील त्या घ्याव्यात न पटतील त्या सोडून द्याव्यात
1)
जमा खर्चाची जुळणी करताना भांडवली खर्चासाठी फार
कमी रक्कम शिल्लक राहते हा आपला नेहमीचा अनुभव आहे. म्हणून शहराची श्रीमंती व ग्रामीण भागाची गरिबी यांची मैत्री घडवून आणावी लागेल त्यासाठी शेती किंवा पीक दत्तक योजना यावर विचार व्हावा म्हणजे कोरडवाहू शेतकऱ्यांना बँकेचे कर्ज आणि व्याज या चक्रव्युहातून बाहेर काढता येईल त्यासाठी
शेतीमाध्ये गुंतवणूक दारांना शेती
उत्पादनातून मिळालेल्या पैशाला कोणातही टॅक्स आकारू नये तसेच हे उत्पादन करताना
टाकलेली रक्कम भांडवली नफा (कॅपिटल गेन टॅक्स ) यातून जमा झाली असेल तर तीही करमुक्त करण्याची शिफारस केंद्राला करावी म्हणून वैयक्तिक व्यक्ती,भागीदार कंपन्या,कार्पोरेट कंपन्या अशा विविध श्रीमंत घटकांना शेतीमाध्ये उतरण्याचे प्रोत्साहन
द्यावे.
2)
आज ना उद्या उस शेतीवर गंडातर येणारच आहे म्हणून
उसा ऐवजी मक्या पासून सुरु होणाऱ्या छोट्या छोट्या कारखान्यांना साखर उत्पादनासाठी
प्रोत्साहन देऊन हे कारखाने काही वर्षासाठी सर्व करातून मुक्त करावेत . अमेरिकेमध्ये मका
उद्योग साखर उद्योग पेक्षा अधिक स्थिर व फायदेशीर आहे . त्यांची पाहणी
कराण्याकरीता शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे
.
3) ऊस उत्पादनात महाराष्ट्राने अत्यंत भरभराटही केलेली आहे व चुकीच्या निर्णयामुळे काही कारखान्यांनी दिवाळखोरीही केली आहे. ५० वर्षाच्या साखर उद्योगाच्या अनुभवाचा
फायदा अप्रगत देशामध्ये उत्पादक शेतकरी ऊसतोड कामगार कारखान्यातील कुशल कामगार व
कुशल अभियंते यांना बंद पडलेल्या कारखान्यांच्या मशीनरी सह परदेशात पाठवून उत्पन्न जास्त मिळवावे व परदेशी चलनही मिळवावे.
4)
प्रक्रिया उद्योगाला प्रचंड स्कोप असल्यामुळे तिथेही खासगी भांडवल कसे येईल व उद्योगाप्रमाणे सर्व सवलती कशा मिळतील ह्यासाठी खास आकर्षक योजना मांडाव्यात.
5) पाटबंधारे रस्ते ,जंगले अशा योजना पूर्ण
होण्यासाठी खाजगीकरणाचा प्रयोग करावा म्हणजे जुन्या मशिनरीची योग्य किमंत येईल
.
6) बंद पडलेल्या साखर कारखान्याच्या जागेमाध्ये आदर्श
ग्रामीण टाउनशीप तयार करून त्याचे रुपांतर सुरेख शहरामध्ये अथवा छोट्या गावामध्ये होऊ
शकेल जमल्यास तेथे कृषिमाल विक्रीचा मॉल,बिल्डींग,पार्किंग सेंटर,शीत गृहे,कृषिमाल
साठवण्याची गोदामे तिथे उभी राहू शकतात कृपया याचाही विचार करावा. याशिवाय अद्ययावत क्रीडा संकुले व मनोरंजन केंद्रे बंद पडलेल्या कारखान्यातील ठिकाणी उभी केल्यास तेथील लोकांना उद्योग
व रोजगार मिळेल.
7)
कृषी पर्यटन केंद्रे यांना अनेक सवलती देऊन ती पर्यटक आकर्षण केंद्रे करण्यासाठी सुलभ कर्जे द्यावीत.
8)
धरणातील पाण्याचे व कॅनल मधून वाहणाऱ्या पाण्याचे
बाष्पीभवन होऊ नये म्हणून विद्युत निर्मिती खाजगी गुंतवणुकीतून करावी . तसेच
कोरडवाहू शेतीला कायमचे उत्पन्न मिळावे म्हणून सोलर विद्युत निर्मितीसाठी बिनव्याजी
कर्ज द्यावे व खाजगी भागीदारी घेण्यास परवानगी द्यावी व कॅनलवरून फ्लायओव्हर टाकून
शेतमालासाठी अग्रो एक्सप्रेस हायवे तयार करून मा. केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांचे कडून अर्थ पुरवठा घेऊन
फ्लाय ओवर बांधल्यास शेतमाल झटपट शहरामध्ये येईल उसाच्या गाड्यामुळे आडणारे ह्मरस्ते वाहतुकीला मोकळे होतील व पाण्याचे बाष्पीभवनही थांबेल. तसेच
कॅनल वरील रस्तावर दोन्ही बाजूला सोलर पॅनल टाकल्यास विद्युत निर्मिती देखील होईल व सतत वाहत्या रस्त्यामुळे पाणी चोऱ्याही
थांबतील. दुकाने हॉटेल शेतमालाचे मॉल उभारण्यासाठी कॅनल च्या बाजूने सोडलेली जागा झाडे लावण्यासाठी वापरता येईल व रस्ता अतिशय देखणाही करता येईल .
9)
पूर नियंत्रणासाठी धरणाच्या पाणलोट
क्षेत्रामध्ये महाकाय तलाव बांधून धरण क्षमतेएवढे पाणी सहज साठवता येईल. त्याला
फक्त खोदाई करायची असल्यामुळे फारसा खर्च
होणार नाही व धरण पाणलोट क्षत्रामध्ये प्रकल्प ग्रस्तांना हमखास
पाणी मिळू शकेल व हा प्रयोग आपण जरूर करावा त्याचप्रमाणे पुरामुळे पाण्यात जाणाऱ्या
गावांच्या जवळून नदीला कॅनल खोदून कृत्रिम नदी करून पाणी वळवून जाईपर्यंत घेऊन
जावे. व त्या कृत्रिम नदीवर दोन्ही बाजूला महाकाय भूपृष्ठावरील धरणे करावीत म्हणजे
दुष्काळाचा प्रश्नही पुष्कळसा निकाली निघेल.
10)
जल संधारणाच्या कामावर खर्च झालेला पैसा हा ८०
टक्के वाया गेला आहे तसेच श्रम शक्तीही वाया गेली आहे त्यासाठी शून्य बाष्पी भवन शून्य पाझरीकरण व 100 टक्के पुनर्भरण अशा टेकडी धरणाचा कोकणासह सर्व भागात
उपयोग करावा.
11)
मेट्रो सारख्या महाकाय योजना नदी किनाऱ्यावरून न्याव्यात
म्हणजे गावातील अडथळा दुर होईल व सध्या चालू असलेल्या मेट्रो ह्या अंशतः पूर्ण
करता येतील अशाच कामे करावीत सबंध रस्ता खोदण्याचे म्हणजे दीर्घ काळ ट्राफिक जॅम होण्याचे प्रकार थांबतील थोडक्यात 20
स्टेशन असलेली मेट्रोची ५-५ स्टेशन पूर्ण करून पुढे नेण्याची भर घालावी किंवा चार कंत्राटदाराना काम वाटून द्यावे जमल्यास मेट्रो ही बी. ओ. टी . तत्त्वावर चालवण्याचा गांभीर्याने विचार करावा
.
12)
बेरोजगार तरुणांना उद्योग क्षेत्र ऐवजी सेवाक्षेत्राकडे वळविल्यास त्यांच्याही हाताला काम मिळेल व उत्तम सेवेमुळे जनताही सुखी होईल जसे
जेष्ठ नागरिकांचा सांभाळ करणे,चौकाचौकात वाहतूक नियंत्रण करणे,शहरातील स्वच्छता
ठेवणे
.
13)
ग्रामीण भागामध्ये कृषी कौशल्य संस्था काढून ट्रॅक्टर दुरुस्ती ठिबक संच दुरुस्ती, इलेक्ट्रिकल वायरिंग मोटार दुरुस्ती, ऑनलाईन कृषी
मार्केटिंग,प्रतवारी किंवा पॅकिंग असे उद्योग सुरु करावेत.
14)
वनीकरणामध्ये लावलेली झाडे ५० टक्के देखील टिकत
नाहीत म्हणून प्लांट,ग्रो आणि ट्रान्स्फर या तत्वावर वनीकरण वाढवावे व वणवे लागू
नयेत म्हणून टेकडी धरणाचा विचार करावा तसेच वन शेती करणाऱ्या शेतकर्यांना झाडामागे इन्सेटिव्ह द्यावा शेती बांधावर खराब जमिनीवर शेतकरी झाडे लावतील व वनीकरण न
झपाट्याने वाढेल
15)
महाराष्ट्रची लोकसंख्या अनेक कारणांनी खूप भरभर वाढली आहे म्हणून तरुणांना आकर्षक अटीवर १० वर्ष मूल होऊ न देणे, एकच मूलावर भागवणे इ . या तरुणास टॅक्स मुक्त अग्रक्रमाने घर अशा सवलतीत द्याव्यात तसेच नोकरीची हमी द्यावी म्हणजे लोकसंख्या नियंत्रणात राहील.
16)
ग्लोबल वार्मिंग मुले हवामानामध्ये प्रचंड बदल
होणार आहे . त्यामुळे वाढले पूर, गारपीट अशा संकटांना सरकारला समोर जावे लागणार
आहे. त्यासाठी मोठ्या रकमेकी सोय करणे व अद्यावत यंत्रणा उभारने याला अनन्य साधारण महत्त्व द्यावे लागेल. मी तर म्हणेल याच्या पुढच्या काळात आपत्ती संरक्षण
यासाठी परदेशी एक्सपोर्ट टीम बोलावून आपल्याकडील लोकांच प्रशिक्षण केले तर ते अधिक
कार्य क्षमतेने काम करू शकतील
17)
पुतळे उद्यान स्मारक पुण्यतिथी व प्रकटदीन
यासारख्या भावनिक गोष्टीवर खर्च न करता जनतेच्या
मुलभूत गरज लक्ष द्याव्यात.
18)
शेती व्यवसायावरती विशेषता कोरडवाहू शेतकऱ्यावरती संकटांचे मोठे वाढ होण्याची शक्यता आहे. म्हणून शेतमाल सुरक्षेसाठी
शेतकऱ्यांच्या मालकीचेच गोदाम शेतावर बांधून त्यास कुलूप लाऊन बँकेने त्वरित पैसे
देणे महत्वाचे ठरेल यासाठी उत्पादन क्षमतेच्या सव्वापट क्षमतेची गोदमे नाशवंत, बिगर
नाशवंत अर्धनाशवंत या पद्धतीने बांधावी लागतील त्यासाठी मोठ्या रकमेची गरज भासेल.
19) पा टबंधारे खात्यसाठी फार मोठी रक्कम खर्च करावयाची
असल्यामुळे
बांधा ,वापरा आणि हस्तांतर करा या पद्धतीने अर्धवट योजना शक्यतो चालू कॉन्ट्रॅक्टरकडूनच करून घेतल्यास व लाभार्थ्यांना त्यात संभवून घेतल्यास योजना झपाटायाने
पूर्ण करता येतील त्यासाठी तांत्रिक साह्य देण्याची माझी तयारी आहे.
20)
बेरोजगारांचा प्रश्न डिजीटलायझेशन मुळे दिवसें
दिवस गंभीर होत जाणार आहे. म्हणून त्यांना योग्यती नौकरी मिळे पर्यत त्यांना बेकार भत्ता देण्याची प्रथा सुरु करावी लागेल.
21)
अनेक बिल्डर्सकडे व मोठ्या मोठ्या उध्योगाका मोठे
भूखंड विना वापर कितेक वर्ष पडून आहेत. त्यांना कालबद्ध वेळेत डेव्हलमेंट न
केल्यास प्लॉट परत घेण्याची नोटीस द्यावी व तिथे नव्या पद्धतीने झटपट बांधकाम
करावे.
22)
विनापरवानगी झालेल्या बांधकामाचे कामे, सरकारच्या
क्लिष्टपद्धतीच्या परवानग्या सोप्या
करण्यावर भर द्यावा म्हणजे योजना तातडीने पूर्ण होतील.
.
23)
रस्त्यांची परिस्तिथी खड्ड्यामुळे अतिशय वाईट
असल्यामुळे व वाहतुकीवर प्रचंड ताण असल्यामुळे अपघातांची संख्या वाढलेली असून
दिवसें दिवस माणसे मृत्यमुखी पडत आहेत त्यासाठी अपघाताच्या जागीच तातडीने ऑपरेशन सहित वैद्यकीय सेवा देणारे फिरते रुग्णालयच्या योजनेला सरकारने प्राध्यान्य द्यावे
म्हणजे मृतांची संख्या कमी होईल व अशीच रुग्णालये तालुक्याच्या ठिकाणी ठेवल्यास ग्रामीण भागात होणाऱ्या बळात्काराच्या घटना आत्महत्या वगेरे घटनांसाठी ताबडतोब ऑपरेशन होऊ शकेल.
24) 24)
जेष्ठांना संख्या दिवसे दिवस वाढत आहे व हल्लीची
मुले पालकांचे अजिबात ऐकेत नाहीत व कर्ती झाल्यावर पालकांनी त्रास देतात व प्रसंगी
घरातूनही हाकलून देतात
तेव्हा अशा वृद्धांना संरक्षित होस्टेल हि फार गरज आहे अनेक
जेष्टांकडे देण्याच्या दिलेल्या असताना सुद्धा देणगी घेणारा वृद्धांना परतफेड करत
करत नाही. व देणगीदार वृद्धाकडे दुर्लक्ष करतो.वृद्धांना सहनभूती नको, दया नको,
प्रेम, संरक्षण ,वैद्यकीय सेवा व सामाजिक सुरक्षितता व उत्तम आदर याची नितांत गरज
आहे व
अशा स्कीम कमर्शिअल बेसिसवर चालवण्यासाठी शहरातील आरक्षित भूखंडमधील महत्वाचे भूखंड अशा वृद्ध श्रमासाठी घ्यावेत त्याला जोडून करमणूक केंद्र व आरोग्य
केंद्र असेल तर ते त्याकडून जोडून करमणूक होईल .
अनेक वृधानाकडे पैसे आहेत पण सुख
नाही अशी परीस्थीती असल्यामुळे अनेक वृद्ध त्यांचे बँकेतील रक्कम न वापरताच स्वर्गवासी झाले अशी रक्कम ५० कोटी (अनक्लेम ) रु. इतकी आहे. असा प्राथमिक अंदाज आहे. त्याचा विनियोग चतुरपणे करावा. त्यात
ग्रामीण भागाचाही प्रश्न हि कौशल्याने सोडवावे.
भास्करराव म्हस्के
No comments:
Post a Comment