काल दिनांक 22. 2. 20 रोजी आपली एबीपी
माझा वरील प्रकट मुलाखत ऐकली पाहिली.आपण अनेक गोष्टी
आत्मसात करण्याचा जो प्रयत्न करत आहात तो अभिनंदनीय
आहे. प्रश्न कोणीही मांडू शकतात.
व महाराष्ट्रात बरेचसे नेतृत्व प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर जन्माला
आलेले आहेत .तथापि गेल्या साठ वर्षांत महाराष्ट्राचे अनेक प्रश्न
सुटलेले नाहीत. ग्रामीण गरिबी आणि शहरी श्रीमंती यामध्ये जमीन-
अस्मानाचा फरक आहे.
लोकसंख्या ,ग्लोबल वॉर्मिंग ,जंगलाची वाढ, कृषी
क्षेत्राची परवड ,पाण्याचे किमान समान वाटपाचे सूत्र, दीर्घकालीन
मेट्रोच्या योजनांमुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी ,शहरातील
हवेतील प्रदूषण, ग्रामीण शहरी तरुण मंडळींचा बेरोजगारीमुळे निर्माण
झालेला असंतोष ,स्त्रियांवरील अत्याचार ,धार्मिक जातीय
तणाव ,साठ वर्षे होऊनही दोन कोटी ग्रामीण महिलांना
तासंतास, दिवसेंदिवस, पाण्यासाठी खर्च करावे लागतात त्यामुळे
होणारा मनुष्यबळाचा ऱ्हास, कोर्टातील अक्षम्य दिरंगाई ,आपत्ती
संरक्षणाची अपुरी साधने व पथके, भिजत पडलेला सीमावाद ,असे
अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत .
आता महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने अभ्यासू उत्तरदायी
सकारात्मक विचार करणाऱ्या परंतु संयमी उत्तरदायी नेतृत्वाची
गरज आहे. म्हणून आपण पर्यावरण आणि पर्यटन ही दोन्ही खाती
अवघड आहेत व महत्त्वाची आहेत ती यशस्वीरीत्या हाताळू शकाल
अशी आपल्या मुलाखाती वरून माझी समजूत झाली आहे.
मी 82 वर्षीय स्थापत्य अभियंता असून पाणी
शेती सहकार सामाजिक आर्थिक राजकीय परिस्थिती याबाबत
गेली 60 वर्ष जागरूकपणे लिहीत आलेलो आहे. व उपरोक्त
विषयावर मी गेले पन्नास वर्ष बरेच लिखाण केले आहे व कृषी
क्षेत्रामध्ये स्ट्रॉबेरी व स्वीटकॉर्न ही पिके महाराष्ट्रात चालू केली
आहेत . तीस वर्ष त्यात भरपूर प्रगती केली आहे व आणखी प्रगती
होणे शक्य आहे. सदर विषयांमध्ये मी वेळोवेळी केलेल्या बहुमूल्य
सूचना या फडणीस सरकारने अजिबात विचारात घेतल्या नाहीत.
त्यामुळे महाराष्ट्रात मोठी पिछेहाट झाली. मी आपल्याशी संपर्कात
राहील व एकावेळी एक विषयाची मांडणी आपल्यासमोर करीन.
आपण त्यावर जरूर ॲक्शन घ्याल अशी आशा आहे.
कै. यशवंतराव चव्हाण यांनी 25.12. 1960 रोजी मी वालचंद
इंजिनिअरिंग कॉलेजचा विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष असताना
वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त त्यांना निमंत्रण दिले असताना त्यांनी
मला आग्रहाने राजकारणात येण्याची आज्ञा केली होती.तथापि एका
प्राथमिक शिक्षकांचा मुलगा सहा भावंडांचे कुटुंब त्यामुळे घरची
नाजूक आर्थिक परिस्थिती म्हणून मला तात्काळ नोकरी पत्करावी
लागली व मी नगर शहराचे शहर अभियंता म्हणून काम स्वीकारले
.हे फक्त आपल्या माहितीकरता कळवत आहे माझी दहा प्रकाशित
पुस्तके आपल्याला मार्गदर्शक ठरतील त्यापैकी काही पुस्तके मी
मुख्यमंत्र्यांना पाठवीत आहे व ती तुम्ही जरूर वाचून पहावीत.
कळावे आपला,
भास्करराव म्हस्के
No comments:
Post a Comment